तुम्हाला घनदाट केस हवे आहेत का? मग हा छोटासा उपाय करून बघा, विचारही केला नव्हता इतके लांब सडक केस होतील

आरोग्य

सुंदर केस हे व्यक्तीच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असतात. दाट, चमकदार,काळेभोर केस असलेली व्यक्ती गर्दीतही उठून दिसते.  महिला असो अथवा पुरुष केसांचे आरोग्य चांगले असेल तर त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व देखील खुलून येते. मजबूत, चमकदार व घनदाट केसांमुळे व्यक्ती आकर्षक दिसते. केसांचे आरोग्य जपण्याकरिता महिलावर्ग जास्त प्रयत्न करताना दिसतात!

कारण स्त्रियांचे सौंदर्य हे केसांशी जास्त करुन जोडले जाते. सुंदर केशसंभार व सुंदर केशरचना असलेल्या स्त्रियांचे समाजामध्ये खूप कौतुक केले जाते. आजकाल धावपळीच्या जगामध्ये प्रदूषण वाढले आहे. प्रदूषणामुळे केसांचा आरोग्य खराब झाले असून केसांची निगा देखील त्या प्रमाणात ठेवता येत नाही. प्राकृतिक पदार्थांचा वापर जवळजवळ बंद झाला आहे.

केसांचे आरोग्य राखण्याकरता व केस धुण्याकरता बाजारात मिळणाऱ्या विविध कंपन्यांच्या प्रोडक्ट्सचा वापर आपण सर्रासपणे करत असतो. मात्र बाजारात मिळणाऱ्या तेल, शॅम्पू ,कंडिशनर व केसांसाठी आवश्यक असलेल्या इतर प्रोडक्ट्स यांमध्ये हानिकारक केमिकल्स मिसळलेले असतात. विविध सल्फेट्स आणि पॅराबिन असलेले हे प्रोडक्ट्स केसांचे आरोग्य सुधारण्याऐवजी जास्त खराब करतात.

ज्यामुळे अवेळी केस पांढरे होणे, केस गळती होणे, टक्कल पडणे, केस दुभंगणे, केस पातळ होणे अशा समस्या निर्माण होतात. आज आम्ही ह्या लेखाद्वारे आपल्याला केसांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी व मजबूत, घनदाट, काळ्याभोर केसांसाठी कांद्याच्या रसाच्या वापराबद्दल माहिती सांगणार आहोत. निसर्गामध्ये अनेक पदार्थ आहेत ज्यामुळे आपण प्राकृतिक रित्या आपल्या केसांचे आरोग्य चांगले ठेवू शकतो.

हे वाचा:   दिवसाची सुरुवात या पदार्थांनी केली तर कधी विचारही केला नसेल एवढा होईल फायदा.! लाखो रुपये वाचतील.!

कांद्याच्या रसाचा वापर-  कांद्याच्या रसामध्ये फायटोकेमिकल्स असतात, जे केसांच्या मुळांच्या रोम छिद्रांमध्ये जाऊन केसांना पोषणतत्व पुरवतात. ज्यामुळे केसांचे मुळापासून पोषण होते. केस जाड व दाट होण्यास मदत होते.

कसा करावा केसांवर कांद्याच्या रसाचा प्रयोग??
एक कांदा चिरून मिक्सरमध्ये दळुन घ्यावा. गाळणीच्या साहाय्याने दळलेल्या कांद्याचा रस बाजूला करावा. आता या रसामध्ये कापसाचा बोळा बुडवून किंवा हाताने केसांच्या मुळाशी कांद्याचा रस लावावा. संपूर्ण डोक्यामध्ये कांद्याचा रस लावून झाल्यावर हाताच्या बोटाने मसाज द्यावा. त्यानंतर अर्धा ते एक तास कांद्याचा रस केसांवर तसाच ठेवावा.

त्यानंतर केमिकल विरहित शॅम्पूने केस धुवावे. कांद्याच्या रसाला उग्र वास असतो याकरता कांद्याच्या रसामध्ये एक चमचा मध मिसळून लावले तर देखील कांद्याच्या सोबतच मधाचे गुणदेखील केसांना मिळतात. केस धुतल्यावर कांद्याच्या रसाच्या कडु वासाऐवजी मधाचा गोड वास देखील केसांमधून येऊ लागतो. अशाप्रकारे कांद्याच्या रसाचा उपयोग महिन्यातून किमान दोन वेळेस जर केसांकरता केला तर केस गळती पूर्णत: बंद होते व केसांचे आरोग्य सुधारते.

हे वाचा:   जापनीज स्त्रियांचे तरुण दिसण्याचे रहस्य.! या मुळे चेहऱ्यावर ग्लो आणखी येतो, त्वचा बनते मऊ आणि मुलायम.!

सहजासहजी प्रत्येकाच्या घरात उपलब्ध असलेला कांदा हा केसांच्या आरोग्य करता चमत्कारिक उपाय करतो. केसांचे दुभंगणे, केस गळणे, केस पातळ होणे, टक्कल पडणे अशा सर्व समस्यांवर कांद्याचा रस प्रभावीपणे काम करतो. आपणही जर अशा समस्यांनी ग्रस्त असाल तर कांद्याच्या रसाचा सांगितल्याप्रमाणे वापर केल्यास आपल्या समस्या देखील पूर्णपणे समाप्त होतील व केस मजबूत दाट व लांबसडक होण्यास मदत होईल.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. 9xMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *