हे चूर्ण जणू अमृतच आहे, डोकेदुखी, पोटदुखी, सारख्या अनेक आजारावर एकच उपाय; स्त्रियांसाठी आहे खूपच फायदेशीर.!

आरोग्य

भारतीय मसाल्यांमध्ये अनेक वर्षांपासून ओव्याचा वापर केला जात आहे. आपली आजी आपल्याला पोट दुखत असल्यावर ओव्याचे चूर्ण खाण्याचा सल्ला अवश्य देत असते. भजी बनवताना त्यात ओवा टाकला जातो ज्यामुळे भज्य‍ंच‍ स्वाद वाढवतो व पचण्यास सुलभता येते. त्यासोबत आरोग्यासंबंधी असलेल्या अनेक समस्यांमध्ये ओवा कामी येतो. ओव्याचे चूर्ण बनवून खाल्ल्यामुळे पचनक्रिया तंदुरुस्त राहते.

आज आम्ही आपल्याला या लेखाद्वारे ओव्याचा गुणकारी फायद्यांबद्दल माहिती सांगणार आहोत. चला तर जाणुन घेवूया ओव्याचे अद्भुत फायदे.

अपचन – अनेक लोकांना जेवण केल्यानंतर पोट जड पडते. तसेच आंबट, करपट ढेकर येण्यास सुरुवात होते, त्यालाच अपचन असे म्हणतात! असे झाल्यास जेवणानंतर एक चमचा अोव्यामध्ये चिमूटभर आल्याची पावडर टाकून खाल्ल्यास लाभ मिळतो.

बद्धकोष्टता – अनेक लोकांना पोटाच्या तक्रारी असतात. ज्यामध्ये बद्धकोष्ठतेचा सगळ्यात जास्त लोकांना त्रास होत असतो. बद्धकोष्ठतेकरता ओव्याचा खूप लाभ होतो. याकरता रोज जेवणानंतर कोमट पाण्यासोबत अर्धा चमचा ओवा सेवन करावा,  यामुळे बद्धकोष्ठतेसंबंधी सर्व समस्या दूर होतात.

मुतखडा – मुतखड्यावर देखील ओवा अतिशय लाभकारी असतो. मुतखड्याचा आजारावर उपचार म्हणुन ओवा मध आणि व्हिनेगार सतत पंधरा दिवस सेवन केल्यामुळे मुतखडा निघून जातो.

हे वाचा:   वर्षानवर्षं साठलेला सगळा मळ, घाण, गायब करा.! आता तुम्हाला गोरे होण्यापासून कोणी थांबू शकणार नाही.!

अस्थमा – अस्थमाच्य उपचाराकरतादेखील ओवा अतिशय लाभकारी मानला जातो. दररोज दिवसातून दोन वेळा गुळासोबत ओवा खाल्ल्यामुळे अस्थमामध्ये लाभ मिळतो.

पोटदुखी – ज्या लोकांना पोटदुखीची समस्या असते, त्यांनी ओवा आणि मीठ गरम पाण्यासोबत सेवन केल्यामुळे पोटदुखी लगेच थांबते.

मासिक पाळीतील दुखणे – मासिक पाळीत होणाऱ्या दुखण्यावर व त्रासांपासून सुटका मिळण्याकरता अोव्याचे पाणी खूपच फायदेशीर असते. मासिक पाळीच्या दिवसांमध्ये रात्री एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा ओवा भिजवून ठेवावा. सकाळी हे पाणी प्यावे त्यामुळे मासिक पाळी संबंधी सर्व दुखणी थांबतात.

सांधेदुखी – सांधेदुखीमध्ये ओव्याचा वापर पूर्वापार केला जातो. सांधेदुखीच्या रूग्णांनी दररोज ओव्याच्या तेलाचा वापर करून सांध्य‍ांची मालिश केली पाहिजे, त्यामुळे सांधेदुखीमध्ये आराम मिळतो.

दस्त किंवा डायरिया – लहान मुलांना जुलाब लागले असेल तर ओवा हा सगळ्यात चांगला घरगुती उपाय आहे. एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा ओवा टाकून उकळुन घ्या. हे पाणी गाळून थंड करून घ्या. दिवसातून दोन ते तीन वेळेस हे पाणी प्यायल‍ द्य‍ा. यामुळे जुलाब पूर्णपणे थांबतात.

हे वाचा:   दररोज माठातले पाणी पिता का.? मग ही माहिती एकदा नक्की वाचा.!

मुरुमांच्या खुणा – चेहऱ्यावर मुरूम व पुळ्या फोडल्याचे निशाण तसेच राहतात. त्यामुळे चेहरा विद्रुप दिसतो. याकरता एक छोटा चमचा ओवा पावडर आणि एक मोठा चमचा दही एकत्र मिसळुन पेस्ट बनवा. रात्री झोपण्यापूर्वी चेहर्‍याल‍ा अर्धा तास ही पेस्ट डागांच्या जागी लावा. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुऊन घ्या. यामुळे चेहऱ्यावरील पिंपल व मुरुमांचे डाग संपूर्णपणे निघुन जातात.

सर्दी पडसे – वातावरण बदलामुळे सर्दी-पडसे होत असते.  सर्दी-पडस्यामध्ये कुटलेल्या ओव्याचा सुगंध घेतल्याने देखील आराम मिळतो. अर्धशिशीचा समस्येकरता देखील ओव्याचा फायदा होत असतो.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. 9xMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *