अपचनाचा त्रास जाणवतोय मग फक्त एक पान तोंडात टाका, क्षणात अपचन बंद होईल, अनेक आजारांवर आहे जबरदस्त औषध.!

आरोग्य

आपल्या भारतीय आहारामध्ये दररोजच्या स्वयंपाकाकरता फोडणीमध्ये वापरला जाणारा पदार्थ म्हणजे कढीपत्ता!! कढीपत्त्याचा तडका एकदा भाजीला किंवा कोणत्याही रसिपीच्या पदार्थांना दिला तर त्याची लज्जत व सुगंध वाढत असतो. मात्र हाच कढीपत्ता अनेक आयुर्वेदिक गुणांनी युक्त असतो हे आपल्याला माहीतच नसते. आज आम्ही आपल्याला या लेखाद्वारे कढीपत्त्यातील आयुर्वेदिक गुणांची माहिती देणार आहोत.

कढीपत्त्याचा वापर भारतातल्या प्रत्येक स्वयंपाक घरात जेवणाचा स्वाद आणि सुगंध वाढवण्याकरता केला जातो. कढीपत्त्यामध्ये अनेक पोषक तत्व असतात, ज्यामुळे आपल्याला अनेक आरोग्यदायी फायदे मिळत असतात. पोटाच्या सर्व प्रकारच्या तक्रारींवर व रोगांवर कढीपत्त्याचा वापर आयुर्वेदामध्ये सांगितला आहे. तसेच आयुर्वेदामध्ये कढीपत्त्याला एक रामबाण औषध देखील म्हटले जाते.

पचनक्रिया चांगली करते – कढीपत्त्यामध्ये कार्मिनिट नावाचे गुण असतात. ज्यामुळे गॅस, एसिडिटी आणि बद्धकोष्टता यासारख्या समस्यांना कढीपत्ता दूर ठेवते. कढीपत्त्यामुळे पोटासंबंधी अनेक समस्यांमध्ये आराम मिळतो. कढीपत्ता अँटीबॅक्टरियल गुण असतात ज्यामुळे पोटामध्ये जंतू होणे यासारख्या समस्या देखील दूर होतात.

त्वचारोगांवर उपयोगी कढीपत्ता – कढीपत्त्यामध्ये एंटीऑक्सीडेंट, अँटीबॅक्टरियल आणि अँटी फंगल गुण असतात, ज्यामुळे त्वचेसंबंधीच्या अनेक विकारांमध्ये हे अतिशत गुणकारी व फायदेशीर ठरते. ज्यामुळे घामामुळे होणार्‍या त्वचेच्या वेगवेगळ्या इन्फेक्शन्सपासून कढीपत्ता त्वचेचा बचाव करते.

हे वाचा:   पोटावर वाढलेली चरबी पूर्ण उतरली जाईल.! फक्त सात दिवस याचे सेवन केल्याने पोटावरची चरबी उतरली.! पोट कमी झाल्या शिवाय राहणार नाही.!

डोळ्यांची दृष्टी सुधारण्यासाठी उपाय – कढीपत्ता मध्ये विटामिन ए असते, ज्यामुळे आपल्या डोळ्यांच्या चांगल्या दृष्टीसाठी हे अतिशय आवश्यक असते.विटामिन ए च्या कमतरतेमुलके रातांधळेपणाची समस्या होत असते. उपाशीपोटी कढीपत्त्याच्या पानांचे नियमित सेवन केल्यामुळे डोळ्यांची दृष्टी सुधारते व नजर नितळ होते.

डायरिया वर गुणकारी – कढीपत्ता मध्ये कार्गोजोल नावाचे अँटीबॅक्टेरियल तत्व असते आणि सूज कमी करणारे गुण देखील असतात. कढीपत्त्याच्या सेवनामुळे पोटातील पित्ताची समस्या दूर होते. डायरियामधील वारंवार येणारे जुलाब देखील थांबतात. त्यामुळे डायरियामध्ये कढीपत्त्याचे सेवन केल्याने फायदा होतो. कढीपत्त्याची पाने मिक्सरमध्ये बारीक दळून ताकासोबत दिवसातून दोन ते तीन वेळा आजारी रुग्णाला दिल्यास रुग्णाला जुलाब व उलट्यांमध्ये लगेच आराम मिळतो.

केसांच्या वाढीकरता उपाय – कढीपत्त्यामधील असलेल्या नैसर्गिक तत्त्वांमुळे केस लवकर पांढरे होत नाहीत व केसांचे गळणे देखील कमी होते.  तसेच केसांच्या सर्व प्रकारच्या समस्यांमध्ये देखील कढीपत्ता उपयोगी असतो. कढीपत्त्याचे तेल बनवून केसांना नियमित मालिश केली तर केस पांढरे होत नाहीत तसेच केस मजबूत होण्यास मदत होते.

हे वाचा:   जगासमोर आले जपानी लोकांचे सुंदरतेचे रहस्य.! ना खर्च ना केमिकल हे लोक या मुळे सुंदर दिसतात.!

वजन कमी करण्याकरता – वजन कमी करण्याकरता उपाशीपोटी कढीपत्त्याचे सेवन केल्यामुळे लाभ होतो. यामुळे लवकर वजन कमी होते तसेच हा उपाय करण्याकरता आपण कढीपत्त्याची दहा ते वीस पाने एक ग्लासभर पाण्यामध्ये उकळुन घ्या. त्यानंतर या पाण्यात लिंबू आणि मध मिसळून हे पाणी रोज उपाशीपोटी प्यायले पाहिजे. यामुळे आपले वजन लवकर घटविण्यासाठी चांगला परिणाम व लाभ होतो.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. 9xMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *