रात्री झोपताना फक्त एक तुकडा खा; दातातली किडा सकाळी गायब, 100% खात्रीशीर इलाज.!

आरोग्य

आपल्याला बरेचदा काही कडक पदार्थ खाल्ल्यामुळे किंवा दाताला कीड लागल्यामुळे अथवा दातांना कसला मार लागल्यामुळे दात दुखी होत असते. दाताच्या नसा या खूपच संवेदनशील असल्यामुळे दात दुखी सुरू झाल्यावर संपूर्ण डोके देखील दुखायला लागते. दात दुखीमध्ये तीव्र वेदना व ठणका डोक्यापर्यंत जातो ज्यामुळे अगदी वेदना असह्य होतात.

तसेच काही वेळेस दात दुखी इतकी वाढते की डोळ्यांच्या आजूबाजूला देखील मोठ्या प्रमाणावर सूज येते व गाल सुजून जातात, या ठिकाणी स्पर्श करणे देखील अवघड होऊन जाते. आज आम्ही आपल्याला या लेखाद्वारे दात दुखी तसेच  दात किडल्यावर होणारे दाताचे दुखणे यावर अतिशय प्रभावी असे घरगुती उपाय सांगणार आहोत.

हिंगाचा उपाय – आपल्या घरांमध्ये सहजपणे आढळणारा व स्वयंपाकासाठी वापरला जाणारा पदार्थ म्हणजे हिंग! हिंग आपल्याला दोन प्रकारे बाजारात विकत मिळतो. खडा हिंग जो वडीसारख्या रुपात मिळतो आणि पावडर हिंग जो घरात स्वयंपाक करताना फोडणीकरता आपण या पावडर हिंगाचा वापर करतो तो! दातदुखीवर हिंगाचा खूप चांगला उपचार करता येऊ शकतो.

याकरता आपल्याला एक चमचा हिंग एका वाटीमध्ये घेऊन त्यावर मोसंबीचा रस त्यावर टाकायचा आहे. हिंग आणि मोसंबीचा रस एकत्र मिसळून एक पेस्ट तयार होईल. या पेस्टमध्ये कापसाचा बोळा त्यामध्ये बुडवून तो बोळा दुखणाऱ्या दातामध्ये दाबून धरायचा आहे, असे आपल्याला चार ते पाच वेळा करायचे आहे. या हिंग व मोसंबीच्या बोळ्याच्या वापरामुळे आपल्याला ठणक कमी झालेली जाणवेल, तसेच थोड्याच वेळात दातदुखी देखील थांबेल.

हे वाचा:   हे पदार्थ खाल तर दवाखान्यात जाणे विसरून जाल, संपूर्ण शिरा मध्ये ऊर्जा संचारेल, सर्दी खोकला यावर आहे हा जालीम उपाय.!

कांद्याचा उपयोग – आपल्या सर्वांच्या स्वयंपाकघरात व घरांमध्ये कांदा सहज उपलब्ध असतो. कांद्याचा उपयोग देखील दातदुखी करता बरेच लोक करत असतात. याकरता एक छोट्या आकाराचा कांदा घेऊन त्याचे चार भाग करावे. ज्या दाताला तीव्र दुखणे व वेदना होत आहेत त्या दाताने ह्या कांद्याची एक फोड चावायची व चावुन चावून तो कांदा खाऊन घ्यावा किंवा आवडत नसेल तर थुंकुन टाकावा.

जर आपल्याला कांद्याची फोड चावता येत नसेल, तर कांद्याच्या सर्व पाकळ्या मोकळ्या करून एकेक पाकळी दाताखाली दाबून धरावी. कांद्याच्या रसामध्ये वेदनाशामक तत्व असतात ज्यामुळे दातदुखी बंद होते.

लसुनचा उपाय – कांद्याप्रमाणे दातदुखीसाठी लसनाचा उपयोग केला जातो. लसणाच्या तीन-चार पाकळ्या घेऊन त्या कापून दाताखाली दाबुन पकडाव्यात किंवा हाताच्या बोटांनी लसुनपाकळी दुखणार्‍या दातावर दाबून धरावी, यामुळे आपल्याला दातदुखीमध्ये लवकर आराम मिळतो.

हे वाचा:   चमचाभर कारल्याचा रस असा वापरला आणि केसांच्या सर्व समस्या गायब झाल्या, जाणून घ्या कसा करावा उपयोग.!

लवंगाचा उपाय – लवंगाचा देखील पारंपारिकरित्या दातदुखीकरता उपयोग केला जातो. लवंग तेल देखील दातदुखीवर उपयुक्त आहे. दात दुखत असेल तर आपण लवंग दुखणार्‍या दातामध्ये दाबून धरावी. लवंगामधील तिखट रस दाताची ठणक थांबवते. दातदुखीवर प्रभावी उपाय म्हणुन देखील लवंगापासुन मिळणारे तेल कापसाच्या बोळ्याने दुखणार्‍या दातावर दाबून धरले असता दाताला बधीरपणा करतो आणि दातदुखी थांबते. तर हे होते साधे सोपे घरगुती उपाय ज्यामुळे आपण दात दुखीवर कमी करु शकता.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. 9xMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *