भारतीय चित्रपट सृष्टीत आता पर्यंत अनेक घराण्यांनी आपले वर्चस्व स्थापन केले, मग ते कपूर असोत ( राज कपूर परिवार ) नाहीतर चोप्रा परिवार ( यश चोप्रा – बी आर चोप्रा ) अश्याच परिवाराच्या नावांच्या यादीत आता बच्चन परिवाराचे ही नाव मोठ्या आदराने घेतले जाते. बच्चन परिवार त्यांच्या तत्त्वां मुळे ओळखले जातात.
सर्व ज्ञात आहे कि त्यांच्या मुलीचे म्हणजेच श्वेता चे लग्न दिल्लीतील उद्योगपती निखिल नंदा ह्यांच्याशी तर मुलाचे म्हणजेच अभिषेक ह्याचा विवाह विश्व सुंदरी ऐश्वर्या राय हिच्या सोबत झाला आहे. सण , उत्सव सोबत साजरा करणारी एक ‘जॉईंट फॅमिली’ म्हणून नेहमीच आपण ह्या परिवाराला पहात असतो. घरातल्या मुली वर आणि सुनेवर एकसारखे प्रेम करणाऱ्या ह्या परिवारात जेव्हढे लाड श्वेता चे होतात तर तेव्हढेच कौतुक ऐश्वर्या चे ही केले जाते.
असे असले तरीही श्वेता आणि ऐश्वर्या ह्यांच्या नात्या विषयी जास्त ‘गॉसिप’ कधीही ऐकायला मिळत नाही कारण त्या दोघे ही सोशल मीडिया पासून सहसा जरा दूरच असतात. तरीही बऱ्याच पार्टीज मध्ये आणि सामाजिक आयोजनात आपण त्यांना सोबत पाहू शकतो.
तरीही २०१९ मध्ये करणं जोहर ह्याच्या टॉक शो मध्ये श्वेता ला विचारण्यात आले होते कि तुला ऐश्वर्या ची खटकणारी गोष्ट कुठली? तर श्वेता अगदी मनमोकळे पणाने सांगितले होते कि ऐश्वर्या ही कधीही वेळेवर कॉलबॅक करत नाही आणि तिचे टाइम मॅनेजमेंट अतिशय खराब आहे.
बच्चन परिवाराचे कुटुंब प्रमुख अमिताभ बच्चन ह्यांनी मागे केलीली एक घोषणा आपल्या ऐकिवात असेल, त्यात त्यांनी म्हंटल्या प्रमाणे त्यांच्या एकूण कामे चा वारस हक्क हा फक्त त्यांचा मुलगा म्हणजे अभिषेक ह्याचा नुसत त्यांची सर्व मालमत्ता ही श्वेता आणि अभिषेक ह्यांत समसमान वाटली जाणार आहे.
ह्यात लक्षात घेण्यासारखी बाब ही आहे कि बच्चन साहेबांची एकूण मालमत्ता अंदाजे २८०० करोड इतकी आहे. ह्या हिशोबाने अभिषेक आणि श्वेता ह्यांना प्रत्येकी १४०० – १४०० करोड मिळणार आहे. बच्चन साहेबांच्या ह्या घोषणेने त्यांनी ‘बेटा बेटी एक समान’ ह्याचाच संदेश अधोरेखित केला आहे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.