उन्हाळा सुरू झाला की सर्व लोकांचे लक्ष जाते ते म्हणजे लिंबू पाण्यावर. थंड गोष्टी खाणे सर्वजण पसंत करत असतात. खास करून उन्हाळ्यामध्ये लिंबूपाण्याचे सेवन जरा जास्त प्रमाणात केले जाते. लिंबू पाण्याच्या सेवनामुळे आरोग्याचे अनेक फायदे सांगितले जातात. आपल्या आरोग्यासाठी लिंबूपाणी खुप फायदेशीर असते.
परंतु प्रत्येकासाठी लिंबू पाणी चांगले असते असे नाही. काही असेदेखील आजार असतात ज्यांना लिंबू पाने अजिबात सहन होत नाही. अशा लोकांनी कधीही लिंबूपाण्याचे सेवन करू नये. आजच्या या लेखामध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की असे कोणते आजार आहेत किंवा असे कोणते लोक आहेत ज्यांनी लिंबूपाण्याचे सेवन कधीही करू नये.
ज्या लोकांना दाता संबंधीच्या काही समस्या असतील अशा लोकांनी कधीही लिंबूपाण्याचे सेवन करू नये. लिंबू पाणी पिल्यामुळे दातामध्ये कमजोरी निर्माण होत असते. ज्यामुळे दात पडण्याची देखील शक्यता असते. यासोबतच दाताची सेन्सिटिव्हिटी देखील वाढत असते. त्यामुळे ज्या लोकांना दाता संबंधीच्या काही त्रास असेल तसेच दाता संबंधीच्या काही समस्या असतील अशा लोकांनी लिंबू पाण्यापासून दूर राहणे फायदेशीर ठरेल.
ज्या लोकांना हाडा संबंधीच्या समस्या असतील अशा लोकांनी लिंबू पाणी कधीही पिऊ नये. कारण लिंबू पाणी पिल्यामुळे जास्त प्रमाणात युरिन येत असते व युरीन द्वारे शरीरामधून भरपूर प्रमाणात कॅल्शियम बाहेर पडत असते. यामुळे हाडा संबंधीच्या अनेक समस्या निर्माण होत असतात. आपल्याला वाटत असते की दुसरा काही आजार असेल परंतु आपण या प्रकारच्या काही चुका करत असतो त्यामुळे आपल्याला असे काही आजार निर्माण होत असतात.
ज्या लोकांना ऍसिडिटी भरपूर प्रमाणात होते अशा लोकांनी लिंबू पाणी कधीही पिऊ नये. कारण लिंबामध्ये ऍसिटिक ऍसिड असते. जे लोक खूपच जास्त प्रमाणात लिंबू पाणी पितात अशा लोकांना ऍसिडिटी भरपूर प्रमाणात होते. परंतु ज्या लोकांना ॲसिडिटीचा खूपच त्रास होत असतो अशा लोकांनी शक्यतो लिंबू पाणी पिणे टाळावे.
लिंबू पाणी जरी शरीरासाठी फायदेशीर असले तरी त्यामुळे आपल्या शरीराला नुकसान होऊ शकते. त्यामुळे अशा लोकांनी शक्यतो लिंबू पाणी पिणे टाळावे. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.