तुम्ही आज पर्यंत कांद्यामुळे होणारे आरोग्याचे फायदे ऐकले असतीलच परंतु तुम्ही कधी हे ऐकले आहे का की कांद्यामुळे केसांचे देखील फायदे होत असतात. हो कांदा हा केसांसाठी वरदानच मानला गेला आहे. याच्या वापरामुळे केस हे आणखी मजबूत व चमकदार होत असतात. यामुळे केसांची वाढ देखील चांगल्या प्रकारे होत असते.
केसांना मजबूत करण्यासाठी कांदा हा अतिशय उपयुक्त मानला गेला आहे. आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला कांद्याचा रस याद्वारे तुम्ही तुमच्या केसांना कशा प्रकारे फायदा पोहोचू शकतात या बाबतची माहिती सांगणार आहोत. कांद्यामध्ये अँटी एक्सीडेंट, अँटी बॅक्टेरियल आणि अँटी इम्प्लिमेंट गुणधर्म असतात. यामुळे भरपूर असा फायदा होत असतो.
अनेकदा सूर्यकिरणांमुळे केस हे खराब होऊ लागतात. यापासून वाचण्यासाठी कांदा हा अतिशय उपयुक्त मानला गेला आहे. हेअर एक्सपर्ट द्वारे असे सांगितले गेले आहे की केसांचा कोरडेपणा हा मध व कांद्याच्या छोट्याशा उपायाद्वारे सहज दूर केला जाऊ शकतो. तुम्हाला यासाठी कांद्याचा रस व थोडासा मध लागणार आहे.
सर्वप्रथम एका वाटीमध्ये कांद्याचा रस काढून घ्यावा व यामध्ये तेवढाच मध देखील टाकावा. याला चांगल्या प्रकारे एकत्र करून घ्यावे यामुळे केस खूपच आरोग्यदायी राहात असते. तसेच केसांना मजबुती देखील मिळते. खूपच कोरडे केस झाले असतील तर त्यासाठी देखील याचा फायदा होऊ शकतो. याची तुम्हाला मालिश करायची आहे.
हा उपाय तुम्हाला आठवड्यातून तीन दिवस करायचा आहे. केसांना मजबूत करण्यासाठी लिंबू आणि कांद्याचा रस ही दोन्ही देखील अतिशय उपयुक्त मानले गेले आहे. लिंबा मध्ये विटामिन सी असते जे केसांसाठी फारच उपयुक्त आहे. यामुळे केस हे आणखी मजबूत होत असतात. तसेच केसांमध्ये कोंडा असेल तर तो देखील गायब होत असतो.
हा उपाय करण्यासाठी सर्वप्रथम एक ते दीड चमचा कांद्याचा रस घ्यावा. त्यामध्ये एक मोठा चमचा लिंबू रस टाकून त्याला एकत्र करून घ्यावे. आता हे मिश्रण आपल्या केसांना अगदी मुळापर्यंत लावावे. म्हणजेच मालिश करत राहावी. जवळपास एक तासाकरिता याला तसेच सोडून द्यावे. त्यानंतर शाम्पू च्या साह्याने आपले केस धुऊन काढावे.
हा उपाय आठवड्यातून दोन ते तीन वेळा करायला हवा. यामुळे नक्कीच फायदा होईल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.