पावसाळ्यात होणारी सर्दी होईल अशाप्रकारे झटपट मोकळी, असा उपाय कदाचित तुम्ही कधीच एकला नसेल.!

आरोग्य

बदलत्या वातावरणामुळे अनेकांना सर्दी खोकल्यासारखे आजार वरचेवर होत असतात. नाक सतत वाहत राहणे, छातीत कफ होणे, कफामुळे छातीत दुखणे, सर्दीमुळे डोकं जड वाटणे अशा अनेक त्रासांना आपण सामोरे जातो.

या सतत होणाऱ्या सर्दी किंवा कफामुळे आपण नेहमी गोळ्या, औषधे घेत असतो. आणि या रासायनिक औषधांमुळे वेगळे परिणाम आपल्या शरीरावर होताना दिसतात. म्हणूनच आज आपण बघणार आहोत असे घरगुती उपाय ज्यामुळे आपली सर्दी, खोकला लगेच दूर होतील आणि त्याचा वाईट परिणाम आपल्या शरीरावर होणार नाही.

जर तुम्हाला जास्त सर्दी आणि कफ झाला असेल, तर ४/५ लसूण घेऊन ती ठेचा आणि दोन चमचे त्याचा रस काढून घ्या. तस लसूण चवीला तिखट लागतात पण हा रस घेण्याआधी त्यात चवीसाठी एक चमचा मध टाका. जर लहान मुलांना हे चाटण द्यायचे असल्यास त्यात थोडा जास्त मध टाकून त्यांना द्या.

हा उपाय दिवसातून तीन वेळा केल्यास तुम्हाला लवकर आराम मिळेल. लहसुनात भरपूर प्रमाणात एलिसिन, झिंक, सल्फर, सेलेनियन आणि व्हिटॅमिन ए व ई आढळतात. लसूणमधील आवश्यक खनिजे व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी6, फॉस्फरस, मँगनीज, जस्त, कॅल्शियम आणि लोह आहेत.

हे वाचा:   केस इतके वाढतील की कापत राहावे लागेल.! असा कांदा केसांना लावा.! आठवड्यात केस दुप्पट लांब बनतील.!

छातीत जास्त कफ झाला असेल तो सुकला असेल तर हा उपाय करा. एक मोठा आल्याचा तुकडा घेऊन त्याचा रस काढा आणि त्यात मध टाकून प्या. आलं गरम असल्याने हा रस शक्यतो एक दोन चमचा घ्यावे. हा उपाय सुद्धा तुम्ही दिवसातून ३ ते ४ वेळा करा म्हणजे याचा चांगला परिणाम जाणवेल. आले हे कफनाशक आणि शरीराला गरम ठेवणारे असते.

त्यातल्या त्यात आल्यासोबत मधाचा वापर केल्यास त्याचे अनेक लाभ शरीराला होतात. त्यात जिंगरोल्स आणि झिंगारोन ही दोन औषधी द्रव्ये असतात. मधामध्ये व्हिटामीन ए, बी, सी, आयर्न, कॅल्शियम, सोडियम फॉस्फोरस, आयोडिन असते. मध खाल्याने शरीरात शक्ती, स्फूर्ती निर्माण करून रोगांशी लढा देण्याची शक्ती वाढते.

हे वाचा:   या पानांची अशी पेस्ट करा चेहरा इतका खुलून जाईल की प्रत्येक जण बघतच राहील.!

सर्दीने तुमचे डोके जड झाले असेल किंवा थोडा कफ जाणवत असेल तर चार लवंग घेऊन ते एक ग्लास पाण्यात उकळवा. आणि हा रस कोमट करून प्या. लवंगमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरियाचे गुणधर्म आहेत. ज्यात व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन सी, फोलेट, राइबोफ्लेविन, व्हिटॅमिन ए, थायमिन, व्हिटॅमिन डी, ओमेगा फॅटी ऍसिडस् आहेत. हे पाणी शक्यतो सकाळी उठल्यावर काहीही खाण्याआधी प्या. याने तुम्हाला लवकर बरे होता येईल.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *