सध्या अनेक प्रकारच्या मालिका टीव्हीवर सुरू आहेत. त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल ची चर्चा विविध समाज माध्यमावर केली जात असते. मालिकांमधील अभिनेते-अभिनेत्री हे सोशल मीडियावर देखील खूपच ऍक्टिव्ह असतात. ती आपल्या परिवाराबद्दलची माहिती फोटोज् द्वारे शेअर करत असतात.
मराठी सिरीयल मध्ये काम करणारे अनेक अभिनेते अभिनेत्री आहेत ज्यांचा चाहतावर्ग भरपूर मोठा आहे. अनेक असे कलाकार मंडळी आहेत ज्यांची मुले मुली किंवा परिवारातील लोक हे इतर काही कार्यक्रमामध्ये काम करत असतात. परंतु आपल्याला यांच्याबद्दल एवढी माहिती नसते.
आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला अशा काही कलाकारांविषयी माहिती सांगणार आहोत. असे काही कलाकार जे सीरियल्समध्ये दिसतात परंतु सध्या त्यांची मुले मुली नेमके काय करतात हे आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया तुमच्या आवडत्या कलाकारांच्या मुला मुली विषयी.
या कलाकार मंडळींचे मुले-मुली ही सुप्रसिद्ध अभिनेते व अभिनेत्री आहेत. अगबाई सूनबाई या सिरियल मध्ये काम करणारे गिरीश ओक. त्यांची मुलगी ही चित्रपटसृष्टीमध्ये कार्यरत आहे त्यांच्या मुलीचे नाव आहे गिरिजा ओक. गिरिजा ओक ह्या अनेक मालिकांमध्ये तसेच चित्रपटांमध्ये दिसून आल्या आहेत.
‘येऊ कशी तशी मी नांदायला’ ही मालिका सध्या टीव्हीवर खूप गाजली जात आहे. या मालिकेत काम करणाऱ्या शुभांगी गोखले, याची मुलगी देखील सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे. त्यांच्या मुलीचे नाव आहे, सखी गोखले. दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेमध्ये ती दिसली होती.
मृणाल कुलकर्णी टीव्ही विश्वातील तसेच चित्रपट सृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांचा मुलगा सध्या झी मराठी वाहिनीवरील ‘माझा होशील ना’ या मालिकेमध्ये काम करत आहे. त्याचे नाव हे विराजास कुलकर्णी हे आहे. या मालिकेत विराजस आदित्य ची भूमिका साकारताना दिसतो आहे.
जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.