मुळव्याधीवर अनेक प्रकारच्या औषधी उपचार उपलब्ध आहेत परंतु घरगुती पद्धतीने काही उपाय केले तरीदेखील आपण याला बरे करू शकतो. आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला एक अशी वनस्पती सांगणार आहोत ही वनस्पती मूळव्याधीच्या आजारावर अतिशय उपयुक्त आहे. तुम्हाला जर मूळव्याधीचा त्रास होत असेल तर तुम्ही ही वनस्पती नक्की वापरून बघा.
मुळव्याधीवर आपण या वनस्पती द्वारे कशाप्रकारे उपाय करायला हवा हे आपण आजच्या या लेखाद्वारे जाणून घेणार आहोत. तर मूळव्याधीला पूर्णपणे नष्ट करण्यासाठी एरंड ही वनस्पती उपयुक्त मानली गेली आहे. एरंडाचे मुख्यतः दोन प्रकार असतात एक पांढरा एरंड व दुसरा लाल एरंड दोन्ही मध्ये देखील सारखेच गुणधर्म सामावलेले असतात.
आरोग्यासाठी होणारे फायदे दोन्हींमधील देखील सारखेच असतात. तर मुळव्याधीवर तुम्ही कशा प्रकारे याचा उपयोग करू शकता हे आपण जाणून घेऊया. तुम्हाला या वनस्पतीचे तीन ते चार पाने घ्यायचे आहेत. पाने घेत असताना हे देखील पाहून घ्यावे की हे पाने अतिशय कोवळी देखील असू नये व जास्त मोठे देखील असू नये. मध्यम आकाराची आपल्याला तीन ते चार पाने घ्यायची आहेत.
या पानांना स्वच्छ धुवून काढून याचा रस बनवायचा आहे. अर्ध्या कप पाण्यामध्ये थोडासा रस टाकून याचे सकाळच्या वेळी उपाशी पोटी सेवन करावे. लक्षात ठेवा याचे सेवन केल्यानंतर तुम्हाला कोणताही पदार्थ खायचा नाही तसेच चहा प्यायचा नाही. जवळपास अर्ध्या तासापर्यंत तुम्हाला कोणतीही गोष्ट करायची नाही.
हा उपाय जर तुम्ही काही दिवस केला तर तुमचा मुळव्याध पूर्णपणे बरा होऊ शकतो. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.