माशी आजपासून घरात फिरकणार सुद्धा नाही, फक्त करा हा साधा सोपा उपाय.!

आरोग्य

पावसाळा सुरू झाला की घरात लहान सहान कीटक जसे की माशा, मच्छर आपल्याला खूपच त्रास देत असतात. अशावेळी नेमके काय करावे हे आपल्या सुचत नाही परंतु चिंता करण्याची काहीही गरज नाही आम्ही तुम्हाला आजच्या या लेखात माशांना कशाप्रकारे पळवून लावावे याबद्दल माहिती सांगणार आहोत. यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होईल. चला तर मग जाणून घेऊया या विषयीची सविस्तर माहिती.

तुम्हाला माहीत आहे का की तुळशीच्या पानांचा सुगंध घरात माशांना येऊ देत नाही. तुळस ही प्रत्येकाच्या घरात आढळते. अशा परिस्थितीत तुम्ही तुळशीच्या पानांचा घरगुती स्प्रे बनवू शकता. यामुळे माशा पळून जातील. वाटल्यास आपण बाजारातून तुळशी स्प्रे देखील खरेदी करू शकता. तुळस स्प्रे फवारणी लिक्वीड बनवण्यासाठी, सुमारे 15 पाने गरम पाण्यात भिजवा आणि थोड्या वेळाने त्याला चांगल्या प्रकारे मिसळा.

हे वाचा:   शरीरात लोह कमी झाल्यास दिसून येतात ही लक्षणे, वेळीच हे कामे करा नाहीतर शरीर बनेल आजारांचे घर.!

आता हे एका स्प्रे बाटलीत भरून ठेवा. ज्या ठिकाणी माशा दिसते तिथे फवारणी करू शकता. यामुळे तुम्हाला घरात नक्कीच फरक पडेल. जर घरात जास्त माशा असतील तर तुम्ही मिरपूड स्प्रे देखील वापरू शकता. याचा सुगंध माशांना दूर करतो. हा स्प्रे फवारल्यानंतर माश्या अन्नपदार्थांवर बसत नाहीत.

आपण हे घरी देखील बनवू शकता. यासाठी तुम्ही २-३ काळी मिरी घ्या आणि मिक्सरमध्ये बारीक करा. मिरी पावडर हवाबंद डब्यात साठवून ठेवा आणि उन्हात ठेवा. २-३ दिवसांनी बाटलीत भरा त्यात पाणी टाका आणि माशांच्या जागी फवारणी करा. यामुळे माशा भरपूर कमी झालेल्या दिसतील. आले स्पापासून माश्याही पळून जातात. हा स्प्रे तुम्ही घरीही बनवू शकता.

यासाठी, सुमारे 4 कप पाणी घ्या आणि त्यात 2 चमचे कोरडे आले किंवा कच्चे आले पेस्ट घाला. आता ते चांगले मिसळा. हे मिश्रण गाळून घ्या आणि स्प्रे बाटलीमध्ये भरा. आता तुम्ही ते स्वयंपाकघर किंवा इतर कोणत्याही ठिकाणी फवारू शकता. असे काही उपाय करून तुम्हाला मशांपासून नक्कीच सुटका मिळेल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *