या स्टेप ने चेहरा धुवा, चेहरा इतका चमकदार बनेल की लोक बघतच राहतील.!

आरोग्य

प्रत्येकाला आपल्या चेहऱ्याची त्वचेची काळजी असते. प्रत्येकाला वाटत असते की आपला चेहरा सुंदर असावा. त्यावर कुठल्याही प्रकारचे पिंपल्स नसावे. फुटकळ्या येऊ नये तसेच वांग काळे डाग निर्माण होऊ नये. असे प्रत्येक व्यक्तीला वाटत असते. मग ती स्त्री असो अथवा पुरुष सर्वांना आपले सौंदर्य चांगले राहावे असे वाटत असते. परंतु असे कशामुळे होत असते

असे होण्याचे कारण म्हणजे, अति प्रमाणात तेलाचे सेवन करणे. बाहेरचे अन्नपदार्थ खाणे, त्वचेसाठी केमिकलयुक्त सौंदर्य प्रधानाचा वापर करणे, याबरोबरच अनेक वाईट गोष्टी असतात ज्यामुळे त्वचा पुर्णपणे बिघडली जात असते. यामुळे त्वचा सुधरवण्यासाठी, त्वचेचा रंग चांगला बनवण्यासाठी, तसेच त्वचेवरील पूर्ण डाग घालवण्यासाठी आपण काही उपाय करायला हवे.

आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला एक सोपा असा घरगुती पद्धतीने बनवला जाणारा फेशियल पॅक सांगणार आहोत. हा पॅक तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर लावायचा आहे. ज्यामुळे त्वचा ही सुधारली जाते त्वचेचा रंग हा आणखी वाढला जातो. हा उपाय आपल्याला तीन स्टेप मध्ये करायचा आहे. सर्वप्रथम पाहुया पहिली स्टेप कशा प्रकारे बनवायची आहे.

पहिली स्टेप बनवण्यासाठी आपल्याला दोन पदार्थांची आवश्यकता भासेल. पहिला म्हणजे टोमॅटो. टोमॅटो चे आपल्या त्वचेसाठी खूप फायदे सांगितले जातात. आपल्याला या उपायासाठी एक टोमॅटो अर्धा चिरून त्यातून रस काढून घ्यायचा आहे व चाळणीच्या सहाय्याने गाळून घ्यायचा आहे. त्यानंतर यामध्ये अर्धे लिंबू पिळून घ्यायचे आहे. या मिश्रणाला चांगल्याप्रकारे एकत्र करून घ्यायचे आहे.

हे वाचा:   लाखो चे औषधे यापुढे काही नाही, कुठे आढळली ही वनस्पती तर गुपचूप घरी घेऊन या.!

ही पहिली स्टेप म्हणजे याने आपल्याला आपला संपूर्ण चेहरा स्वच्छ करायचा आहे. आता बघूया दुसरी स्टेप कोणती आहे ते. दुसरी स्टेप आहे ती फेशियल मसाज यांने आपल्याला चेहऱ्याची मसाज करायची आहे. जेणेकरून चेहऱ्यावरील सर्व मळ धूळ नष्ट होईल. ही दुसरी स्टेप बनवण्यासाठी आपल्याला थोडीशी कॉफी पावडर लागणार आहे. यामुळे देखील आपण त्वचा सुंदर बनवू शकतो.

आपल्याला यासाठी साधारणपणे एक चमचा कॉफी पावडर घ्यायची आहे. ही पावडर एका वाटीमध्ये काढून घ्यावी. त्यानंतर यामध्ये एक चमचा मध मिसळून घ्यायचा आहे. या पॅक मध्ये आणखी एक पदार्थ टाकायचा आहे तो म्हणजे थोडासा लिंबूरस. या सर्व पदार्थांना चांगल्या प्रकारे एकत्र करून घ्यायची आहे. त्यानंतर या मिश्रणाच्या साहाय्याने चेहऱ्याची मालिश करावी.

साधारणपणे पाच ते सहा मिनिटे मालिश केल्यानंतर थंड पाण्याने आपल्याला आपला चेहरा धुऊन घ्यायचा आहे. त्यानंतर शेवटची म्हणजे तिसरी स्टेप करायची आहे. आता पाहूया कोणती आहे ही शेवटची आणि तिसरी स्टेप. तिसरी स्टेप बनवण्यासाठी आपल्याला यासाठी काही पदार्थ घ्यायचे आहे. सर्वप्रथम एक मोकळी वाटी घ्यावी व यामध्ये साधारणपणे दोन चमचे बेसन पीठ घ्यावे.

हे वाचा:   महिन्यातून एकदा तरी ह्या भाज्या खा.! रक्ताची कमी होणार नाही.! शंभर वर्ष रोग दूर राहतील.! ताकदीचा खजाना आहेत या तीन भाज्या.!

यामध्ये एक चमचा हळद टाकावी व दोन ते तीन चमचा बटाट्याचा रस टाकावा. या सर्व पदार्थांना चांगल्या प्रकारे एकत्र करून घ्यावे. त्यानंतर याला आपल्या चेहऱ्यावर लेप लावल्याप्रमाणे लावावे व साधारणपणे अर्धा तासापर्यंत ठेवावे. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुऊन काढावा. असे हे उपाय केल्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा जबरदस्त गोरा चमकदार झालेला दिसेल.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *