सिताफळाचे सेवन करणारे लोक नक्की वाचा, या काही गोष्टी प्रत्येकाला माहिती असणे आवश्यक असते.!

आरोग्य

मित्रांनो, आपण सर्वांनी लहानपणापासूनच कधी ना कधी सिताफळ नक्कीच खाल्ले असेल. चवीला मधुर व अत्यंत चविष्ट असलेले सिताफळ आपल्या शरीरासाठी आणि सौंदर्यासाठी अत्यंत लाभदायक असते. आपल्यापैकी अनेक लोकांना सिताफळ आवडते देखील परंतु याच्या काही खास फायद्यांबद्दल खूप कमी लोकांना माहिती असते. एक औषधी वनस्पती आहे सिताफळ.

सीताफळाला शरीफा या नावाने देखील ओळखतात. पिकल्यावर मऊ झालेले सिताफळा मध्ये असंख्य बिया असतात आणि त्या प्रत्येक बियांवर असतो गोड गर. सिताफळाची रबडी, बर्फी असे मिठाईचे अनेक प्रकार देखील तुम्ही खाल्ले असतील. जाणून घेऊयात या सीताफळाच्या फायद्यांबद्दल आणि काही तोट्याबद्दल. डोंगराळ भागात रस्त्याच्या कडेला मोठ्या सीताफळ आढळतात.

आज-काल सीताफळाची शेती करून लागवड देखील केली जाते, तसेच काहीजण आवड म्हणून परसबागेत देखील सिताफळाचे झाड लावतात. हे हंगामी फळ असल तरी देखील आजकाल सर्व ऋतुत पाहायला मिळतेय. विटामिन सी आणि अँटिऑक्सिडंट याच भरपूर प्रमाणात असल्याने सर्व प्रकारच्या ऍलर्जी आणि कर्करोग यापासून आपला बचाव होण्यास मदत होते.

हे वाचा:   3 दिवसात शुगर नॉर्मल करायचा गावरान उपाय.! सकाळी उठून कोणी पण करू शकतो.! अगदी ८० वर्षाचे आजोबा सुद्धा होणार आता शुगर मुक्त.!

गर्भवती महिलांसाठी तर सिताफळ एक वरदानच होय. पोटॅशियम आणि मॅग्नेशियम फार मोठ्या प्रमाणात यामध्ये असते. हृदयाच्या सर्व तक्रारींपासून होते मुक्तता नियमित सीताफळ खाल्ल्याने. चवीला गोड असले तरीदेखील तुमचे वजन राहू शकते नियंत्रणात सिताफळाच्या सेवनाने. यामुळे आपली रोगप्रतिकारक क्षमता कमालीची वाढते. उच्च आणि निम्न रक्तदाब तसेच सर्व प्रकारचे हृदयरोग यां पासून होणारी जोखीम कमी होते सिताफळा मुळे.

विटामिन ए आणि फायबरचे भरपूर प्रमाण असल्यामुळे डोळ्यांसाठी, त्वचेसाठी तसेच पोट साफ राहण्यासाठी सिताफळ आपल्याला फायदेशीर ठरते. डोक्यामध्ये उवा लिखा झाल्यास सिताफळाचे बियांची पावडर करून लावतात हे तुम्ही लहानपणापासून आई आजी कडून ऐकले असेलच. सीताफळमध्ये आढळणारे काही घटक वजन कमी करण्यास आपल्याला फायदेशीर ठरतात.

दररोज एक सिताफळ खाल्ल्याने दात आणि हिरड्यांचा त्रास असेल तर तो थांबतो. लहान बाळाच्या मेंदूच्या वाढीसाठी सिताफळ अत्यंत फायदेशीर असते. सिताफळाचे पाने देखील उकळून काढा केला जातो. तोदेखील अनेक प्रकारच्या रोगांसाठी फायदेशीर आहे. या फळामुळे रक्तातील हिमोग्लोबिन चे प्रमाण वाढून अशक्तपणा दूर होतो.

हे वाचा:   मूळव्याध ने त्रस्त आहात का.? ऑपरेशन ची भीती वाटते का.? मग हा घरगुती उपाय करून बघा.! ऑपरेशन ची सुद्धा गरज भासणार नाही.!

तोटे : १. अति प्रमाणात सिताफळ सेवन केल्याने वाढू शकते वजन. २. सिताफळाच्या बिया विषारी असतात त्यामुळे त्याचे सेवन करू नये. ३. भरपूर प्रमाणात फायबर असल्याने सीताफळ अति सेवन केले तर पोटाच्या तक्रारी जसे जुलाब, अतिसार, ऍसिडिटी असे रोग उद्भवू शकतात. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *