पुन्हा पुन्हा होणारी पाठ दुखी कायमची होईल बंद.! पाठदुखी चे हे असतात कारणे.! उतारवयात जाण्याआधी नक्की वाचा.!

आरोग्य

मित्रांनो आज आम्ही तुम्हाला स्पाईन मधली हाडं यांचे आजार आणि त्यांना काय उपचार करून कसे ठीक करायचे त्याबद्दल माहिती शेयर करणार आहोत. त्याआधी आपण आपल्या पाठीच्या कणाच्या हाडांची संरचना कशी असते ते जाणून घेऊ. एका बाजूने पाहिले असता मणका काहीसा S आकारात दिसतो. जा मधील पहिले सात हाड ही मानेचे असतात. त्यानंतर छातीचे बारा मणके असतात.

कंबरेचे पाच व माकड हाडाचे पाच मणके जे एकत्र असतात. प्रत्येक मणका हाडाचा बनलेला असतो. प्रत्येक मणक्याच्या मध्ये एक डिस्क असते. जी माऊ असते आणि शॉक अबसॉरब चे काम करते. हे हाडं एकावर एक असल्याने डोक्यापासून ते माकड हाडापर्यंत एक नळी तयार होते. त्या नळी मध्ये आपले मज्जारज्जू असतात. जास्त करून आपल्याला मानेच्या आणि कमरेच्या मणक्या मध्ये त्रास होतात. कारण हेच दोन मणके जास्त हलणारे असतात.

१. Degenerative Disc Desease: कंबरेच्या मणक्यात ज्या डिस्क आहेत त्यात सगळ्यात जास्त प्रॉब्लेम येतो. नॉर्मल डिस्क मध्ये 80 टक्के पाणी असते. पण ते पाणी कोणत्या अपघातामुळे अथवा वयोमानानुसार सुकते. यामुळे डिस्क मधून दुखण जन्म घेतं. यामध्ये फिजिओथेरपी आणि काही एक्झरसाइज मुळे हे दुखणे कमी करण्याचा सल्ला डॉक्टर देतात.

हे वाचा:   भरपूर दिवसाचा साठलेला पाठीचा मळ एकदम वाहून जाईल.! फक्त अंघोळ करताना हे एक काम करायला विसरू नका.!

२. Slipped Disc : अगदी तरुण वयात देखील हा आजार बघायला मिळतो. यामध्ये एखादी डिस्क सरकून पायाकडे जाणारी नस दबवते. त्याला सायटीका म्हणतात. त्यात नसा दुखतात. यामध्ये 80 टक्के लोकांना फिजिओथेरपी गोळ्या आणि आराम करण्याचा सल्ला डॉक्टर देतात. 20 टक्के लोकांना ऑपरेशनची गरज पडू शकते.

३. Lumbar Spinal Stenosis : हा आजार थोडा उतारवयात दिसून येतो. यामध्ये दोन्ही पायांकडे जाणाऱ्या नसांच्या पिशवी असते ती सगळ्या बाजूने दबली जाते. या आजारामुळे पेशंट जास्त वेळ चालू शकत नाही. पायामध्ये दुखणे मुंग्या येणे असे त्रास दिसू लागतात. याला Neurogenic claudication म्हणतात. यामध्ये उपचार हा MRI पाहून ठरवला जातो. फिजिओथेरपी अथवा सर्जरी असे दोन उपचार असतात जे वेदनेच्या तीव्रतेवर अवलंबून आहे.

४. Spondylolisthesis : याचा अर्थ मणक्याचा तुकडा पुढे सरकणे. यामध्ये एक मणका दुसऱ्या मणक्याच्या पुढे सरकतो. या प्रकारचा त्रास असणारे पेशंट जास्त वेळ उभं राहू शकत नाहीत. जास्त करून महिलांमध्ये हा त्रास बघायला मिळतो. MRI व X-ray करून याचे निदान करता येते. दैनंदिन कामावर याचा खूप प्रभाव असल्‍यास पेशंटला सर्जरी करण्याचा सल्ला डॉक्टर देतात.

हे वाचा:   गुडघे दुखीचा कंटाळा आला असेल तर एकदा हे करून बघा.! गुडघ्याच्या वाट्या बनतील लोखंड सारख्या मजबूत.! झोपलेला सुद्धा पळू लागेल.!

हे होते चार त्रासदायक मणक्याचे/ पाठीच्या कण्याचे दुखणे. पूर्वी या प्रकारच्या गंभीर सर्जरीमध्ये पेशंट घाबरून जात असे. परंतु आज-काल टेक्नॉलॉजीमुळे अशा प्रकारच्या सर्जरी खूप सेफ आणि सोप्या झाल्या आहेत. यामुळे सर्जरी नंतर देखील पेशंटला खूप कमी त्रास होतो. या शब्दात कमी रक्तप्रवाह होतो. औषधे कमी लागतात. याशिवाय लवकर हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळतो.

सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे पेशंट सगळ्यात लवकर चालू फिरू लागतो. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *