सांधे दुखी, कमरेचे दुखणे, हाडांची कमजोरी आता झटपट होईल गायब, अंथरुणात खी व्यक्ती आता पळू लागेल.!

आरोग्य

मित्रांनो, तुम्हाला किंवा तुमच्या घरातील माणसांना देखील सांधे दुखी, हाडं दुखीची समस्या आहे काय? कंबरेच्या दुखण्याने तुम्ही देखील त्रस्त आहात का? थंडी मध्ये कमरेत चमक येणे याचे प्रमाण वाढते. अशी समस्या तुम्हाला असल्यास आजची ही माहिती तुमच्यासाठी अगदी उपयुक्त ठरणार आहे. उतारवयामुळे आपल्या सांध्यातील कार्टीलेजची झीज झाल्याने संधीवात होण्याची शक्यता असते.

लहान वयात अतिरिक्त वजन वाढल्याने देखील संधिवात होऊ शकतो. कारण वजनाचा जास्त भार हा गुडघे किंवा खुब्याच्या सांध्यावर पडल्यामुळे तेथे सांधेदुखी सुरु होते. तसेच अनुवांशिकता व दुखापत हे ही एक प्रमुख कारणांपैकी एक कारण होय. संधिवातावर, कंबर दुखीवर आजवर अनेक उपचारपद्धती आणि औषध मलम तेल बाजारात उपलब्ध आहेत.

परंतु वेळीच तुम्ही घरीच योग्य पद्धतीने काळजी घेतली तर तुम्हाला त्यापासून बराच आराम मिळू शकतो. सांधे दुखत असतील तरी देखील त्यांची नियमितपणे हालचाल असणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी तुम्ही सूर्यनमस्कार, चालणे, धावणे यांसारखे सोपे व्यायाम नियमित कररु शकता. रोजच्या आहारामध्ये कॅल्शिअम व प्रथिनयुक्त पदार्थ जास्तीत जास्त समाविष्ट करा.

हिरव्या पालेभाज्या व फळे, सॅलेड, दूध, अंडी, कडधान्ये यांचे प्रमाण देखील आहारात मुबलक असावे. बाह्य उपचारांसोबतच अंतर्गत उपचार केल्यास आजार लवकर बरा होण्यास मदत होते. अनेकदा संधिवात असणाऱ्यांना आंबवलेले पदार्थ म्हणजे इडली, उत्तप्पा, डोसावगैरे अजिबात खाऊ नये असा सल्ला डॉक्टर देतात. एक गोष्ट लक्षात घ्या संधिवात हा पूर्ण बरा होत नाही.

हे वाचा:   सतत डोळे फडफडत असतात का? व्हा सावधान.! असू शकते गंभीर आजाराचे लक्षण; जाणून घ्या नेमके काय होत असते.!

परंतु जर तुम्ही योग्य काळजी घेतली तर त्याचा त्रास तुम्ही नक्कीच कमी करु शकता. विटामिन डी च्या शरीरातील कमतरतेमुळे हाडांची झीज होऊन हाडं दुखू लागतात. संधिवाताचा त्रास असलेल्यांनी तेलकट पदार्थ, बेकरी फुड, मीठ, तंबाखू, दारु या पदार्थांचे सेवन टाळणे फारच गरजेचे असते. नाहीतर यामुळे तुमचा त्रास अधिक वाढू शकतो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे वजन नियंत्रणात ठेवणं.

संधीवतामध्ये अनेकदा हाडांना सूज येते तसेच सांधे कडक पडतात सोबतच कधीतरी अचानक तीव्र वेदना जाणवू लागतात अशा वेळी गरम पाण्याचा शेक घेणे फायदेशीर ठरते. यामुळे सांध्यांना आलेली सूज देखील कमी होते. अनेक जणांना पायावर नसा जमा होऊन त्रास होतो. तमालपत्र आणि इतर घटक या सर्व त्रासामध्ये मध्ये कसे उपयोगी पडते ते पहा. जाणून घ्या अनोखा उपाय.

हे वाचा:   आंबे खाऊन कोय फेकून देणाऱ्यांनो, एकदा हे नक्की वाचा, वाचल्यानंतर एकही कोय फेकून देणार नाहीत...!

तीळ तेल, मोहरी तेल, तमालपत्र या तीनही गोष्टी आपल्याला लागणार आहे. आपण बनवत आहोत एक गुणकारी तेल. हे तेल तुम्ही जास्त प्रमाणात बनवून बाटलीमध्ये साठवू शकता. ६-७ तमालपत्र बारीक करून घ्या. यामध्ये तीळ तेल व मोहरीचे किंवा दोन्ही पैकी एक असे मिक्स करून ती बाटली चार दिवस कडक उन्हात मुरायला ठेवावी.

या मुरलेल्या तेलाने दररोज तुमच्या दुखणाऱ्या भागावर हलक्या हाताने मसाज करून तेल चांगले मुरवा..लावताना हे तेल कोमटसर गरम करा. सकाळी तेल लावून उन्हात बसल्यावर अजून फायदा होईल. या तेलाने केसावर मालिश केल्यास केस गळतीची समस्या देखील थांबेल..! जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *