केवळ एकदाच करा हा प्रयोग, नेहमीचे दुखणारे गुडघे, उतारवयात होणारी सांधेदुखी, अंगदुखी कायमची पळून जाईल.!

आरोग्य

आपल्या शरीराची काळजी घेण्यासाठी तुम्ही दिवसभरातून किती वेळ देता?कदाचित तुमच्याकडे या प्रश्नाचं उत्तरच नसेल. कारण असंख्य कामांमध्ये व्यस्त असलेल्या खूप जणांना स्वतःची काळजी घेण्यासाठी वेळच नसतो. पण आपल्या शरीररूपी यंत्राची वेळीच योग्य देखभाल न केल्यास हे यंत्र निकामी होऊ शकते. हल्ली अनेकांना पाठ दुखी, कंबर दुखीचा, सायटीका चा त्रास होतो.

पाठीचा कणा, कंबर, कमरेखालील भाग संपूर्ण शरीराला आधार देतात. आजकाल वर्क फ्रॉम होम मुळे एकाच ठिकाणी तास-न्-तास बसून राहिल्यानंतर पाठीच्या मणक्यावर वाईट परिणाम होतात. यामुळे कदाचित चालणे, बसणे आणि उठणे देखील त्रासदायक ठरू शकतं. भविष्यात पाठ दुखी, कंबर दुखीसारखे गंभीर आजार होऊ नयेत, यासाठी ‘योग’चा मार्ग स्वीकारावा.

आणि झाल्यास काही घरगुती उपाय करून बघा. आजकाल कंबरदुखीमुळे युवा असो वा महिला असो, सगळेच हैराण असतात. प्रत्येकाच्या कंबरदुखीची समस्या वेगवेगळी असते. पण सगळ्यांनाच यापासून लवकरात लवकर सुटका हवी असते. तर कमरेला दुखापत झाल्यास तुम्हाला चालण्यास, उठण्यास, बसण्यास त्रास होऊ शकतो. वाढत्या वयासोबत गुडघे व शरीराचे इतर सांधे दुखी सुरू होते.

हे वाचा:   अंडी खाणाऱ्या बऱ्याच लोकांना गावरान अंडी, बॉयलर अंडी आणि आर आर अंडी काय असते माहित नाही.! यामध्ये असतो हा फरक.!

शरीरातील सांधे असे अवयव असतात जेथे दोन किंवा त्यापेक्षा जास्त हाडे एकमेकांना जुळलेले असतात. गुडघे हे देखील शरीराचे सांधे आहेत. त्यासाठी आम्ही तुम्हाला काही टिप्स देणार आहोत आणि घरगुती उपाय सुचवणार आहोत. ते पुढीलप्रमाणे असे. यात आपल्याला लागणार आहे एरंडी तेल, मोहरी तेल आणि तीळ तेल. एका कढाई मध्ये हे तीनही तेल समप्रमाणात घेऊन गॅस वर गरम करायला ठेवा.

यामध्ये सात ते आठ लसूण पाकळ्या सोलून छोटे तुकडे करून घाला. लक्षात ठेवा गॅस मंद ठेवा. चमच्याने तेल सतत हलवत रहा. यात अर्धा चमचा हळदी पावडर घाला. पाच सात मिनिटं हे शिजवा. गॅस बंद करा. थंड होण्यासाठी ठेवा. दुसरकडे लोखंडी तवा गरम करायला ठेवा. यावर रुई चे पानं नीट तोडून घ्या. आणि तव्यावर ठेवून फडक्याने शेकवा. (विषारी असल्याने काळजी घ्या.)

हे वाचा:   वाढते वजन कमी.! पित्त अजिबात नाही.! गुडघेदुखी थांबवा.! जमेल तेव्हा फक्त तीन वेळा गरम पाण्यात घ्या.!

ज्या भागावर मालिश करायची आहे त्यावर तो भाग साफ करून कोरफड गर लावा. त्यावर आपण बनवलेले हळदीच तेल कोमटसर करून लावा. पाच मिनिटं मसाज करा. त्यावर गरम केलेले रुई ची पानं लावा. ती सुती फडक्याने बांधा. Kneecap असल्यास ती पण चालेल. रात्रीतून हा उपाय करा. सकाळी कोमट पाण्याने पुसून अंघोळ करा.

टीप: आहारात कॅल्शियम युक्त पदार्थ्यांचे सेवन वाढवा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *