जर चिंगम गिळले गेले तर त्या व्यक्तीचा मृ’त्यू होतो का? चिंगम खाण्या आधी नक्की वाचा, शरीरावर होणारे हे परिणाम नक्की जाणून घ्या.!

आरोग्य

बऱ्याच जणांना तोंड ओले ठेवण्यासाठी किंवा तोंडाची दुर्गंधी येऊ नये याकरता चिंगम चघळत राहण्याची सवय असते. लहान मुलांमध्ये चिंगम खाण्याचे प्रमाण जास्त आहे. तुमच्यापैकी अनेक लोकांनी देखील कधी ना कधी चिंगम चघळलेच /खाल्लेच असेल. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना रोजच चिंगम खाण्याची सवय असते. तुम्ही कधी विचार केला आहे का असे चिंगम पोटात गेल्यानंतर म्हणजे तुम्ही गिळून टाकले तर काय होईल?

याचा तुमच्या शरीरावर काय प्रभाव पडेल हे तुम्हाला माहीत आहे का? काय तुम्हाला नुकसान पोहोचेल की काहीच होणार नाही हे सारे प्रश्न तुम्हाला पडले असतील? सर्वात आधी आम्ही तुम्हाला चिंगम चघळण्याचे फायदे सांगत आहोत.. जेव्हा एखादी व्यक्ती चिंगम चावत असते त्या व्यक्तीच्या तोंडाच्या जबड्याच्या सर्व नसा पेशी कार्यरत होतात. यामुळे रक्तप्रवाह होतो. त्यामुळे त्या व्यक्तीचे डोके मेंदू तल्लख होतो.

होय, जादू चिंगम मध्ये नाहीतर तुमच्या चावण्याच्या कृतीमध्ये आहे. तुम्ही कोणतीही गोष्ट सलग चावल्यास तरीदेखील तुमचा मेंदू तल्लख राहील. कारण मी तुमचे तोंड चालवत आहात. परंतु सलग तुम्ही खाल्ले तर तुमच्या शरीराला नुकसान पोहोचेल म्हणून चिंगम चा वापर केला जातो. तुम्हाला क्रिकेटच्या मॅच मध्ये देखील खेळाडू खेळताना चिंगम चावत असल्याचे निदर्शनास आले असेल.

हे वाचा:   एक कोंबडी महिन्याभरात किती अंडी देत असते??? अंड्याचे शौकीन असणाऱ्या बऱ्याच जणांना माहित नाही उत्तर.!

कारण मॅचच्या मध्ये तहान लागू नये आणि दीर्घ काळासाठी त्यांना खेळता यावे म्हणून ते असं करत असतात. आता जाणून घेऊयात चुकीन चिंगम गिळले गेले तर काय होईल? कोणतेही अन्न ज्यावेळेस आपण गिळतो ते आपल्या पचन क्रियेमध्ये जाते. तसेच चिंगम गिळल्यानंतर ते देखील आपल्या पचनक्रिया मध्ये जाईल. त्याच पचन क्रियेमध्ये अन्नाचे पचन होते.

परंतु जेव्हा गोष्ट चिंगमची असेल, तेंव्हा ते आपल्या पोटातील पचन क्रियेमध्ये पचत नाही. जर तुमची अन्ननलिका सामर्थ्यवान असेल तर कठीणातील कठीण गोष्ट देखील ती आरामात पचवू शकते. अस खूप कमी प्रमाणात होते. आपल्या सर्वांच्या शरीरात अन्नपचन प्रक्रियामध्ये घटक असतात की ज्यामुळे तर अन्न पदार्थाप्रमाणे चिंगम चे छोटे छोटे तुकडे होऊ शकत नाहीत.

असे चुकून झाले तरी देखील तुम्हाला घाबरून जायची गरज नाही. चुकून चिंगम गिळले असेल तरीदेखील तुम्ही यामुळे म’रणार नाही कितीही कठीण असले तरी देखील शेवटी तुमचे शरीर याला पचवूनच दाखवेल. कस? मित्रांनो चिंगम शरीरात पचून तर जाते परंतु याला सात वर्षाचा कालावधी लागतो. म्हणजेच सात वर्षापर्यंत तुम्ही गिळलेले चिंगम तुमच्या शरीरात एखाद्या प्लास्टिक प्रमाणे पडून राहते.

हे वाचा:   चार दिवस सलग प्या, वजन इतके कमी होईल की सर्वजण बघतच बसतील, दुपटीने वजन कमी करण्याचा उपाय.!

त्याचा असा कोणताही नक्की कालावधी नसतो कारण प्रत्येकाचे पचनक्रिया वेगवेगळी असते. चावण्याच्या क्रियेमुळे चिंगम आपल्या शरीराला फायदेशीर आहेच. शास्त्रज्ञांच्या शोधाच्या अनुसरेतुम्ही कोणत्या तणावात असाल वारंवार एखाद्या गोष्टीचा विचार करत असाल तर अशा वेळी तुम्हाला चिंगम चावले पाहिजे. त्यामुळे तुमचे टेन्शन खूप प्रमाणात कमी होईल.

तुमच्या शरीरातील हिप्पोकॅम्पस नावाचा भाग ऍक्टिव्हेट होतो. हा मेंदूमधील असा भाग आहे की जो आपल्याला गोष्टी लक्षात ठेवायला मदत करतो. यावर अनेक जण संशोधन देखील करत आहेत. तेव्हा तुम्ही चिंगम चघळा चावा परंतु पोटात गिळले जाणार नाही याची काळजी घ्या. याशिवाय खाल्लेले चिंगम रस्त्यावर फेकू नका कारण जनावरांनी हे खाल्ल्यास त्यांना देखील नुकसान होऊ शकते. आज साठी एवढेच..!

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *