स्वयंपाक घरात करायला हवे हे जुगाड.! फारच कमी महिलांना हे जुगाड माहिती आहे.! झटपट कामे करायची असल्यास नक्की वाचा.!

आरोग्य

मंडळी, अनेक सोप्या युक्त्या वापरून आपण आपले दैनंदिन जीवन सुखकर करू शकतो. अशा बऱ्याचशा ट्रिक्स आपल्याला आपल्या आई आजीकडून सांगितल्या जातात. परंतु काही लोकांना त्या ज्ञात नसल्यामुळे आपण या एकमेकांसोबत शेअर करूयात. आणि आपले सगळे सहज-सोपे बनऊयात. चला तर मग फार वेळ न घालवता पाहूयात आजच्या सोप्या ट्रिक्स..

१. आजकालच्या भयानक प्रदुषणाच्या काळामुळे घसा खवखवू लागला की आपल्याला टेन्शन येते. सध्याचे वातावरण आणि परिस्थिती फारच चिंताजनक आहे. आपल्याला झालेले इन्फेक्शन सहज कोणालाही होऊ नये अशी काळजी वाटत राहते. घसा खवखवत असेल तसेच दुखत असेल किंवा खोकला येत असेल तर तुम्ही ही ट्रिक्स अवश्य करून बघा. आलं स्वच्छ धुवून, त्याचे साल काढून छोटे बारीक काप करून घ्या. मंद आचेवर तवा ठेवून हे तुकडे त्यावर ठेवा.

चमच्याने उलट सुलट करून हे शिजवत रहा. आल्याचा सुंदर वास येईल. दुसरीकडे एका वाटीत थोडसे सैंधव मीठ किंवा काळे मीठ घाला. यात एक चमचा मध ऍड करा. त्यानंतर थोडीशी मिरपूड घालून मिश्रण नीट मिक्स करा. यात गरम आल्याचे तुकडे घालून दहा मिनिटे झाकून ठेवा. एखादा गोळीप्रमाणे तोंडात टाकून चाखत राहा. घशात खूप आराम मिळेल.

२. सध्याच्या थंडीच्या ऋतूत अनेक गोष्टी गोठतात. जसे कि नारळाचे तेल. जेव्हा आपण केसाला नारळ तेल लावायला बसतो त्यावेळेला नेमके ते गोठले असते. त्याचप्रमाणे मध देखील थंडीमध्ये गोठतो. परंतु आता काळजी करू नका. एका भांड्यामध्ये गरम पाणी घेऊन त्यामध्ये मधाची बाटली किंवा नारळाचे बाटली ठेवा. वीस ते तीस सेकंदामध्ये तुमचे तेल आणि मध जाईल वितळून.

हे वाचा:   तांदळाचे पाणी म्हणजे एक प्रकारचे अमृतच, फायदे येवढे आहेत की लगेच तुम्ही बनवून असा कराल उपयोग...!

आता तुम्ही सहजपणे तेल मध अशा गोष्टी वापरू शकता थंडीमध्ये देखील.. ३. थंडी मध्ये भाज्या स्वस्त असल्यामुळे आपण अनेक भाज्या खरेदी करतो. अनेकदा फ्रीजमध्ये ठेवून देखील भाज्या सुकून जातात. अशा भाज्या चवीला चांगल्या लागत नाहीत. भाज्या अगदी ताज्या राहाव्यात यासाठी काय करावे? एका पातेल्यामध्ये पाणी घालून त्यामध्ये अर्धे लिंबू पिळा.

यामध्ये त्या भाज्या पंधरा मिनिटांसाठी घाला. पंधरा मिनिटांनंतर भाज्या बघून तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्या इतक्या ताज्या कशा झाल्या? ४. फ्लॉवर थंडी मध्ये जो येतो तो अत्यंत चविष्ट असतो. अनेक वेगवेगळ्या पदार्थांमध्ये आपण फ्लॉवरचा वापर करतो. परंतु फ्लॉवर मध्ये थोडे छोटेसे हिरव्या पांढऱ्या आळ्या/ किडे असतात. अशात रिस्क घेऊ नका. यासाठी एका भांड्यामध्ये पाणी घालून एक छोटा चमचा मीठ टाकावे.

त्यानंतर हळद किंवा बेकिंग सोडा घालून हे भांडे गॅस वर ठेवून मध्यम आचेवर पाणी उकळवा. त्यात फ्लॉवर चे काप करून घाला. दोन मिनिटे हलवून गॅस बंद करून दहा मिनिटे झाकून ठेवा. किडे जाऊन स्वाद चांगला राहील. फ्लॉवर उकळवू नका. पाणी आणि साफ फ्लॉवर वेगळे करून थंड पाण्याने धुवून वापरा.

हे वाचा:   या एका उपायाने लहान मुलांच्या त्वचा सारखी मऊ होईल तुमची चेहऱ्यावरची त्वचा.!

५. आपल्याला नेहमी फायबरयुक्त ताजी फळे खाल्ली पाहिजेत. फळांच्या ज्यूस पेक्षा ताजी फळे अधिक फायदेशीर असतात. परंतु बऱ्याचदा लहान मुले फळं खाण्यासाठी टाळाटाळ करतात अशा वेळी त्यांना ज्युसच बनवून द्यावा लागतो. संत्र अर्धे कापून घ्या. ज्यूसर मिक्सर नसेल तर एका वाटीत ग्लास पालथा घालावा. ग्लासाच्या तळाला अर्ध संत्र घासून त्यातील रस वाटीमध्ये पडेल.

रस गाळण्यापेक्षा बिया काढून फायबरयुक्त ज्यूस पिण्यास घ्या. आम्हाला खात्री आहे की या सोप्या ट्रिक्स तुमचे जीवन सोपं व आरामदायक बनवेल. या ट्रिक्स तुम्ही आपल्या मित्रपरिवाराला सोबत देखील नक्की शेअर करा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *