हे चार लक्षणे दिसून आली तर समजा तुमचे हृदय आता होणार आहे निकामे.! अगोदरच व्हा सावध.!

आरोग्य

मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत हृदयासंबंधीच्या आजाराबद्दलची माहिती. भारतात प्रत्येक वर्षाला सत्तर लाखाहून अधिक लोक हृदयासंबंधी च्या आजारांमुळे मृ’त्यू पावतात. एका आरोग्य संबंधित संशोधनानुसार 2030 पर्यंत हा आकडा २.३ करोड पर्यंत जाऊ शकतो. हेच नाही तर एक अजूनही आहे जो जास्त भयानक आहे. ४०% लोकं त्यांचे वय ५५ वर्षांपेक्षा कमी आहे, त्यांच्यामध्ये हार्ट अटॅक ची समस्या सुरू होते.

आज-काल युवकांमध्ये देखील हे प्रमाण तेजीने वाढत चालल्याचे दिसत आहे. चला तर मग जाणून घेऊयात ही आवश्यक अशी महत्वाची माहिती जी सर्वांना माहित असणे गरजेचे आहे. कोरोनरी आर्टेरी डिसिज: याचा अर्थ असा होतो की हृदयामध्ये रक्तप्रवाह करणाऱ्या नसांमध्ये ब्लॉकेज होणे. याचं मुख्य कारण आहे डायबिटीस. हाय ब्लड शुगर मुळे हृदयातील नसांना नुकसान पोहोचते आणि त्या ब्लॉक होतात.

दुसरे कारण उच्च रक्तदाब असणे. तिसरं कारण स्मोकिंग अथवा तंबाखूचे सेवन करणे अथवा अनुवंशिकता हेदेखील कारण असू शकते. हाय कोलेस्टेरॉल शरीरात झाल्यामुळे देखील नसा ब्लॉक होतात. यामुळे हार्ट अटॅक येऊ शकतो. यामध्ये एन्जोग्राफी करून ब्लॉकेज कीती आहे ते कळते त्यानंतर एन्जोप्लास्टी अथवा बायपास सर्जरी देखील केली जाते.

कार्डियो मायोपॅथी : याचा अर्थ हृदयामध्ये असलेल्या मासपेशीना नुकसान पोहोचणे ज्यामुळे हृदयाचे काम थांबते. रोजचे अल्कोहोल घेणे पडू शकते महाग. किंवा यामध्ये अनेक मास पेशींचा थर वाढून हृदयाचे काम थांबते. याचं मुख्य कारण अनुवांशिकता हेच असते. काही औषध उपचारांनी हा त्रास कमी होऊ शकतो. CRT( क्याथोड रेड ट्यूब ) हे मशीन आपल्या हृदयाचे पंपिंग व्यवस्थित करण्यास मदत करते. या आजरामध्ये अचानक मृत्यूचा खूप धोका असतो.

हे वाचा:   कायमचा झोपणारा उठून पळू लागेल.! पान फक्त तोंडच लाल करत नाही तर त्याचे फायदे असंख्य आहेत.! या आजाराने ग्रस्त व्यक्ती फाड फाड बोलू लागेल.!

वलव्ह्यूलर हार्ट डिसीज : याचा अर्थ आपल्या हृदयामध्ये चार कप्पे (वोल्व ) असतात, त्यापैकी कोणत्याही एका वॉल्व चा साईज कमी होऊन तो निकामी होणे. किंवा यामध्ये डॅमेज होऊन लिकेज होणे. आपल्या भारतामध्ये वय वर्षे पाच ते पंधरा मध्ये असा आजार असतो. जो वाढण्यास वेळ लागतो त्यामुळे तीस ते चाळीस वर्षांनी आपल्याला समजते. अनेक प्रकारच्या इन्फेक्शन मुळे देखील वॉल्व डॅमेज होऊन लिकेज होते.

काहींना अगदी जन्मापासूनच हा आजार असू शकतो. यामध्ये वॉल्व रिप्लेसमेंट सर्जरी होते. एंजाइना : हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या तीन नसा असतात. या कोणत्याही नसांमध्ये ब्लॉकेज आल तर आपले हृदय नीट काम करू शकत नाही. हृदयावर ताण येऊन हृदयापर्यंत ऑक्सिजन पोहोचत नाही त्यावेळेसचे दुखणे होते याला एंजाइना पेन म्हणतात. आराम केल्याने हे दुखणे थोडे कमी होते. आजार वाढल्यास छोट्यामोठ्या कामांमध्ये देखील अडथळा येतो.

हे वाचा:   लाखो लोक याला कचरा समजून फेकून देतात .! परंतु निघाली आयुर्वेदातील खूप मोठी वनस्पती याचे फायदे बघून स्वतःच्या डोळ्यावर सुद्धा विश्वास राहणार नाही.!

लक्षणं : छातीच्या मधोमध दुखणे, मोठ्याने धडधडणे, जड वाटणे, जळजळ होणे, चालताना त्रास होणे घाबरल्या सारखे होणे अथवा श्वास घेण्यास त्रास होणे. खांदा दुखणे. आता ही लक्षण गॅस एसिडिटी यामुळेदेखील होऊ शकतात. परंतु वारंवार असे होत असल्यास डॉक्टरांकडे जाऊन ECG, हृदयाची सोनोग्राफी किंवा ट्रेडमिल टेस्ट अशा चाचण्या करून घ्या. यात प्रॉब्लेम आढळल्यास ऍन्जिओग्राफी चा सल्ला दिला जातो. यासोबतच तुमचे रक्त तपासले जाते ज्यामध्ये शुगर आणि कोलेस्ट्रॉल यांचा समावेश असतो.

एकदा ब्लॉकेजेस किती गंभीर आणि कोणत्या प्रकारचे आहे कळाल्यानंतर पुढची ट्रीटमेंट ठरवली जाते. जसे एन्जोप्लास्टी होणार की बायपास सर्जरी होणार की फक्त औषधांनीच याचा इलाज केला जाऊ शकतो. ही लक्षण उपचार पद्धती तुम्ही माहीत करून घेतलीच आहे तर त्यासोबतच आपल्या प्रिय व्यक्तींसोबत नक्की शेअर करा. तुमच्या एका शेअर मुळे या माहितीचा कोणा गरजू व्यक्तीला याचा निश्चितच फायदा होईल..!

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *