या चुका करणाऱ्याला सर्वात भयंकर आजार मूळव्याध होतो.! मूळव्याधीची आहेत ही कारणे.!

आरोग्य

नमस्कार मित्रांनो, आपल्याकडे भारतामध्ये सामान्यपणे सर्वत्र आढळणारा रोग म्हणजे मूळव्याध, पाइल्स, बवासीर..! तुम्ही गाव आणि शहराच्या कडेला भिंतींवरती काही जाहिराती बघितल्या असतील. मूळव्याधीची समस्या असेल तर अमुक तमुक वैद्याला भेटा. त्वरित होईल इलाज, वगैरे वगैरे. आता आम्ही काय सांगतो ते नीट ऐका असं अजिबात करू नका.

पाइल्स मुळव्याध हा अत्यंत सर्वसाधारण रोग आहे. परंतु लाज वाटल्यामुळे अनेक लोक डॉक्टरांना पर्यंत पोहोचत नाही आणि तसच सहन करत राहतात. यामुळे योग्य वेळी योग्य उपचार होत नाहीत परिणामी तुमच्या आरोग्यासोबत तुम्ही खेळ करता. अशा फसव्या जाहिरातींना भुलून तुम्ही तुमचा उपचार करायला गेल्यास मुळव्याध तर ठीक होणार नाहीच पण तब्येत अजून खराब होईल.

मूळव्याध हा बाकी रोगांत प्रमाणेच रोग आहे त्यामध्ये लाज वाटण्याचे काही कारण नाही. सगळ्यात आधी जाणून घेऊयात मुळव्याध का आणि कशी होते? मुळव्याध म्हणजे मलद्वारात सुजलेल्या नसा होय. तुमच्या कुटुंबातील आई-वडिलांना मुळव्याधीचे समस्या असल्यास तुम्हाला देखील होऊ शकते. याचं सगळ्यात सर्वसाधारण कारण आहे मलद्वारा मध्ये दबाव वाढणे.

हे होते कारण जर तुम्ही शौचाच्या वेळी जास्त जोर लावत असाल तर. तुम्हाला लठ्ठपणा असल्यास किंवा तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास असल्यास, तुम्ही वजन उचलण्याचे काम करत असाल अथवा तुमच्या अन्नपदार्थांमध्ये फायबर युक्त अन्नाचे सेवन कमी होत आहे, किंवा गर्भ अवस्था मध्ये देखील पाइल्स होऊ शकतो. लक्षण : दोन प्रकारच्या मुळव्याध असतात. आतून किंवा बाहेरून.

हे वाचा:   भूक लागत नाही ना जेवण पचते.! उन्हाळ्यात एक लिंबू तुमची मदत करू शकते.! अनेक डॉक्टर सुद्धा हाच उपाय करतात.!

बाह्य मूळव्याधीची लक्षणे आहेत, दुखणे, शौचा मधून रक्त जाणे, मला द्वारा च्या आसपास खाज सुटणे, बाहेर काही निघाले आहे असे वाटणे, सूज येणे, यामध्ये रक्त जमल्यास अत्यंत दुखणे वाढणे. आतून मूळ जात असते त्यामध्ये दुखत नाही परंतु शौचातून रक्त पडते. तुमच्या लक्षणांवरून डॉक्टर अंदाज लावू शकतात तुम्हाला मुळव्याध आहे. या अंदाजाची खात्री करण्यासाठी डॉक्टर मलद्वाराची चाचणी करतात.

गरज भासल्यास आतडे आणि मलद्वार मध्ये दुर्बीण घालून बघावे लागते. ज्याला Anoscopy किंवा Sigmoidoscopy म्हणतात. शौचा मधून पडणाऱ्या रक्ताला कधीही मडक्यात घेऊ नका, हे गंभीर आजार जसे मलद्वार, रेक्टमचा कॅन्सर किंवा Inflammatory Bowel डिसीज(IBD) चे लक्षणे असू शकतात.

उपाय: सगळ्यात आधी आहारात बदल करावा. फायबरयुक्त आहाराचे अन्नपदार्थ जास्त वाढवा. पालेभाज्या, फळं, डाळी इत्यादी. 20 ते 25 ग्रॅम आहारात फायबर असावे. भरपूर पाणी पिल्याने मल कडक होणार नाही. ज्यामुळे तुम्हाला जोर लावावा लागणार नाही. चांगल्या व्यायाम करा ज्यामुळे तुमच्या आतड्यांची हालचाल ठीक राहील. काहीच शक्य नसेल तर पाऊण तास चाला.

शौ’चाला लागल्यास थांबू नका. जास्त वेळ रोखल्याने मलद्वारावर प्रेशर येईल. शौच च्या वेळी जास्त जोर लावू नका. लठ्ठपणा असल्यास वजन कमी करा. दुखत असल्यास मलद्वाराच्या आसपास आइस पॅक लावा. कोमट पाण्यामध्ये डेटॉल घालून टब मध्ये पाच ते दहा मिनिट बसा. दोन ते पाच दिवसात लक्षण कमी होत नसतील तर डॉक्टरांशी संपर्क साधा. तुमचा इलाज औषध किंवा ऑपरेशन होऊ शकतो.

हे वाचा:   नाकाच्या ऍलर्जी मुळे नाक वाहते का? नाक गळती, जुनाट सर्दी सर्व समस्या दूर करा अशा प्रकारे.! बस फक्त एक वेळेस खा.!

रस्त्यावरच्या जाहिराती वाचून वैद्य हकीम यांच्या नादी न लागता कोणतेही औषध खाऊन स्वतःची तब्येत धोक्यात घालू नका. मित्रांनो असे सांगितले जाते की जर महिला बाळास स्त’नपान करत असेल तर तिने साधे भोजन केले पाहिजे अन्यथा बाळाच्या तब्येतीवर याचा परिणाम होईल. परंतु हे सत्य नाही. आपल्या शरीरातील पचनक्रिया खाल्लेले अन्न छोटा तुकडा मध्ये तोडते. तुम्ही तुमचा आहार संतुलित ठेवण्याचा प्रयत्न करावा.

हेल्थ टिप: मुळा, गाजर,बीट यांसारखे जमिनीत उगवणारे कंद तुमच्या आहारात थंडीमध्ये नक्की समाविष्ट करा. यामुळे तुमच्या शरीरामध्ये उब निर्माण होते. परंतु याचे प्रमाण संतुलित असावे. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *