म्हातारपण आरामात घालवायचे असेल तर हे एक काम कराच.! गुडघेदुखी, हात-पाय, टाचा आणि कंबर दुखी कधीच होणार नाही.!

आरोग्य

मित्रांनो आज काल प्रत्येकाच्या घरात कोणी ना कोणी कंबर दुखी, गुडघेदुखी, सांधेदुखी, हात पाय, टाचा मान दुखी इत्यादी प्रकारच्या दुखण्याने त्रस्त असल्याचे पहायला मिळते. पूर्वी अशा प्रकारचे दुखणे हे वयोमानानुसार सहाजिकच होते परंतु आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे आणि आहारातील कमालीच्या बदलांमुळे असे दुखणे अगदी तरुण वयात देखील पाहायला मिळत आहे.

आज-काल वर्क फ्रॉम होम चा ट्रेंड आहे. यामुळे व्यायामाचा अभाव होतोय. कामाचा ताणतणाव यामुळे पुरेशी झोप होत नाही. याचा दुष्परिणाम मात्र शरीराच्या अवयवांना पर्यायाने आपल्यालाच भोगायला लागतो. आज आम्ही तुमच्या सोबत एक असाच उपाय शेअर करत आहोत जो तुम्हाला अशा विविध प्रकारच्या दुखण्या मध्ये कमालीचा आराम देईल. तेही अगदी कमी किमतीमध्ये.

दुखण्याकडे वेळीच लक्ष दिले नाही तर पुढे जाऊन भयंकर समस्या ओढावतात तर कधीकधी शस्त्रक्रिया हाच पर्याय राहतो. दवाखान्याचा व औषधांचा खर्च वाढत राहतो म्हणून वेळीच उपाय करा. चला तर मग हा घरगुती उपाय जाणून घेऊयात. या उपायासाठी आपल्याला लागणार आहेत जायफळ. आयुर्वेदात देखील अनेक औषधे बनवण्यासाठी जायफळचा वापर केला जातो.

हे वाचा:   सलग महिनाभर जर एखाद्याने सोप खाल्ली तर काय होईल.! वाचून थक्क व्हाल.! बडीशेप खाणारे एकदा नक्की वाचा.!

जायफळ यामध्ये ट्रायमिरस्ट्रेन नावाचा घटक आढळतो. यामुळे आपल्या शरीरातील स्नायू आणि चेतासंस्था आरामदायी स्थितीत येतात. जायफळ यामुळे रात्री उत्तम झोप लागते. गोडाचे पदार्थांची चव वाढवण्यासाठी जायफळ चा उपयोग केला जातो. यामध्ये एंटीऑक्सीडेंट आणि anti-inflammatory गुणधर्म असतात. जायफळ यामुळे आपल्या हृदयाचे आरोग्य देखील उत्तम राहते.

संक्रमणामुळे होणारे आजार देखील दूर राहतात. जायफळ वात नाशक व पित्तशामक असते. आपली पचनक्रिया व्यवस्थित राहते. डोळ्यांसाठी देखील फायदेशीर आहे जायफळ. या सोबतच तोंडाची दुर्गंधी देखील दूर होते. एक चमचा जायफळाची पावडर दुधात मिसळून पंधरा मिनिटांसाठी चेहर्‍यावर लावल्याने, चेहऱ्यावर असलेले डाग पिग्मेंटेशन सुरकुतले पणा जातो.

अभ्रक लहान बाळाचे पोट दुखत असल्यास जायफळ दुधात उगाळून बोटाने चाटण करतात. गॅसच्या सर्व समस्या ठीक होतात. जायफळ कुटून किंवा किसून त्याची पावडर तुम्ही बनवू शकता. एक ग्लास दूध घ्या. ते गरम करताना यामध्ये पाव चमचा जायफळ पावडर घाला. गोडी साठी या दुधामध्ये गोड घाला पण दुध गरम झाल्यावर खाली उतरवून नंतर गुळ घाला.

हे दुध गरम गरम रात्री झोपताना प्यार तुम्हाला निद्रानाशाचा त्रास होणार नाही. आता पाहुयात जायफळाचे तेल कसे बनवायचे? एक वाटी तिळाचे तेल अथवा मोहरीचे तेल घ्या. यामध्ये जायफळाचे पावडर अथवा सुपारी प्रमाणे बारीक केलेले जायफळचे तुकडे घाला. यामध्ये एक चमचा ओवा घाला. मंद आचेवर हे तेल गॅसवर शिजवा. यामध्ये दोन चिमूट हळद घाला.

हे वाचा:   एवढे केसांना लावा, लांबसडक व घनदाट केस होतील, केसांची मजबुती आणखी वाढेल...!

या तेलाने तुमच्या शरीराच्या दुखणाऱ्या अवयवावर मालिश करा. तुमच्या हाडांचे दुखणे, सूज येणे एकदम ठीक होईल. गरम करुन तेल लावल्याने जास्त फायदा होईल. अधिक प्रभावशाली उपायासाठी या तेलाची मालिश उन्हात बसून करा. अशाप्रकारे बहुगुणी असते जायफळ! त्याचा उपयोग तुम्ही नक्की करून बघा. उपाय आवडल्यास आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *