चष्मा पासून मुक्तता हवी असेल तर, हा खास उपाय तुम्हाला भरपूर फायदा करून देईल.! थेट चष्मा घालनेच करावे लागेल बंद.! डोळ्यांची ताकद दहापट वाढवा.!

आरोग्य

मित्रांनो आज-काल वयोवृद्धच नाही तर लहान मुले देखील आपल्या डोळ्यांवर चष्मा चढवून कानावर ओझं बाळगताना आजूबाजूला दिसत असतात. आपल्यापैकी सगळ्यांना चष्मा चा नंबर असतो परंतु तो लावावाच असे काही नाही. जसजसे डोळ्यांची दृष्टी बदलत असते त्यानुसार नंबर कमी जास्त होत असतो असे आढळून येते. दृष्टी कमजोर असलेल्यांनी जर चष्मा वापरलाच नाही तर त्यांना स्पष्ट दिसणे म्हणजे काय हे कळणारच नाही.

अनेक जण चष्मा घालवण्यासाठी लेझर उपचार पद्धतीने किंवा कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरून चष्मा घालवतात. परंतु हे खर्चिक असते शिवाय जोखीमही असते. यामध्ये वय देखील 18 पूर्ण लागते. अनेकदा आपण ऐकले गाजर टोमॅटो केळ पपई हिरव्या पालेभाज्या यामध्ये विटामिन ए जास्त प्रमाणात असते. याचं प्रमाण वाढल्याने आपला चष्मा चा नंबर जातो.

परंतु हे पूर्ण सत्य नाही. हे घटक डोळ्यांसाठी चांगले असतात परंतु ह्याने पूर्ण चष्मा जात नाही. मोबाईल लॅपटॉप च्या बेसुमार वापरामुळे चष्म्याचा नंबर वाढत जातो. मित्रांनो डोळ्यांची होणारी वाढ आपण थांबवू शकत नाही परंतु मोबाईल लॅपटॉप टीव्ही यांसारख्या पासून थोडं अंतर ठेवावे. डोळ्यांची दृष्टी तल्लख करणारे काही उपाय करावे. यांसारख्या गोष्टी आपल्या हातात आहेत.

हे वाचा:   मासे बनवण्याची ही रेसिपी एकदा बनवून बघा.! मासे इतके चवदार बनतील की खाणारे खातच राहतील.!

मधुमेह असलेल्यानी तो नियंत्रित ठेवावा अन्यथा सर्वात मोठा दुष्परिणाम डोळ्यांवर होतो. डोळे दुखायला लागल्यास याकडे त्वरित लक्ष द्यावे अन्यथा याचे दीर्घ परिणाम होतात. सतत स्क्रीनकडे बघितल्यामुळे डोळ्यांवर ताण येतो. डोळे कोरडे पडतात. सतत स्क्रीनकडे बघितल्यामुळे लांबच या गोष्टींकडे व्यवस्थित पाहता येत नाही. यासाठी दिवसा थंड पाण्याने वरच्यावर डोळे धुवावे.

आहारामध्ये गाईचे दूध तूप लोणी ओले बदाम अक्रोड काळे मनुका खजूर यांचे सेवन करावे. योग्य व्यवस्थितरीत्या काळजी घेतल्याने चष्म्याचा नंबर कमी होऊन तो पूर्णपणे जाऊ शकतो. 20-20-20 नियम पाळा म्हणजे वीस मिनिटं स्क्रीन कडे बघितल्यावर वीस फूट लांब असलेल्या गोष्टीकडे वीस सेकंद पाहणे. डोळ्यामध्ये आयुर्वेदिक अंजन घातल्याने देखीलखूप फायदा होतो.

कच्चे दूध गुलाब पाणी यामध्ये कापसाचे डोळे बुडवून डोळ्यावर ठेवा. याचा डोळ्यांना गारवा वाटून दृष्टी सुधारण्यास मदत होते. शक्यतो मानसिक तान तनाव यावर देखील काम करा. करून बघा हा ही उपाय : ज्यामुळे निरोगी होईल तुमची दृष्टी..या उपायात आपल्याला लागणार आहे पांढरी मिरी. काळी मिरी प्रमाणेच पांढरी मिरी देखील आपल्याला दृष्टी सुधारण्यास मदत करते चष्म्याचा नंबर त्वरित हटतो. दुसरा घटक लागणार आहे बदाम.

हे वाचा:   अंडी खाताय.? परंतु आधी हा लेख नक्की वाचा.! पुरुषांनी नक्की वाचा.!

विटामिन सी ने परिपूर्ण असलेल्या बदामाच्या फायद्याविषयी वेगळे सांगणे नको. यानंतर बडीशेप आणि विलायची घ्या. यासोबतच घ्या धागा असलेली खडीसाखर. पन्नास ग्रॅम बदाम व पन्नास ग्रॅम बडीशेप, सहा हिरवी विलायची, दहा ग्रॅम पांढरी मिरी, शंभर ग्रॅम खडीसाखर एकत्र करून मिक्सर मध्ये पावडर बनवा. ही पावडर कोणत्याही हवाबंद डब्बा मध्ये दीर्घकाळ टिकते.

चष्मा घटवण्यासाठी बनवलेली ही पावडर तुम्ही रोज एक चमचा एक ग्लास कोमट दुधामध्ये घालून सकाळी सेवन करावी. करून बघा हा उपाय आणि अशाप्रकारे घ्या तुमच्या डोळ्यांची काळजी. स्वस्थ खा आणि मस्त रहा..! जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *