दातातले किडे झटपट बाहेर काढा.! दात दुखी मिटेल कायमची.! हा देशी उपाय तुम्हाला सर्व दाताच्या समस्येतून मुक्त करेल.!

आरोग्य

नमस्कार मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला अशा एका फुलाबद्दल माहिती शेअर करणार आहोत जे आपल्या आजुबाजुला सर्वत्र आढळतात. सोबतच मंदिरात सुद्धा चौफेर ही फुले लागलेली असतात. देवपूजा ही या फुलांचा वापर होतो. आज आपण या फुलांचे काही औषधी गुणधर्म ही पाहणार आहोत. ते फुल म्हणजेच झेंडू (गेंदा /merry gold)होय. दसऱ्यानंतर थंडीत या फुलांना बहर येतो.

दिसायला सुंदर असलेले हे फूल खूप साऱ्या आयुर्वेदिक औषधांमध्ये वापरले जाते. फुलां सोबतच या झाडाचे मूळ, खोड,पान यांचाही आयुर्वेदिक औषधांत मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. झेंडूच्या फुलाचे झाड चटकन लागते. लावायलाही सोपे आणि मोठ्या प्रमाणात याची फुले उगवतात. कमी जागेतही हे झाड आपण लावू शकतो. खास दसऱ्यासाठी झेंडूच्या फुलांची शेती केली जाते.

फुलांच्या पाकळ्या सुकवून, मातीत रुजवल्या की पंधरा दिवसातच झेंडूचे झाड उगवायला सुरुवात होते. आता आपण बघणार आहोत रोगाचे नाव आणि त्यावर झेंडूचे रोप कसे उपयोगी आहे? मुतखडा/ किडनी स्टोन: ज्यांना मुतखड्याचा त्रास आहे त्यांनी ताजा झेंडूची पाने स्वच्छ धुऊन त्याची बारीक पेस्ट करून रस बनवून घ्यावा. आणि तो रस रोज एक-एक चमचा सकाळी-संध्याकाळी सेवन करा.

असं केल्याने मुतखडा फुटून निघून जातो. किंवा काढा बनवून सुद्धा तुम्ही सकाळी पिऊ शकता. यासोबत तुम्हाला आहार-विहार संतुलीत ठेवायचा आहे शिवाय भरपूर पाणीदेखील प्यायचे आहे. डाग /फोड /व्रण/सूज/चर्मरोग/खाज : वरीलपैकी काहीही झाल्यास, झेंडूचे पाने स्वच्छ होऊन रस बनवून घ्या. व तो संबंधित भागावर लावा.

हे वाचा:   कोण म्हणते कपडे धुणे खूप कष्टाचं काम आहे.! हुशार बायका या घरगुती ट्रिक्स मुळे काही मिनिटात कपडे धुतात.! तुम्हाला माहिती आहे का.?

शरीरावर कोठेही भाजण्याची जळण्याची जखम झाली असेल त्यावरही तुम्ही हा रस लावल्यास जखम लवकर भरते. चेहऱ्यावरील मुरमांवर सुद्धा हा रस लावल्याने मुरूमं कमी होऊन त्वचा तजेलदार होते. शरीरावरील कुठल्याही अवयवाला खूप खाज येत असेल तर झेंडूच्या पानांचा रस लावल्याने खाज थांबते.

कान दुखी : अनेक जणांना कानात पाणी जाणे. पु होणे. ऐकू कमी येणे. खूप मळ साठणे अशा समस्या झालेल्या दिसतात. अशा प्रकारच्या कानांच्या कुठल्याही तक्रारी मध्ये तीन थेंब झेंडूच्या पानांचा रस कापूर सोबत वाटून टाकल्याने त्या समस्या त्वरित दूर होतात. आणि तुमची कान दुखी देखील थांबते. दातदुखी : अनेकदा गोड खाल्ल्यामुळे, चहा कॉफी सिगारेट यांचा अतिरेक, दातांची निगा नीट न राखल्यामुळे, अनुवंशिकता किंवा अन्य कुठल्याही कारणामुळे आपल्याला दातांच्या समस्या उद्भवताना दिसून येतात.

दात किडे होणे, सडणे, कॅविटी होणे यामुळे असहनीय दात दुखी होते. यावर झेंडूच्या पानांचा रस रामबाण उपाय आहे. वर दिल्या प्रमाणे झेंडूच्या पानांचा रस करून घ्यावा. कापसाचा छोटा तुकडा या रसात बुडवून दोन दातांमध्ये(जिथे दुखत आहे ) सुमारे दहा मिनिटे धरावा. तुमचे दात दुखी त्वरित थांबेल. झेंडूच्या पानांतील असलेल्या औषधे गुणधर्मांमुळे दात असलेला किडा निघून जाईल.

हे वाचा:   पोटाची बिघडा-बिघड आता कायमस्वरूपी थांबेल.! महिन्यातून एकदा तरी करावी अशी आतड्याची साफ सफाई.!

कोमट पाणी करून त्यात झेंडूच्या पानांचा रस टाकावा. आणि अशा पाण्याने गुळण्या कराव्यात. दात दुखी मध्ये हा फायदेशीर उपाय आहे. तुम्ही डॉक्टर कडे तर नक्कीच जा पण अशा प्रकारच्या प्रार्थमिक दुखण्यामध्ये या घरगुती उपचारांचा प्रयोग तुम्ही नक्कीच करा तुम्हाला आराम मिळेल. असे हे बहुगुणी असलेल्या झेंडूच्या पानांचा रस डोळे जळजळणे, डोकं दुखणे यावर सुद्धा गुणकारी आहे.

कापसावर झेंडूच्या पानांचा रस घेऊन तो कापूस डोळे बंद करून २० मिनिटे डोळ्यावर ठेवावा. डोळ्यांचे लाल होणे, डोळे जळजळणे हे एकदम शांत होईल. हा उपाय आयुर्वेदिक असल्याने यानी तुम्हाला कोणतेही नुकसान नाही..! वरील टिप्स आणि उपाय तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरतील. गरज व्यक्तींपर्यंत ते अवश्य पोहोचवा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *