मित्रांनो लसुन हा उष्ण प्रकृती असल्याने तसेच चवीला काहीसा उग्र असल्याने अनेकजण याचं सेवन नाक मुरडतच करतात. याच्या उग्र चवी मुळे अनेक जणांना लसूण आवडत नाही. तर अनेक जण लसूण खूप आवडीने खातात. रोजच्या स्वयंपाकातील भाजीमध्ये किंवा लसणाची खास चटणी करून देखील खातात. असा काहीसा आवडता ना आवडता अन्नपदार्थातील घटक म्हणजे लसून. आज आम्ही तुम्हाला लसुन सेवनाचे फायदे सांगणार आहोत.
जे ऐकून तुम्ही लसुन खाण्यास सुरुवात कराल. अशा पद्धतीने व अशा प्रमाणात खातात लसुन. लसणा शिवाय कोणतेही भाजी चवदार बनत नाही. लसूण हा फक्त जेवणाची लज्जत वाढवत नाही तर त्याचे अनेक औषधी फायदे देखील आहेत. लसणामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे विटामिन्स खनिज फायबर मॅंगनीज लोह फॉस्फरस यांसारखे अनेक पोषक तत्व असतात.
लसूण सेवनाचा आपल्या शरीराला उपयुक्त असा फायदा होण्यासाठी लसूण पाकळ्या सोलून त्याचे बारीक तुकडे करावे. दहा मिनिटांनी हे बारीक तुकडे खावेत. यामध्ये Allicin हा प्रभावी घटक तयार होतो. यामध्ये अँटिऑक्सिडंट anti-inflammatory गुणधर्म असतात. यामुळे हृदय विकार हाय ब्लडप्रेशर आणि कोलेस्ट्रॉल कॅन्सर अशा वेगवेगळ्या रोगांपासून आपल रक्षण होते.
एका रिसर्च अभ्यासानुसार दिवसातून एक लसूण पाकळी कच्ची खाल्ल्याने कॅन्सर होण्याची संभावना कमी होते. याशिवाय फुफ्फुस, आतडे, प्रोटेस्ट ग्रंथी स्वादुपिंड यांच्यावर सकारात्मक असा बदल होतो. आपल्या शरीरात अतिप्रमाणात वाईट कोलेस्ट्रॉल जमले तर तुम्हाला हार्ट अटॅक येण्याची शक्यता वाढते. तसेच पक्षाघात होण्याचा संभावना देखिल बळावते. म्हणून शरीरामध्ये चांगल्या कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढणे गरजेचे असते.
याकरता लसणाचे सेवन अत्यंत फायदेशीर आहे यामुळे आपल्या शरीरातील रक्तातील वाईट कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवण्याचे काम केले जाते. यासाठी दिवसभरात दोन ते तीन लसूण पाकळ्या कोणत्या ना कोणत्या स्वरूपात अवश्य सेवन कराव्यात. जगामध्ये अनेक लोक उच्चरक्तदाबामुळे त्रस्त आहेत. यामुळे किडनी निकामी होणे पक्षाघात होणे हार्टअटॅक येणे असे रोग उद्भवतात.
याकरता रक्तदाब नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी आहारात लसणाचा वापर अवश्य करा. कच्चा लसूण पाकळ्या खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो यासोबत धमनी काठीण्यता होण्याचा धोकाही कमी होतो. वाईट कोलेस्ट्रॉल तसेच रक्तदाब नियंत्रित राहील यामुळे तुम्हाला हृदयविकार होण्याची शक्यता कमी होते. आपल्या रक्ताचे शुद्धीकरण होऊन हृदयाला ऑक्सीजन रॅडिकल्स चा प्रभावापासून वाचवतो लसुन.
रक्तवाहिन्यांमध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा येत नाही. यामुळे रक्त गोठणे असा हे विकार होत नाही रक्ताच्या गाठी होत नाही. रक्त पातळ व शुद्ध राहते. आणिक एक महत्त्वाचा भयंकर आजार म्हणजे मधुमेह. इन्शुलिनचे सेन्सिटिव्हिटी कमी झाल्याने टाईप टू मधुमेह होण्याची संभावना वाढते. अशात दोन ते तीन कच्चा लसूण पाकळ्या खाल्ल्याने ही इन्शुलिनची सेन्सिटिव्हिटी सुधारण्यास मदत होते.
आणि अशा प्रकारचा मधुमेह होण्यापासून आपण वाचू शकतो. लसूण सेवनामुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते. हवामानातील बदलांमुळे होणारे सर्दी खोकला अशा किरकोळ आजारांपासून आपण राहतो दूर. इतकेच नव्हे तर तुम्हाला आश्चर्य वाटेल लसुन खाल्ल्यामुळे हिमोग्लोबिन वाढते. लसणामध्ये लोह असते आणि रक्त तयार करण्यासाठी लोह आवश्यक असते. लसूण खाण्यामुळे आयर्न मेटाबोलिजम रेट सुधारण्यात मदत होते.
लक्षात घ्या ज्यांना पोटाचे विकार, अतिसार, एलर्जी, लो ब्लड प्रेशर आहे अशाने लसूण खाऊ नये. तसेच एखादी शस्त्रक्रिया झाल्यावर सुरुवातीचे काही दिवस देखील लसुन खाणे टाळले पाहिजे. गरोदरपणात लसून खावा परंतु प्रमाणात. लक्षात घ्या कोणत्याही गोष्टीचा फायदा हा प्रमाणात खाल्ल्याने होतो. अति प्रमाणात झाल्यास वेगळे रोग उद्भवतात तेव्हा तुमचे काळजी घ्या.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.