वाढते वजन कमी.! पित्त अजिबात नाही.! गुडघेदुखी थांबवा.! जमेल तेव्हा फक्त तीन वेळा गरम पाण्यात घ्या.!

आरोग्य

मित्रांनो आणि मैत्रिणींनो वजन जसे रातोरात वाढत नाही तसे ते एका रात्रीत कमी पण होत नाही..
सावकाश आणि सातत्य असेल तर विजय अवश्‍य होतो. वजन कमी करणे एकवेळ सोपे आहे पण कमी झालेले वजन टिकवणे महा कठीण काम.. जीभेवर संयम ठेवणे फार महत्त्वाचे ..त्यामुळे वाढलेले वजन कमी करण्यासाठी जीवन शैली मधले बदल हे कायम स्वरुपी केले पाहिजे..काही दिवस किंवा महिन्यांसाठी नव्हेत .!

वजन कमी करण्यासाठी एक जीवनशैली हवी जी तुम्ही आयुष्यभर फॉलो करू शकाल…GM diet,Keto diet ,नुसतेच सॅलडस आणि सुप्स यातील कोणतीच पद्धत ही long lasting नाही उलट वजन कमी करण्यासाठी रोज काय करून खायचं याचीच भ्रांत पडते..दोन वेळा पोटभर जेवून सुद्धा वजन कमी करता येते..भाज्या आमटी उसळी हे खाऊन वजन वाढत नाही.

तर वेळी अवेळी खाणे, junk food,लोणचे पापड यासारख्या खारट पदार्थांचे अती सेवन, उपवास, वारंवार शीत पेय, मैदा, पिझ्झा, बर्गर ,तळलेले पदार्थ यांचा अतिरिक्त वापर याने वजन वाढते. कधी कधी एखाद्या आजारासाठी खूप दिवस steroids घेतली असतील ,Thyroid असेल,PCOD,Post hysterectomy (गर्भाशयाची पिशवी काढणे) इत्यादी मुळे सुद्धा वजन वाढते.

हे वाचा:   झोपण्यापूर्वी कोमट पाणी करून त्यात ही एक गोष्ट टाकून प्या; काहीही खा पचन होणार, सर्दी खोकला रात्रीतून पळून जाणार.!

वजन कमी होण्यासाठी मेटाबोलीझम चांगला असणे खूप गरजेचे आहे..रोज १ तास व्यायाम आवश्यक आहे. त्यात चालणे धावणे पोहणे, सायकल चालवणे, सुर्य नमस्कार यातील आपल्याला जे झेपेल ते करावे..आलटून पालटून केल्यास कंटाळा ही येत नाही.. या व्यतिरिक्त मांड्या पोटऱ्या दंड पोट इथली चरबी कमी करण्यासाठी काही विशिष्ट व्यायाम प्रकार असतात. ते सातत्याने केल्यास छान रिझल्ट्स मिळतात.

बऱ्याच जणांची वजन कमी झाल्याची success story आपण वाचतो, ऐकतो ..पण ते कायमस्वरूपी कमी झाले आहे का ते पहा…एक दोन वर्ष खूप प्रयत्न करून वजन कमी करायचं पण ज्या क्षणी तुम्ही ते थांबवता.. तेंव्हा पुन्हा ये रे माझ्या मागल्या होतं…
त्यामुळे घाई गडबड करून कुठे protein shake च घे, कुठे नुसतेच मोड आलेली कडधान्य खा, बाजारात मिळणारी वजन कमी करणारी औषधे यांच्या पासून तर लांबच रहा.

वजन कमी करण्यात सातत्य खूप खूप महत्त्वाचे ..नाहीतर आरंभ शुर बरेच असतात..पोटाला चिमटे काढून,मन मारून उपाशी राहून वजन तर कमी होतच नाही उलट तब्ब्येतीच्या इतर तक्रारी सुरू होतात. एक ग्लास गरम पाणी घ्या. त्यामध्ये अर्धा चमचा ओवा पावडर व एक चमचा जिरा पावडर घाला. त्यानंतर यामध्ये दोन चिमुटभर काळे मीठ घाला.

हे वाचा:   फक्त दोनच मिनिटात दात होतील चांदी सारखे पांढरे शुभ्र, घरीच करा हा छोटासा उपाय.!

हे पाणी तीन ते चार मिनिटे झाकून ठेवा त्यानंतर चमच्याने व्यवस्थित मिक्स करून पिण्याजोगे कोमट झाल असल्यास ते गाळणी च्या मदतीने गाळून घ्या. सकाळी रिकाम्या पोटी हे पेय प्या. असा उपाय सलग एकवीस दिवस तुम्ही करून बघा. पोट दुखी जंत असणे गॅस, अपचन, मलावरोध,बद्धकोष्ठता यांसारख्या सर्व समस्या होतील गायब. शरीर आतून शुद्ध झाल्यामुळे बॅड कोलेस्ट्रॉलचे प्रमाण घटते आणि वजन कमी होण्यास आपली मदत होते.

सांगितलेल्या टिप्स आणि उपाय नक्की फॉलो करा याचा तुम्हाला अवश्य फायदा होईल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *