कंबर दुखी, हात पाय आखडने होईल कायमचे बंद.! आता नको ते औषधे घेणे बंद करा आणि आयुर्वेदिक उपाय करून कंबरदुखी थांबवा.!

आरोग्य

मित्रांनो जर तुम्हाला किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींना थंडीमध्ये कंबरेच्या दुखण्याची समस्या जास्त होत असेल तर त्यासाठी आम्ही तुम्हाला एक अत्यंत प्रभावशाली उपाय शेअर करत आहोत. हा उपाय 100% खात्रीशीर काम करेल. हा उपाय फक्त एक आठवडा केल्यानेच तुमचे कंबरदुखी समूळ नष्ट होईल. नुसती कंबरदुखीच नव्हे तर आखडणाऱ्या मास पेशी देखील होते मोकळ्या.

उपाय १: सर्वप्रथम या उपायासाठी तुम्हाला मेथीदाणे लागणार आहेत. मेथी दाणे हाडांसाठी आणि सांधेदुखीसाठी अत्यंत फायदेशीर आहेत. शरीरातील सर्व प्रकारच्या आखडलेल्या नसा मोकळ्या होतात मेथी दाण्यामुळे. मेथी दाण्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रथिनं, कार्बोहायड्रेट्स, कॅल्शियम, लोह, फायबर, मॅग्नेशियम इत्यादी घटक असतात जे आपल्या शरीराला आवश्यक असतात.

अनेक विटामिन्स आणि मिनरल्स यासोबतच पोटॅशियम देखील मुबलक प्रमाणात असते. चार चमचे मेथीचे दाणे घेऊन मिक्सरमध्ये याची बारीक पावडर बनवून घ्या. तुम्हाला जास्त प्रमाणात ही पावडर वापरायचे नाही कारण मेथी दाणे उष्ण प्रवृत्तीचे असतात. एक ग्लास दूध म्हणजे कमीत कमी 200ml गरम दूध घ्या. यामध्ये पाव चमचा मेथी दाण्याची पावडर घालून मिक्स करा.

हे दूध पिण्याजोगे होईपर्यंत झाकून ठेवा. जावळे मेथी दाण्याची पावडर तोपर्यंत त्यात नीट भिजेल. शक्यतो हे दूध तसेच पिल्यास उत्तम परंतु याला गोड करायचे असल्यास यामध्ये एक चमचा बारीक वाटलेली खडीसाखर घालावी. यात गुळ किंवा मध घालू नये. थंडी मध्ये होणारी कंबर दुखी या उपायामुळे होईल एकदम ठणठणीत. लक्षात ठेवा मेथीची पावडर खूप जास्त प्रमाणात बनवून ठेवू नका. रोज हा प्रयोग करू नये.

हे वाचा:   ही सोपी पद्धत वापरली तर कोणाचीही चेहऱ्यावर जास्त झालेली चरबी एका आठवड्यात गायब होते.! त्यासाठी करावे लागते हे एक काम.!

उपाय २: ज्या लोकांना नेहमीच कंबरेचे दुखणे असते त्यांच्यासाठी हा उपाय होय. कमरेचे दुखणे अनेक कारणांमुळे उद्‍भवते. अनेकदा खूप वेळ एका जागीच उभे राहिल्याने अथवा बसल्याने मणका दुखू लागतो. पुरुषांच्या तुलनेत महिलांना कंबरेचे दुखणे जास्त दिसून येते. या उपायासाठी आपल्याला लागणार आहे लसूण. साधारण प्रकारच्या कंबरेच्या दुखण्यावरती हे उपाय काम करतील.

लसणाच्या पाकळ्या चे साल काढून घ्यावे. असा सोललेल्या लसणाची एक पाकळीचे तुम्हाला दररोज सेवन करायचे आहे. एखाद्या औषधाची गोळी खातात त्याप्रमाणे सोललेला नसून पाण्यासोबत खावा. परंतु जर तुम्ही चावून खाऊ शकत असाल तर गॅसवर हलके भाजून घ्या. यामुळे याचा तिखटपणा कमी होतो. या उपायामुळे तुमच्या कंबरेचे दुखणे तर पळून जातेच सोबतच तोंडाच्या समस्या दातांचे दुखणे हिरड्या सुजणे यांसारख्या समस्यादेखील नष्ट होऊ लागतात.

हे वाचा:   मनुष्य जाती साठी वरदान आहे हे एक अनमोल झाड, कधीच होणार नाही गुढघे दुखी किंवा दात दुखी.!

अशाप्रकारे दुधारी फायदा होतो लसणाच्या एका पाकळीने! उपाय ३: कंबर अखडली असल्यास, अगदी वाकताही येत नसेल किंवा उठताना त्रास होत असल्यास यासाठी तुम्ही मोहरीचे तेल घ्या. त्यामध्ये पाच ते सहा सोललेला लसूण पाकळ्या ठेचून घाला. आणि हे तेल गॅसवर पाच मिनिटे शिजवून घ्या. असे दुखणे पळवून लावणारे तेल तुमचे तयार होईल. या कोमट तेलाने तुम्ही दुखणार्‍या भागावर हलक्या हाताने मालिश करा आणि नैसर्गिक विटामिन डी साठी कवळ्या उन्हामध्ये बसा.

तुम्हाला सर्व प्रकारच्या कंबरेच्या दुखण्यामध्ये नक्कीच फायदा होईल. आशा आहे मला हे उपाय नक्कीच आवडतील आणि अतिशय फायदा देणारे असल्याने हे उपाय तुम्ही नक्कीच करून पहा आणि गरजू व्यक्ती पर्यंत नक्की पोहोचवा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *