स्त्रियांनी मा’सीक धर्मात का खाऊ नये लोणचे.! जाणून घ्या काय सांगते आयुर्वेद.! पुरुषांनी पण नक्की वाचावी ही आयुर्वेदिक माहिती.!

आरोग्य

आयुर्वेदिक उपचार म्हणजे नेमक काय ? भारत हा एक प्राचीन देश आहे. त्यासोबतच वैचारिक परिपक्वता, संस्कृती, परंपरा आणि विकासाच्या बाबतीत भारत नेहमीच जगात पुढे राहिला आहे. तुमचा फिटनेस गोल काहीही असो, तुम्ही ते आयुर्वेदिक पद्धतीने प्राप्त करु शकता. त्यासाठी पुढील गोष्टी आचरणात आणाव्यात.

१) तहान लागेल तेव्हाच पाणी प्या..जेवताना मध्ये मध्ये पाणी प्यावे म्हणजे bolus नीट तयार होण्यास मदत होते. २) शाबुदाणा,शेंगदाणे,वरी,दही हे सगळे पित्त वाढवणारे पदार्थ खाऊन उपवास करू नयेत… खरा उपवास म्हणजे लंघन..पोटाला विश्रांती देणे..
३)जेवणाच्या वेळा नियमित असाव्यात..दुपारी १२ पर्यंत आणि रात्री ८ पर्यंत जेवण करावे.

४)दोन्ही जेवणानंतर शत पावली( Actual १०० steps च अपेक्षित आहेत .व्यायाम नव्हे )घालावी. म्हणजे अन्न पुढे सरकण्यास आणि पचनाला मदत होते. ५)लोणचे,पापड,अति तिखट,तेलकट, खारट अन्न पदार्थ खाऊ नयेत. ६)रात्री च्या वेळी दही खाऊ नये. ७)रोज ४५ मिनिटे चालण्याचा व्यायाम करावा.
८) मधल्या भुकेच्या वेळेत त्या त्या ऋतूमध्ये उपलब्ध असणारे फळ,राजगिरा लाडू,साळीच्या लाह्या,खजूर हे खावे…फरसाण,बिस्कीट,शेव हे सर्व पित्त वाढवणारे पदार्थ आहेत.

हे वाचा:   प्रत्येकाला माहिती असायला हवा हा उपाय.! अंगावर आले कधी पित्त तर पटकन करा हा घरगुती उपाय.!

९) आपण जिथे राहतो तिथे ज्या स्थानिक भाज्या पिकतात,फळे मिळतात ते खावे..फळे नुसतीच खावीत, दुधात घालून,दह्यात मिक्स करून खाऊ नयेत…फळांची मूळ चव आणि गुणधर्म बदलतात अशाने. १०) रोज रिकाम्या पोटी ३ ते १२ सूर्य नमस्कार घालावेत. ११)जेवणात २ चमचे तुपाचा समावेश जरूर असावा.तुपाने कोलेस्टेरॉल वाढत नाही..तूप हे दुधावर अनेक संस्कार केल्यानंतर तयार होते त्यामुळे पचनासाठी चांगले असते..

११)गरम पाणी आणि मध एकत्र करू नये.. १२) संडास,लघवी ,उलटी ,शिंक या वेगांचे धारण कधीही करू नये..लागल्यास लगेच जावे. १३)पा’ळीच्या दिवसात स्त्रियांनी लोणचे खाल्ले तर रक्त स्त्राव वाढण्याची शक्यता असते कारण लोणच्यात तेल,मीठ,तिखट यांचा जास्त वापर असतो आणि त्यामुळे स्त्री शरीरातील पित्त वाढते पर्यायाने रक्त सुध्दा वाढते..म्हणून लोणचे खाऊ नये.

हे वाचा:   अशा प्रकारचे लक्षणे दिसू लागले की समजून जा आपल्या शरीरात शुगर ची मात्रा खूपच जास्त आहे.!

१४) दूध आणि फळं एकत्र करून खाऊ नये..विरुद्ध आहार आहे..त्याचे पचन होत नाही.आणि अनेक आजारांची निर्मिती त्यातून होते. १५)कधीही पोटाला तडस लागेपर्यंत खाऊ नये… १६) शिळे अन्न, processed food, preservatives असलेले पदार्थ शक्यतो टाळावेत..जितका आहार ताजा खाल्ला जाईल तितके शरीराचे पोषण चांगले होईल…

आपल्या शरीराचा संपूर्ण डोलारा हा आपण खात असलेल्या आहारावर च अवलंबून असतो…
१७)व्यक्ती तितक्या प्रकृती त्यामुळे सगळ्यांना सरसकट एक च औषध लागू पडत नाही.. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *