सुंदर दिसण्यामागचे हे जपानी सिक्रेट खूप कमी लोकांना माहिती असेल.! सौंदर्य दहापट सुंदर बनवा अशाप्रकारे.!

आरोग्य

अगदी माफक दरात आता तुम्ही घरच्या घरी हमखास रंग उजळवणारी क्रीम बनवू शकता या खास जपानीज सिक्रेट मुळे. केवळ एकाच वापरामध्ये तुम्हाला खूप फरक जाणवेल. हे खरेच शक्य आहे. आपल्याकडे सणासुदीची काही कमतरता नाही. त्यातच लग्नसराईचे भर. यामुळे तुमचे सौंदर्य कायमच अबाधित राहिले पाहिजे असे आम्हाला देखील वाटते.

आपल्या खास दिवशी आपली त्वचा चमकावी आपण इतरांपेक्षा वेगळे आणि जास्त सुंदर दिसावे असे प्रत्येकालाच वाटते. परंतु व मित्रांनो एका रात्रीत असा चमत्कार होत नसतो. हा उपाय केल्याने तुम्ही अगदी रोजच सुंदर गोरे तर दिसालच तेही बिना मेकअप, नैसर्गिक घटकांचा वापर करून बनवलेल्या या क्रीम मुळे..!

ब्युटी पार्लर मधील फेशियल पेक्षा ही जास्त उजाळा तुमचा चेहऱ्याला आता येऊ शकेल, तेही अगदी रोज..! तेव्हा हे रहस्य आत्ताच जाणून घ्या आणि अवश्य ट्राय करूनच बघा याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. या उपायाच खास वैशिष्ट्य म्हणजे फक्त तुमच्या त्वचेला गोरेपणाची येत नाही तर वयोमानानुसार चेहर्‍यावर पडणाऱ्या सुरकुत्या तसेच जुने मुरम व पुटकुळ्या चे डाग देखील होतील हळूहळू गायब.

हे वाचा:   तीन दिवस रात्री गरम पाण्यात टाकून प्या या दोन वस्तू, वाढलेले वजन चौथ्या दिवशी होईल गायब, हा उपाय आहे खूपच गुणकारी.!

आज आपण पाहणार आहोत तांदळाचा वापर करून बनवलेले क्रीम. सकाळी लावून अगदी संध्याकाळपर्यंत तुम्हाला त्वरित रिझल्ट बघायला मिळेल. या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे तांदूळ(कोणत्याही प्रकारचा). तांदळामध्ये अँटिऑक्सिडंट व अँटी एजिंग चे गुणधर्म असतात. तांदुळा मुळे तुमच्या त्वचेतील कोलाजीनचे प्रमाण वाढण्यास मदत होते. ज्यामुळे आपल्या चेहर्‍यावरील लवकर सुरकुत्या पडत नाहीत.

यासोबतच आपली त्वचा टाईट अशी तरुण राहते. याबरोबर यामध्ये असते सौंदर्याला पोषक असे विटामिन बी. आंघोळ करण्याआधी अर्धा तास ही क्रीम तुम्ही तुमच्या पूर्ण शरीरावर देखील लावू शकता. एका पॅन मध्ये पाव वाटी तांदूळ घ्या. तो रात्रभर एक ग्लास पाण्यामध्ये भिजवा दुसऱ्या दिवशी सकाळी हे तांदूळ गॅसवर मंद आचेवर अर्धवट शिजवा. चमच्याने मधून मधून हलवत रहा.

यामध्ये तुम्ही एक वाटी दूध घाला. दुधामध्ये लॅक्टिक ऍसिड असते जे आपल्या त्वचेला उजळ बनवण्यास मदत करते. त्वचेवरील मृत त्वचा हटवते. दुधाच्या मदतीने पूर्णपणे तांदूळ शिजवा. गॅस बंद करून हे थंड होऊ द्या. यात थोडेसे दूध घालून मिक्सर मध्ये बारीक करून घ्या. पेस्ट बनेल. या पेस्ट मध्ये एक चमचा ग्लिसरीन मिसळा.

हे वाचा:   उसाचा रस शरीरात गेल्यावर शरीरात काय होते.? माहिती आहे का.? गारेगार उसाचा रस पीत असाल तर एकदा नक्की वाचा.!

त्यामुळे तुमची त्वचा मॉइश्चरायझ होईल. नंतर यामध्ये एक चमचा बदाम तेल घाला. दोन व्हिटॅमिन ई च्या गोळीतील तेल घाला. चमच्याने हे मिश्रण एकजीव करा. आपली पेस्ट तयार. शरीराच्या ज्या भागावर ही क्रीम लावायची आहे तो भाग सर्वप्रथम ओल्या फडक्याने व्यवस्थित पुसून घ्यावा. यानंतर ही क्रीम घेऊन शरीराच्या ज्या भागावर हलक्या हाताने मसाज करत लावा.

क्रीम लावल्यानंतर सुमारे तीस मिनिटे असेच राहू द्या. यानंतर पुन्हा एकदा गोलाकार पद्धतीने मसाज करत ही क्रीम हटवा. त्यानंतर कोमट पाण्याने तो भाग स्वच्छ धुवा. साबणाचा कमीत कमी वापर करा. सलग सात दिवस उपाय करून तर बघा…! तुमची त्वचा होईल मऊ नितळ आणि सुंदर..थंडीमध्ये तुमची त्वचा उललणार देखील नाही. चार ते पाच दिवस ही क्रीम तुम्ही फ्रिजमध्ये साठवून ठेवू शकता.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *