हे एक फुल अनेक रोगांचा काळ आहे.! लाखोंच्या औषधाची बरोबरी करेल हे एक फुल.! हे फुल नाही आरोग्यासाठी वरदान आहे.!

आरोग्य

मित्रांनो, “पळसाला पाने तीन’ अशी एक म्हण मराठीत प्रचलित आहे. पळसाच्या वृक्षाला लाल रंगाची फुले येतात. पळसाची फुले लघवी साफ होण्यासाठी उत्तम असतात. लघवी अडली असल्यास किंवा थांबून थांबून होत असल्यास पळसाची फुले वाफवून ओटीपोटावर बांधली जातात. पळसाच्या फुलांचे चूर्ण दूध व खडीसाखरेसह घेण्यानेही लघवीला साफ होण्यास मदत मिळते.

पळसाची फुले झाडावरची किंवा खाली पडलेली कोणतीही वापरू शकता परंतु तोडणे शक्यतो टाळा खाली पडलेली फुले वापरावीत व फुले चांगली स्वच्छ करून घ्यावी. सावलीत पूर्णपणे वाळवावी. पाकळीच्या वरचा फुलांचा काळाभाग काढून घ्यावा व फुले हाताने बारीक कुस्करून हवाबंद डब्यात भरून ठेवावी वर्षभर वापरता येईल.

चहा – प्रकार १: वाळलेली फुले १ चमचा किंवा ३-४ फुले व गुळ किंवा साखर १ चमचा, दीड कप पाण्यात टाकुन खळखळून उकळून घ्यावीत. चहा गाळणीने गाळून नेहमीच्या चहाप्रमाणे गरम प्यावा.
प्रकार २: वाळलेली फुले १ चमचा किंवा ३-४ फुले व गुळ किंवा साखर १ चमचा, १ कप पाण्यात टाकुन उकळावी व शेवटी अर्धा कप (किंवा आवडीनुसार) दूध घालून उकळी काढून गाळून घ्यावा.

सरबत – पळसाची ताजी फुले पाण्यात काही तास भिजत घालून ठेवावी. सुमारे दोन तासांनी गाळून त्यात साखर व चवीनुसार मीठ घालून प्यावे. या फुलामध्ये अळ्या असतात तेव्हा ते नीट बघून घ्यावे. ही माहिती पारंपरिक आहे व त्या संबंधित माहिती हि एका पिढीतून दुसऱ्या पिढीत आलेली आहे. याचा काहीही विपरीत परिणाम नाही. परंतु प्रत्येकाचा अनुभव हा वेगळा असूच शकतो कारण व्यक्ती तितक्या प्रकृती.

हे वाचा:   घरी बनवा ही अशी क्रीम, चार चौघात उठून दिसायचे असेल तर आतापासूनच करा तयारी.! या फुलापासून फक्त पंधरा मिनिटात तयार होईल घरगुती क्रीम.!

फुलांच्या पाण्याने स्नान त्वचेच्या विकारांत फायदेशीर आहे. या फुलाचे तेल चेहऱ्यावरील काळे डाग कमी करते. काढा मुतखड्यावर उत्तम औषध आहे. एकंदरीत मूत्रपिंडाच्या आजारंवर उपयोगी आहे. डायबेटिस कमी होतो ह्यांच्या फुलांचे पाणी प्याल्याने. डिंक जहाल व स्तंभक असल्याने अतिसार व आमांश झालेल्या लहान मुलांना व नाजूक स्त्रियांना उपयुक्त असून आमाशयातून व मूत्राशयातून होणाऱ्या रक्तस्त्रावावरही देतात.

त्यांचा सौम्य काढा पडसे व खोकला यावर गुणकारी असतो. सुक्या फुलांपासून पिवळा रंग मिळतो, फुले उकळून किंवा थंड पाण्यात भिजत ठेवून रंग काढता येतो. तो साड्या रंगविण्यास वापरतात. पळसफुलाचे सरबत प्या युरिकअॅसिड वाढू नये म्हणून..!पळसाची पाने पण उष्णतेवर रामबाण उपाय आहे. पानाची पावडर करून सकाळी रिकाम्या पोटी घेतात पण पाने सावलीतच वाळवायची हे लक्षात घ्या.

हे वाचा:   आंधळे होण्याआधी नक्की वाचा.! मोबाईल बघून बघून डोळ्याचे वाटोळे झाले आहे.! त्यासाठी आजपासूनच व्हा सावध आणि करत जा हे एक काम.!

किडनी स्टोन साठी उपयोग आहे सुक्या फुलांना रात्री पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी ते पाणी प्यावे. यामुळे किडनी स्टोन मध्ये चांगल्या प्रकारे फायदा होतो. धुळवड व रंगपंचमीस याच्या फुलांचा रंग म्हणून उपयोग करण्यामागे शास्त्रीय कारण आहे.या रंगाने अंघोळ केल्यास गोवर,कांजण्या इत्यादी उष्णताजन्य रोगास अटकाव होतो. पळसाच्या फुलांना उकळून घेऊन ते पाणी कोमट होवू देऊन.

त्या पाण्यात पाय टाकून दहा, पंधरा मिनिटे बसल्यास पायाला भेगा पडलेल्या पुर्ण पणे बरी होतात. एक आठवडा रोज करणे. पळसाच्या सालीच्या आतील भागापासून धागे काढतात व त्यांचा उपयोग व’न्य ज’मा’ती दोराकरिता करतात. कागदनिर्मितीस व गलबतांच्या भेगा बुजविण्यास या धाग्यांचा उपयोग करतात.पळसाची पाने हत्तींचा चारा म्हणून वापरतात. पळसाच्या पानांच्या पत्रावळी व द्रोण जेवणाकरिता वापरण्याची पद्धत आहे.जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *