हातापायाचा मळ सर्व होईल गायब.! काळी पडलेली हात आणि पाय बनवा असे गोरेपान.! गोरे व्हायचे असेल तर नक्की वाचा.!

आरोग्य

आजकाल स्पर्धेचं जग असल्याने आपण कसे चांगले दिसू हे सगळेजण बघतच असतात. आपण चेहऱ्याची जेवढी काळजी घेतो तेवढीच हात पायांची सुद्धा घेतली पाहिजे. काहीवेळा आपण कुठे बाहेर फिरायला गेलो तर इतरांचे लक्ष आपल्या चेहऱ्यापेक्षा हाता पायांकडे सुद्धा असते. काहीवेळा असे दिसून येते की हात पाय काळे पडलेले आहेत. त्यावर काळे डाग दिसत आहेत. धावपळीच्या दुनियेत असे मळ साचून अंगावर काळे डाग दिसू लागतात.

यामुळेच आपले आत्मविश्वास सुद्धा कमी होऊ लागतो. कारण सौंदर्याचा उपयोग आपल्या व्यक्तिमत्वावर सुद्धा होतो.  तसेच आपल्याला काहीवेळा वेगळे कपडे घालायचे असतील तेसुद्धा आपण यामुळे घालू शकता नाही. यासाठी आपण आज काही सोपे उपाय बघणार आहोत. आपण फेअर अँड लव्हली क्रीम ऐकलेच असेल.

हि क्रीम घेऊन त्यात कोणताही शाम्पू किंवा फेस वॉश एकत्रित करून घ्यावा. आणि काळ्या पडलेल्या जागेवर याचा गोलाकार पद्धतीने मसाज करावा. यामुळे काळेपणा दूर होण्यास मदत होईल. तसेच, दह्यामध्ये हळद आणि बेसन एकत्र करून मिश्रण तयार करा आणि पायांना स्क्रब करा. यामुळे पायांचे डाग हळूहळू दूर होतात.

हे वाचा:   दवाखान्यात न जाता झुमक्यामुळे मोठा झालेला कानातील होल आपण बरा करू शकतो.! करा फक्त हा उपाय!

कच्च्या दूधाने मालिश केल्याने तुमच्या पायंची त्वचा मुलायम होते. कच्च्या दूधामध्ये थोडं गुलाब पाणी एकत्र करून मालिश केल्याने पायांना येणारी दुर्गंधी दूर होते. कच्चं दूध वापरल्याने पायांची नखं स्वच्छ आणि चमकदार होतात. काळवंडलेल्या त्वचेवर कोरफडीचा गर लावल्याने त्वचा मऊ आणि तजेलदार होते. ऑलिव्ह ऑइलचा वापर हातांसाठी एक उत्तम घरगुती उपाय आहे.

याचा नियमित वापर केल्याने त्वचा मुलायम होते.  हे हातांचा कोरडेपणा दूर करण्यासाठी मदत करते. एक चमचा ऑलिव्ह ऑइलमध्ये थोडीशी साखर एकत्र करून हातांना मसाज करा. असं तुम्ही आठवड्यातून दोन वेळा करू शकता. अॅपल व्हिनेगर त्वचेची पीएच पातळी संतुलित करण्यास मदत करते. या व्यतिरिक्त हे त्वचेतून मृत त्वचा काढून टाकण्यास मदत करते.

यासाठी, आपल्याला 2 चमचे अॅपल व्हिनेगर थोड्या पाण्यात मिसळावे लागेल. हे मिश्रण हातांवर लावा. साधारण दहा मिनिटे तसेच ठेवा आणि पाण्याने हात धुवा. हा उपाय आपण आठवड्यातून दोन वेळा केला पाहिजे. यामुळे हातावरील काळपटपणा जाण्यास मदत होईल.  ग्लिसरीन त्वचा मॉयश्चराइज्ड करण्यासाठी मदत करतं.

हे वाचा:   वरण बनवण्याची ही पद्धत एखाद्या दिवशी वापरून बघा खाणारे तुमचे नावच घेत राहतील.! या वरणाची जोड भाताबरोबर उत्तम जमेल.!

जर तुमचे हात ड्राय होत असतील तर गुलाब पाणी, लिंबू आणि ग्लिसरीन एकत्र करून दररोज झोपण्यापूर्वी आपल्या हातांना मसाज करा. यामुळे हात मऊ आणि तजेलदार होतात. अशाप्रकारे अनेक उपाय आपल्याला फायदेशीर ठरतात. जसे हाता पायांचे डाग अचानक येत नाहीत तसेच ते अचानक किंवा लगेच जात सुद्धा नाहीत. हे सगळे उपाय ठराविक वेळेत किंवा ठराविक वेळेसाठी केल्याने याचा चांगला परिणाम दिसतो. म्हणून हे उपाय नक्की करून बघा.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *