दोन मिनिटात पोटातला सगळा गॅस बाहेर.! जळजळ, करपट ढेकर, पोट दुखणे सर्व समस्या एकच करा रामबाण उपाय.!

आरोग्य

सगळ्यांनाच पोटासंबंधित अनेक आजार होत असतात. पोटात मळमळणे, पोट ढवळणे, दुखणे वैगरे वैगरे. हल्ली बाहेरच्या खाण्याच्या पदार्थांमध्ये सोडा मोठ्या प्रमाणात वापरला जातो. यामुळे अनेकांना पोटातील गॅसची समस्या उद्भवते. चुकीचे अन्न ग्रहण करणे, पाण्याची कमतरता, जेवणाची वेळ योग्य नसणे इत्यादी यामागील काही कारणे आहेत.

तसेच, शरीरात होणाऱ्या अनेक गंभीर रोगांचे मुख्य कारण पोट साफ न होणे हेच आहे. बदलत्या जीवनशैलीतील ही समस्या सामान्य आहे आणि प्रत्येक वयोगटातील लोक या समस्येने त्रस्त आहेत. अनेक काळापासून यावर अनेक उपाय केले जातात. काही घरगुती उपाय करून अश्या पोटदुखीपासून सुटका मिळते. परंतु आज आपण एक असा उपाय बघणार आहोत ज्यामुळे सगळ्याच प्रकारचा पोटाचा त्रास कमी होऊ शकेल.

यासाठी आपल्याला लागणार आहे हळद. हळद एके ठिकाणी खाण्याचा स्वाद वाढवते, रंग बदलते तसेच याचा उपयोग सौंदर्य वाढविण्यात आणि त्वचेच्या समस्येसाठी होतो. तसेच हळदीचा वापर शरीराला स्वस्थ ठेवण्यासाठी होतो. हळद हे अँटिसेप्टिक आणि अँटिबायोटिक गुणधर्मांकरिता ओळखले जाते. परंतु हळद शक्यतो घरीच बनवलेली असावी.

हे वाचा:   हाय ब्लड प्रेशर असणाऱ्या लोकांनी हे पदार्थ खा, तीन दिवसात सर्व ठीक होईल...!

विकत आणलेल्या हळदीमध्ये घरच्या हळदीचे गुणधर्म नसतात. म्हणूनच हळद पूड घरीच बनवावी. यासोबत आपल्याला घ्यायचे आहे मीठ. तुम्ही कोणत्याही प्रकारचे मीठ घेऊ शकता. काळे मीठ, संधव मीठ, सफेद मीठ. मिठामुळे आपले पोट साफ होण्यास मदत होते. आपण काळे मीठ वापरू शकता. काळ्या मिठाचे पाणी तोंडातील लाळ ग्रंथीस सक्रिय करण्यास मदत करते.

पोटाच्या आत असलेले नैसर्गिक मीठ, हायड्रोक्लोरिक ऍसिड आणि प्रथिने पचन करणार्‍या सजीवांच्या शरीरात निर्माण होणारे द्रव्य उत्तेजित करण्यास मदत करते, जेणेकरून अन्न आरामात पचू शकेल. तसेच, क्षारीय स्वरूपाचे असल्याने, काळे मीठ पोटात ऍसिड कमी करते आणि छातीत जळजळ आणि ऍसिडीची समस्या दूर करते. म्हणूनच एक चमचा हळद आणि मीठ मिश्रण करून ते सुकेच खावे आणि त्यावर थोडेसे कोमट केलेले पाणी प्यावे.

हे वाचा:   हे चूर्ण जणू अमृतच आहे, डोकेदुखी, पोटदुखी, सारख्या अनेक आजारावर एकच उपाय; स्त्रियांसाठी आहे खूपच फायदेशीर.!

अशाप्रकारे पाणी पिल्याने पोटातील गॅसची समस्या दूर जाते. आणि पोट साफ होते. पोटातील जळजळ थांबते. पोट साफ झाल्याने आपले बाकी आजार सुद्धा पळून जातात. आणि शरीर सुदृढ बनते. तसेच, पोटात गॅस होऊ नये म्हणून सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे. अवेळी जेवणे, बाहेरचे पदार्थ जास्त खाणे शक्यतो टाळावे. जेवल्यानंतर लगेचच झोपणे टाळावे. गरम आणि थंड पदार्थ एकत्र खाऊ नयेत.

या अशा सवयीमुळे पोटातील वेगवेगळे आजार उदभवत असतात. वर दिलेला उपाय नक्की करू पाहा आणि पोटाच्या तक्रारींपासून सुटका मिळवा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *