मेंदूला कंप्युटर पेक्षाही तेज बनवा.! दहा मिनिटाचे कामे दोन मिनिटात होऊ लागतील.! तुम्हाला बघूनच लोक वाहवाह करू लागतील.!

आरोग्य

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे. मित्रांनो या बद्दल तर सगळ्यांनाच माहिती आहे की जे काही आपण खातो ते सर्व आपल्या शरीरावर परिणाम करत असते. परंतु तुम्हाला हे माहित आहे का आज जे काही आपल्या तोंडामध्ये जाते ते केवळ शरीरावरच नव्हे तर आपल्या मेंदूवर देखील खूप मोठ्या प्रमाणात परिणाम करते. ज्यावर आपला मूड, आपली एनर्जी, मेमरी देखील अवलंबून आहे.

केवळ शरीर स्वस्थ ठेवण्यासाठी नव्हे तर मेंदूला नेहमी तल्लख ठेवण्यासाठी देखील तसेच नेहमी मूड चांगला ठेवण्यासाठी तुम्हाला योग्य अन्नपदार्थ सेवन केले पाहिजेत. अशामध्ये प्रश्न उद्भवतो की असं काय खाल्लं पाहिजे ज्यामुळे शरीर आणि मेंदू दोन्ही गोष्टी स्वस्थ राहिल्या पाहिजेत..? आणि हाच बद्दल आम्ही तुम्हाला आज माहिती देणार आहोत.

डाळी : डाळीमध्ये कॉम्प्लेक्स कार्बोहाइड्रेट भरपूर मोठ्या प्रमाणात उपलब्ध असते. यामध्ये फायबर देखील भरपूर असते जे आपल्या मेंदूला ग्लुकोज सप्लाय करण्याचे काम करते. आणि यासाठी तुम्हाला कोणतेही गोड वस्तू खाण्याची गरज नाही. याशिवाय यामध्ये भरपूर विटामिन्स असतात असे तुमचा मेंदू तल्लख आणि स्वस्त ठेवण्यात मदत करतात.

पुदिना : आपल्यापैकी अनेक जणांना पुदिनाची चटणी आवडते परंतु हाच पुदिना तुमच्या मेंदूसाठी अत्यंत फायदेशीर असतो हे तुम्हाला ठाऊक आहे का? यामध्ये विटामिन ए आणि विटामिन सी भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात. विटामिन ए शिकण्याची कला वाढवतात तर व्हिटॅमिन सी आपल्या मेंदूमध्ये एनर्जी टिकवून ठेवण्याचे काम करतो. केवळ पुदिन्याचा वास घेतल्याने मेंदू अनेकपटीने कार्यरत होतो.

हे वाचा:   पोटात जुळे बाळ कसे जन्माला येते माहिती आहे का.? कधीच कुठेच वाचले नसेल याबाबत.! आज जाणून घ्या.!

यामुळे व्यक्तीचे टायपिंग स्किल आणि लक्षात ठेवण्याची क्षमता देखील वाढते. ब्रोकोली : फिटनेस च्या दृष्टीने ब्रोकोली एक उत्तम भाजी आहे. तसेच मेंदूच्या बाबतीत देखील कमी फायदेशीर नाही ब्रोकोली. ब्रेन पॉवर आणि मेमरी वाढवण्यासाठी पब्रोकोलीला पर्यायच नाही. यामध्ये कॅल्शियम, विटामिन्स, आयर्न, बीटा कॅरोटीन देखील असते. यामुळे मेंदूला रक्तपुरवठा व्यवस्थित प्रमाणात होतो. हे आपल्या नर्व्हस सिस्टिम ना मदत करते.

यामुळे मेंदू व्यवस्थित चालतो. एका रिसर्च स्टडी नुसार ब्रोकोली खाल्ल्याने मेंदूमधील डॅमेज देखील भरून निघतो. बीट : शरीराला बीट खाण्याचे फायदे तर तुम्ही जाणताच त्याबद्दल वेगळे सांगायला नको. यामध्ये असे काही घटक असतात की ज्यामुळे आपल्या मेंदूची काम करण्याची ताकद दुपटीने वाढते. बीटा मध्ये विटामिन बी 9 मोठ्या प्रमाणात असते. नियमित बेटाच्या सेवनाने डिप्रेशन सारखे रोग देखील दूर होतात.

बिया : कदाचित ही गोष्ट तुमच्या साठी नवीन असेल परंतु भोपळ्याच्या किंवा सूर्यफुलाच्या बिया यांचे सेवन मेंदू साठी अत्यंत फायदेशीर असते. यामध्ये प्रोटीन फायबर मिनरल्स विटामिन्स भरपूर प्रमाणात असतात. यामुळे तुमचा मूड आनंदी होतो. रोज एक मूठ अशा बीयांचे सेवन केल्याने तुमचा मेंदू तर तल्लख होईलच शिवाय शरीरातील झिंकची कमतरता देखील दूर होईल.

हे वाचा:   तोंडाला चव राहिली नाही का.? अन्नाचा वास सुद्धा येत नाही का.? घरीच या गोष्टींचे सेवन करा सर्व समस्या होतील दूर.!

यामुळे मेमरी वाढून विचार करण्याची क्षमता वाढेल. नट्स : हे पूर्वीपासूनच आपल्याला माहित आहे नट्स खाल्ल्याने मेंदू तल्लख होतो म्हणून तर लोक अगदी बदाम अक्रोड काजू मोठ्या प्रमाणात खाताना दिसतात. परंतु मेंदूच्या दृष्टीने फायदेशीर म्हणजे अक्रोड आणि बदाम होय. हे खाल्ल्याने मेंदूची ताकद वाढते. याच गोष्टी रात्री पाण्यामध्ये भिजवून सकाळी खाल्ल्यानंतर अधिक योग्य प्रमाणात रिझल्ट देतात.

तर या होत्या काही गोष्टी त्यामुळे तुमचा शरीर आणि मेंदू दोन्ही गोष्टी तल्लख राहतात. आशा आहे आम्ही दिलेली माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल आणि तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तींसोबत नक्कीच शेअर कराल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *