जेवल्यानंतर पाणी पिण्याऐवजी हे एक काम करा पोटावर वाढलेली चरबी हळूहळू उतरून जाईल.! वजन कमी करण्यासाठीचा सर्वात सोपा उपाय.!

आरोग्य

शरीरात होणाऱ्या अनेक गंभीर रोगांचे मुख्य कारण म्हणजेच पोट साफ न होणे हेच आहे. बदलत्या जीवनशैलीतील ही समस्या सामान्य आहे आणि प्रत्येक वयोगटातील लोक या समस्येने त्रस्त आहेत. चुकीचे अन्न ग्रहण करणे, पाण्याची कमतरता, जेवणाची वेळ योग्य नसणे इत्यादी यामागील काही कारणे आहेत. पोट साफ राहणे खूप गरजेचे असते हे तर सर्वानाच माहित आहे.

यासाठी आज आपण एक उपाय बघणार आहोत, ज्यामुळे आपले पोट साफ राहून आरोग्य चांगले राहील. या साठी आपल्याला लागणार आहे अर्धा चमचा मोहरी. आपल्याला माहीतच असेल प्रत्येक पदार्थाला फोडणीसाठी आपण मोहरी वापरतोच. त्यात कॅरोटीनोइड्स, फिनोलिक संयुगे आणि ग्लुकोसिनोलेट्स सारख्या विविध फायटोकेमिकल्स असतात. मोहरीचा वापर रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी देखील केला जातो.

मोहरी पचनासाठीसुद्धा चांगली असते. यासोबतच आपल्याला घ्यायचे आहे, अर्धा चमचा ओवा. ओव्यामध्ये लोह, कॅल्शियम, पोटॅशियम, आयोडीन, कॅरोटीन असते. शिवाय यामध्ये फायबर, कार्बोहायड्रेट, प्रोटीन्सदेखील काही प्रमाणात असतात. ओव्यामध्ये अनेक पाचक गुणधर्म असतात. त्यामुळे पचनक्रिया सुधारण्यासाठी दररोज स्वयंपाकात ओव्याचा वापर करा.

हे वाचा:   ७ दिवस हे पेय अशाप्रकारे बनवून प्या: म'रेपर्यंत गुढघे, कंबर, रक्ताची कमतरता होणार नाही,डोळ्यांचा चष्मा होईल दूर.. मिळेल भरपूर एनर्जी..!

तसेच आपल्याला यात लागणार आहे अर्धा चमचा बडीशोप. बडीशोप हे एक मुखवास म्हणून ओळखले जाते. बडीशेपमध्ये व्हिटॅमिन सी चं प्रमाण भरपूर असतं. तसंच यामध्ये कॅल्शिअम, सोडीअम, फॉस्फरस, आर्यन आणि पोटॅशिअमसारखी आवश्यक खनिज गुणही आढळतात. शरीर निरोगी राहण्यासाठी बडीशेपेचं सेवन आवश्यक आहे. यामुळे पोटातील गॅस कमी होऊन पचनशक्ती वाढण्यास मदत होते.

यासोबतच आपल्याला घ्यायचे आहे अर्धा चमचा सैंधव मीठ आणि काळे मीठ. सैंधव मीठाला रॉक मीठ असे देखील म्हणतात. हे मीठ नैसर्गिकरित्या पूर्णपणे शुद्ध मानले जाते. यात अनेक प्रकारचे पोषक घटक असतात, जे शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. सैंधव मीठ हलके आणि पचणासाठी अत्यंत चांगले आहे, यामुळे पचन प्रणाली सुधारते.

याव्यतिरिक्त, रोगप्रतिकारक प्रणाली देखील चांगली होते. सैंधव मीठ शरीरातील चरबी कमी करण्यास देखील फायदेशीर आहे.  लोह आणि खनिजांचा साठा असलेले काळे मीठ आरोग्यासाठी अतिशय लाभदायक असते.पोटाशी संबंधित समस्यांवर उपाय म्हणून तुम्ही आहारामध्ये काळ्या मिठाचा उपयोग करू शकता. उलटी, अपचनाचा त्रास होत असल्यास काळ्या मिठाचे सेवन करावं.

हे वाचा:   कुठलेही केस कुठलाच त्रास न होता निघेल, दोन मिनिटात होईल एकदम क्लीन.!

मळमळ जाणवत असल्यास एक ग्लास सोड्यामध्ये किंचितसे काळे मीठ टाकावे आणि प्यावे. यामुळे मळमळण्याचा त्रास कमी होण्यास मदत मिळेल.
अशाप्रकारे मोहरी, ओवा, बडीशोप, सैंधव मीठ, काळे मीठ हे सर्व एकत्र करून त्याची पूड करून घ्यावी. आणि पोट साफ होत नसेल त्यावेळी हे मिश्रण कोमट पाण्यात मिश्रित करून निराळ्या पोटी प्यावे. हा उपाय शक्यतो रात्री झोपण्याआधी करावा. सकाळी तुमचे पोट साफ होऊन जाईल.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *