या वनस्पती दिसायला दिसतात गवतासारख्या, पण आरोग्यासाठी मानले जाते वरदान.! प्रत्येकाच्या घरी असाव्यात या वनस्पती.!

आरोग्य

आपल्या निसर्गामध्ये बर्‍याच औषधी वनस्पती आढळतात, ज्याचा उपयोग प्राचीन काळापासून अनेक रोग दूर करण्यासाठी केला जात आहे. अनेक काळापासून प्राणिसृष्टी तिच्या दररोजच्या गरजा भागविण्यासाठी वनस्पतींवर अवलंबून राहात आहे. एकूण जीवसृष्टीमध्ये वनस्पतीच स्वयंपूर्ण आहेत. वनस्पती आहेत म्हणून आपण आज जगू शकतो. झाडांमुळे प्राणवायू मिळतो.

आपल्याला तर अनेक उपाय आणि वापर अनेक वनस्पतींचा माहीतच असतो. अघाडा: अघाडा किंवा आघाडा हा भारतीय भाषांमधून या वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो. अपांग, आंधीझाडा, ऊंगा, औंगा, चिचडी, चिचरा, चिरचिरा, लटजीरा. आघाडा चे फायदे सर्वाना माहीतच आहेत. दातदुखी, पोटदुखी, खोकला, कावीळ या सारख्या आजारांवर आघाडा उपयोगी ठरतो.

पोटदुखीवर आघाड्याची चार-पाच पाने चावून खातात किंवा पानांचा रस काढून पितात. खोकला व कफ यामुळे ताप आला असेल तर आघाड्याच्या पंचांगाचा काढा मधातून देतात. पुनर्नवा: पुनर्नवा. दाभणाच्या जाडीच्या काड्यांना बारीक पाने असतात, या काड्या मार्च-एप्रिलमध्ये जमिनीवर पसरलेल्या असतात. पुनर्नवा सूज कमी करण्यासाठी उपयोगी असते.

हे वाचा:   काळी पडलेली मान आता मिनिटात होईल गोरीपान.! हा एक उपाय कोणीही सांगितला नसेल.! मान गोरी करायची असेल तर लगेच वाचा.!

पुनर्नवाच्या चूर्णात थोडी साखर घालून खाणे, किंवा काढा करून तो घेणे या स्वरूपात पुनर्नवा घेता येते. पायांवर सूज असली तर याच काढ्यात पाय बुडवून बसता येते. चेहऱ्यावर, गुडघ्यावर सूज असली, तर या काढ्यात वस्त्र बुडवून त्याने हलके हलके शेक करता येतो.

सत्यानाशी- ही वनस्पती खूप गुणकारी आणि नावाप्रमाणेच रोगांचा सत्यानाश करणारी आहे. सत्यानाशी वनस्पतीचे पान आणि तिळाचे तेल एकत्र करून उकळून घ्यावे आणि जिथे दुखत आहे त्या भागावर मालिश करावी. ज्यांना बद्धकोष्ठता होते, गॅस ची समस्या त्रास देते त्यांनी या वनस्पतीच्या मुळांचा नक्की वापर करावा. तसेच ज्यांना मूळव्याधीचा त्रास आहे त्यांनी या वनस्पतीच्या मुळांचा वापर केल्याने मूळव्याधीचे कोंब निघून जातील. आणि मूळव्याधीपासून तुम्हाला लवकर सुटका मिळेल.

हे वाचा:   आंघोळ करण्यापूर्वी फक्त एकदा लावा.! डोक्यावरचे सफेद केस काळे कुळकुळीत बनतील.! केसांना काळे करण्याचा घरगुती जुगाड.!

धाकटी दुधी/छोटी दुधी- हे सुद्धा एक गवत आहे. हे छोटे हिरव्या गवतासारखे दिसते आणि ते लालसर असते. यामुळे वंध्यत्व, नपुंसकता आणि शीघ्रपतन यांसारखे आजार बरे होतात. हे गवत थोडेसे बारीक करून पाण्यात मिसळून दिवसातून दोनदा प्यायल्याने अतिसाराचा आजार बरा होतो. याचे सेवन केल्याने आतडे निरोगी राहतात.

नाकातून रक्तस्त्राव होत असल्यास याच्या पावडरमध्ये साखर मिसळून सेवन करा. दुधी गवताच्या रोपाचा लेप चेहऱ्यावर लावल्याने मुरुम आणि मुरुमांची समस्या दूर होते. असे अनेक प्रकारचे आपल्या आजूबाजूला दिसणारे गवत अतिशय फायदेशीर असते. फक्त आपल्याला त्याची माहिती आणि ओळख असली पाहिजे.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *