सतत दुखणारे पोट काय असते कारणे.! सततच्या पोटदुखीला अजिबात करू नका दुर्लक्ष.! अन्यथा सहन करावे लागेल असे काही.!

आरोग्य

रोज सकाळी उठल्यावर एकदाच शौचाला साफ होत असेल तर च आपण निरोगी आहात. मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एक खास अशी माहिती. तुमच्या पोटाच्या तक्रारी बद्दल. IBS म्हणजे काय ते आपण सविस्तरपणे जाणून घेऊयात. हे कशामुळे होते याबद्दलही आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. हे टाळण्यासाठी काय करता येईल तेदेखील सांगणार आहोत.

अशा प्रकारच्या समस्यांना आपल्यापैकी बरेच जण तोंड देत आहेत. परंतु अनेकांना याची माहिती मात्र अजिबात नाही. चला तर मग जाणून घेऊयात, IBS विषयी. दिवसातून ३,४ वेळा जावे लागणे किंवा जेवण झाले की लगेच पोटात कळ करून शौचाला होणे यालाच IBS म्हणतात. आयुर्वेदात “ग्रहणी ” असे म्हणले जाते.

IBS ची सर्व सामान्य कारणे बघितली तर १)कृमी किंवा जंत २)द्रवरूप आहार अधिक घेणे ३)आतड्याची अन्न धारण करण्याची क्षमता कमी होणे ४)ग्रहणी या अवयवाची विकृती असणे. आपल्या शरीराचा संपूर्ण डोलारा हा आपण घेतलेल्या आहारावर च अवलंबून असतो.पचन व्यापार चांगला असेल, metabolism छान असेल तर शरीराचे पोषण होते आणि आपण तंदुरुस्त राहतो .

हे वाचा:   दररोज सकाळी हे पदार्थ भिजवून खा कधीही होणार नाही कफ; पोटाच्या समस्या कायमच्या विसरा, रामबाण उपाय.!

IBS मध्ये घेतलेला आहार हा न पचता तसाच शरीराबाहेर जातो त्यामुळे कालांतराने शरीर दुर्बल होते, आणि वजन पण कमी कमी होऊ लागते. चिडचिडे पणा वाढतो,शरीराचे पोषण नीट न झाल्यामुळे immunity पण कमी होते आणि तब्येतीच्या बारीक सारीक तक्रारी सुरू राहतात. बऱ्याचदा सगळ्या आधुनिक चाचण्या, blood reports,stool reports negative येतात आणि मानसिक ताण किंवा anxiety मुळे हा त्रास होत असेल असे निदान आधुनिक डॉक्टर करतात.

पण आयुर्वेदीक दृष्टीकोनातुन तपासले,पेशंट ची संपूर्ण history घेतली की रोग कशामुळे झाला याचे अचूक निदान होते..माझे गुरू नेहमी म्हणतात की बऱ्याचदा “क्ष” किरणांपेक्षा “ज्ञ”(ज्ञान) किरण जास्त उपयोगी ठरतात 🙂 पचन व्यापार हा शरीराची immunity चांगली ठेवण्यासाठी किती जरुरीचा आहे हे मी वारंवार माझ्या पोस्ट मध्ये लिहीत असते…शरीरातले निम्मे अधिक व्याधी पचन व्यापार दुरुस्त केल्यावर ठीक होतात असा अनुभव येतो..

हे वाचा:   सलग आठवडाभर रोज सकाळ संध्याकाळ अंडी खाल्ली तर काय होते.? अंडी खाऊन जिम ला गेल्यास काय होईल.?

IBS चे patient’s नेहमी uncomfortable feel करत असतात .त्यांच्या मनात भीती बसलेली की बाहेर गेल्यावर शौचाला जावे लागले तर..या भीतीने ते कमी खातात. तीन ते सहा महिने चिकित्सा घेतल्यावर IBS पूर्ण बरा होतो..चांगले बरे वाटल्यानंतर सुद्धा पुढचे काही दिवस पथ्य पाणी सांभाळले तर पुन्हा त्रास होत नाही.

आम्हाला आशा आहे आम्ही दिलेल्या या अनोख्या माहितीने तुमच्या ज्ञानात नक्कीच भर पडेल. माहिती आवडल्यास आपल्या जवळच्या व्यक्तीं सोबत शेअर करायला विसरू नका. आपल्या आरोग्याची काळजी घ्या. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *