खाज, खरूज साठी इतर गोष्टी करणे बंद करा.! आजच करा हा साधा सोपा उपाय.! खाज खरुज पासून मुक्ती मिळवा.!

आरोग्य

खाज येणे, अंगावर लालसर चट्टे येणे, खरूज होणे, किंवा हिवाळ्यामध्ये येणारी हाताला सूज अशा या सारख्या अनेक आजारांवर आजचा आपला घरगुती उपाय लाभदायक ठरणार आहे. आजचा उपाय करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला येथे कापूर घ्यायचा आहे. कापुराचा वापर आयुर्वेद शास्त्रामध्ये भरपूर प्रमाणात केला जातो. त्वचेसाठी तर कापूर हा रामबाण उपाय आहे. अनेक आजारांना दूर करण्यासाठी कापराचा वापर केला जातो.

इथे तुम्ही दोन प्रकारच्या कापराचा वापर करू शकता. एक देसी कापूर नाही तर तुम्ही जो रोजच्या वापरातला म्हणजेच देवा साठी वापरला जाणारा कापूर देखील वापरू शकता. आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे आज जो आपण घरगुती उपाय पाहणार आहोत तो तुम्ही बनवून देखील स्टोअर करून ठेवू शकता.
आपल्याला इथे कापराच्या वापर पावडर बनवून करायचा आहे.

कापराच्या तीन ते चार वड्या घेऊन त्यांना बारीक करून त्यांची पावडर बनवून घ्यायची आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट आपल्याला इथे घ्यायची आहे ती म्हणजे कोरफड. कोरफड देखील त्वचेसाठी रामबाण उपाय आहे. तुमच्या जवळ ताजी कोरफड असेल तर तुम्ही त्याचा देखील तेथे वापर करू शकता. जर नसेल तर तुम्ही एलोवेरा जेल देखील वापरू शकता. पण जर शक्य होत असेल तर तुम्ही ताज्या कोरफडीचाच वापर करावा.

हे वाचा:   याचा एकच खुराक घ्यायचा.! खोकला कायमचा विसरून जायचा.! घशात साठलेला सगळा कफ होईल मोकळा.! खूप उपयोगी पडेल.!

कारण त्यामध्ये कोणत्याही केमिकल चा वापर केला जात नाही.त्यानंतर तुम्हाला कोरफडी मधील जेल चार ते पाच चमचा वापरायचे आहे. जर तुम्ही दोन कापूराच्या वड्या घेत असाल तर चार चमचे एलोवेरा जेल घ्यायचे आहे. आणि जर चार कापराच्या वड्या घेत असाल तर तुम्हाला आठ ते दहा चमचे एलोवेरा जेल घ्यायचे आहे. त्यानंतर या दोघांनाही चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे.

त्यांची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला इथे तुळशीच्या पानांचा उपयोग करायचा आहे. तुम्हीही तुळशी कोणत्याही प्रकारची घेऊ शकता. आपल्यालाही तुळशीची पाने स्वच्छ धुवून घ्यायची आहे. त्यानंतर या तुळशीच्या पानांची आपल्याला बारीक पेस्ट तयार करून घ्यायचे आहे. आपल्या शरीरासाठी त्यापेक्षाही महत्वाचे म्हणजे आपल्या त्वचेसाठी तुळशीच्या पानांचा वापर आयुर्वेदात मध्ये देखील केला जातो.

त्यानंतर त्यामध्ये तीन ते चार चमचा आपल्याला लिंबाचा वापर करायचा आहे. जर तुम्हाला कापूर तुळशी किंवा लिंबू यापासून कोणत्याही प्रकारची ऍलर्जी असेल तर तुम्ही याचा वापर करू नये. त्याचबरोबर तुम्हाला पि’त्ताचा त्रास असेल तर तुम्ही कापूर आणि तेलाचा वापर करू शकता. त्यासाठी कापराच्या पावडर मध्ये दोन ते तीन थेंब नारळाचे तेल घालून अंगावर लावायचे आहे.

हे वाचा:   काही दिवस डिंकाचे लाडू खाल्ल्याने शरीरात झाले असे काही बदल.! अनेकांना हे अजिबात माहिती नाही.! प्रत्येकाने जाणून घ्या.!

आता आपण बनवून घेतलेले मिश्रण खरुज किंवा त्वचेच्या कोणत्याही आजारावर लावू शकतो. सलग एक आठवडा हा उपाय केल्याने तुम्हाला भरपूर प्रमाणात फरक झालेला जाणवून येईल. हा उपाय करण्यासाठी आपण वापरलेले साहित्य देखील अगदी नैसर्गिक असल्याने आपल्या शरीरावर त्यांचा कोणत्याही प्रकारचा दुष्परिणाम जाणवून येत नाही परंतु जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची ऍलर्जी असेल तर त्या आधी तज्ञ मंडळींचा सल्ला अवश्य घ्या त्यानंतरच हा उपाय अवश्य करू शकता.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *