कधी अचानक दुखायला लागले गुडघे तर पटकन करावा हा व्यायाम.! सलग आठ दिवस हा व्यायाम केल्यास मिळतो भरपूर आराम.!

आरोग्य

हल्ली प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या समस्या त्रास देत असतात. असा एखादा व्यक्ती असेल की त्याला काही आजार किंवा त्रास नसेल परंतु 99 टक्के लोकांना हल्ली जीवनामध्ये कोणत्या ना कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. आपल्यापैकी अनेकांना गुडघ्याच्या समस्या त्रास देत असतात. पूर्वीच्या काळी गुडघ्याच्या समस्या विशिष्ट वय झाल्यावर त्रास देत असेल परंतु हल्ली ही समस्या लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांमध्ये देखील पाहायला मिळते.

गुडघ्याच्या समस्या त्रास देऊ लागल्यावर आपण फिजियोथेरेपीस्ट कडे जातो आणि वेगवेगळे उपचार करत असतो परंतु आपल्यापैकी अनेकांना अर्थराइटिस म्हणजे हाडांच्या समस्या, गुडघेदुखीचे समस्या दिवसेंदिवस त्रास देत असतात. या समस्यांकडे आपण दुर्लक्ष केले तर भविष्यात गंभीर आजार देखील आपल्याला होऊ शकतात म्हणूनच आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत. आजच्या लेखामध्ये आपण असे काही उपाय जाणून घेणार आहोत.

हे उपाय घरच्या घरी करता येणारे आहेत. या उपायांमध्ये आपण असे काही व्यायामाचे प्रकार जाणून घेणार आहोत ज्यामुळे आपले गुडघे लवकरच बरे होतील, चला तर मग जाणून घेऊया आपले गुडघे मजबूत व सदृढ बनवण्यासाठी आपल्याला कोणकोणते व्यायाम करायचे आहे त्याबद्दल…
गुडघ्याचे आरोग्य सदृढ व मजबूत राहण्यासाठी आपण काही व्यायाम प्रकार जाणून घेणार आहोत. त्यातील पहिला व्यायाम प्रकार म्हणजे क्नी प्रेस.

या व्यायाम प्रकारांमध्ये आपल्याला आपल्या गुडघ्याच्या खाली उशी घ्यायची आहे. ही उशी गुडघ्याच्या खाली ठेवल्यानंतर आपल्याला गूडघ्यानी उशी प्रेस करायचे आहे. जितके शक्य होईल तितकी उशी प्रेस आपल्याला करायची आहे आणि त्यानंतर काही वेळ गुडघे रोखून ठेवायचे आहे जेणेकरून कोणत्याही प्रकारची हालचाल होणार नाही. आपल्याला असे पाच सेकंद करायचे आहे त्यानंतर गुडघे सर्वसाधारण स्थितीमध्ये आणायचे आहेत.

हे वाचा:   अनेक लोकांनी तुरटीचे पाणी वापरले, त्यामुळे काय झाले बघा तुम्हीच.! शरीरात झाले असे काही बदल..! आता करत आहे...

ही प्रक्रिया आपल्याला आता पुन्हा पुन्हा करायची आहे.जितका वेळ तुम्हाला शक्य होईल तितका वेळ तुम्ही हा व्यायाम प्रकार करू शकता. दिवसभरातून जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा सहज हा व्यायाम प्रकार करू शकता. हा व्यायाम प्रकार केल्याने तुमच्या गुडघ्याच्या समोरील जो भाग आहे व त्या भागाच्या आजूबाजूच्या काही नसा आहेत त्या मजबूत होतील.

गुडघ्यांच्या आजूबाजूच्या नसा मजबूत झाल्याने र’क्तप्रवाह देखील सुरळीत होईल आणि वेदना जर होत असतील तर त्या वेदना दूर होतील. आता आपल्याला दुसरा व्यायाम प्रकार जाणून घ्यायचा आहे त्या व्यायाम प्रकाराचे नाव आहे स्ट्रेट लेग रेज. हा व्यायाम प्रकार करण्यासाठी आपल्याला जमिनीवर झोपायचे आहे. डोक्याखाली उशी ठेवायची आहे आणि जो गुडघा दुखत आहे तो पाय आपल्याला हळूहळू वर उचलायचा आहे.

पाय वर उचलताना जमिनीपासून ते पायामध्ये 30 अंशाचा कोण असला गेला पाहिजे याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. आपल्या पाय 30 अंश डिग्री पर्यंत उचलल्यानंतर काही वेळ रोखून ठेवायचा आहे त्यानंतर एक ते पाच अंक आपल्याला म्हणायचे आहे पुन्हा आपल्याला पाय जमिनीवर ठेवायचा आहे आणि पुन्हा पुन्हा अशी प्रक्रिया करायची आहे. जितका वेळ तुम्हाला शक्य होईल तितका वेळ आपल्याला हा व्यायाम प्रकार करायचा आहे.

हे वाचा:   ऑपरेशन करण्याआधी नक्की बघा.! डोळ्यांची ताकद दहापट वाढणार.! म'रेपर्यंत चष्मा लागणार नाही.!

हा व्यायाम प्रकार केल्याने आपल्या गुडघ्याच्या आजूबाजूच्या काही मांस पेशी आहेत त्या मोकळ्या होतात तसेच वेदना देखील दूर होतात. आता आपण गुडघ्याच्या आतील ज्या काही मांस पेशी आहेत त्यांच्या वेदना दूर करण्यासाठी आवश्यक असलेला व्यायाम प्रकार जाणून घेणार आहोत या व्यायाम प्रकारात चे नाव आहे पिलो प्रेस थाय. हा व्यायाम प्रकार करण्यासाठी आपल्या जमिनीवर झोपायचे आहे आणि आपले दोन्ही पाय आपल्याला थोडेसे जमिनीवरून उचलून बेंड करायचे आहे आणि आपल्या दोन्ही पायांच्या मध्ये म्हणजेच जांघेच्या ठिकाणी आपल्याला उशी ठेवायची आहे.

आता आपल्याला उशी दाबायची आहे जेणेकरून दोन्ही गुडघ्यांवर प्रेशर निर्माण होईल आणि जितकं शक्य होईल तितका प्रेशर देण्याचा प्रयत्न करा. असे काही सेकंद म्हणजेच दहा सेकंद केले तरी चालतील. हा व्यायाम प्रकार केल्याने आपल्या गुडघ्यांचा आतील नसा पूर्णपणे मोकळ्या होतील. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *