उन्हाळ्यात या काही पदार्थाना हात पण लावू नका.! असे काही पदार्थ जे उन्हाळ्यात खाल्ले नाही पाहिजे.!

आरोग्य

आता उन्हाळा आला असल्यामुळे आपल्याला घाम येण्याचे प्रमाण वाढलेले आहे आणि त्यामुळे आपल्या शरीरातील पाण्याची मात्रा खूप कमी होत चाललेली आहे. या सगळ्या परिस्थिती मुळे आपल्याला अनेक प्रकारच्या आजारांना सामोरे जावे लागते. जसे की डीहायड्रेशन, का’वी’ळ, डा’य’रिया किंवा फूड पॉयझनिंग सारखे आजार आपल्याला होऊ शकतात. गरमीमध्ये आपल्या शरीरातील साखर आणि मिठाचे प्रमाण कमी होत जाते आणि त्यामुळे आपल्याला कमजोरी येऊ शकते.

खनिज पदार्थ आपल्या शरीराला ताकद देण्याचे काम करतात. यासारख्या आजार आपल्याला नाही झाले पाहिजे यासाठी आपल्याला आपल्या जीवनाचे आणि आपल्या शरीराची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. आज आपण जाणून घेणार आहोत काही असे पदार्थ जे आपल्याला उन्हाळ्यामध्ये खायचे नाही आहेत आणि काही असे पदार्थ जे आपल्याला उन्हाळ्यामध्ये खायचे आहेत. चला तर मग जाणून घेऊया.

सर्वप्रथम आपल्याला चाय आणि कॉफी पूर्णपणे टाळायचे आहे कारण चाय आणि कॉफीचे सेवन केल्यामुळे आपल्या शरीरामध्ये गरमी वाढते आणि त्याचबरोबर यामध्ये कॅफीन यासारखे भरपूर तंतू पदार्थ असतात ज्यामुळे तुम्हाला डीहायड्रेशन होऊ शकते आणि जुलाब सारख्या समस्या येऊ शकतात. त्यामुळे शक्यतो चहा आणि कॉफी आपल्याला गरमीच्या दिवसांमध्ये टाळायचे आहे.

जर तुम्हाला चाय आणि कॉफी प्यायची सवय असेल तर तुम्ही सकाळच्यावेळी थोड्या प्रमाणात ग्रीन टी पिऊ शकता. यानंतर तळलेले पदार्थ आणि जंक फूड म्हणजेच बाहेरचे खाद्यपदार्थ. जे आपल्या स्वास्थ्यासाठी अजिबात चांगले नसतात. जर आपण पाहिले तर फक्त गरमी मध्येच नाही तर आपल्या शरीरासाठी या पदार्थांचे सेवन कधीही कमी केले तर अत्यंत फायदेशीर आहे.

म्हणूनच तळलेले पदार्थ गरमीच्या दिवसांमध्ये खाणे हे आपल्या शरीरासाठी आणि आपल्या स्वास्थ्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. त्याचबरोबर जर तुम्ही मांसाहारी असाल तर तुम्हाला गरमीच्या दिवसांमध्ये मटन, चिकन आणि मासे यासारखे पदार्थ टाळायचे आहेत. कारण या सारखे पदार्थ खाल्ल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये गरमी चे प्रमाण वाढते. आणि त्यामुळे आपल्याला शरीराचे आजार होऊ शकतात.

हे वाचा:   बस्स फक्त हे एक तेल..! खाज, खरुज, गजकर्ण ची एका रात्रीत होईल सुट्टी !!

त्यामुळे आपल्याला मांस, मटण खाणे टाळायचे आहे.त्यानंतर ड्राय फ्रुट्स तुम्हा सर्वांच्या मनामध्ये हा विचार आला असेल की ड्रायफ्रूट्स आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतात तर गरमीमध्ये ड्रायफूट का खाऊ नयेत?. तर त्याचे कारण म्हणजे जर आपण जास्त प्रमाणात ड्रायफ्रूट्स खात असू तर ते आपल्या शरीरात उष्णता निर्माण करू शकतात आणि त्यामुळे आपल्या शरीराला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

त्यासाठी गरमीमध्ये आपल्याला ड्रायफ्रुट्स चा वापर कमी प्रमाणात करायचा आहे. जर तुम्हाला ड्रायफ्रुट्स खायचे असतील तर तुम्ही यांचा वापर भिजून करू शकता. आता आपण जाणून घेणार आहोत त्या गोष्टी ज्या आपण गर्मीमध्ये खाल्ल्या पाहिजेत. तर सर्वप्रथम कलिंगड उन्हाळ्यामध्ये डीहायड्रेशन पासून वाचण्यासाठी आपल्याला कलिंगडाचे सेवन करणे अत्यंत लाभदायी ठरते. कलिंगडमध्ये फायबरची मात्रा जास्त प्रमाणात असते.

या व्यतिरिक्त विटामिन सी, विटामिन बी फाइव्ह, अशा प्रकारचे अनेक विटामिन्स कलिंगड मध्ये मिळतात. जर तुम्हाला कलिंगड खाण्यासाठी वेळ मिळत नसेल तर तुम्ही कलिंगडाचा ज्यूस देखील पिऊ शकता. त्यानंतर सातू पासून बनलेले पीठ आपल्याला कोणत्याही किराणा मालाचा दुकानांमध्ये सहजपणे उपलब्ध होईल. गरमीच्या दिवसांमध्ये कोल्ड्रिंक्स पिण्यापेक्षा सातू चे पाणी पिणे अधिक फायदेशीर ठरते. त्याचबरोबर आपण गुलकंद चा देखील वापर करू शकतो.

हे वाचा:   दाढी आणि मिशा लईच पांढऱ्या व्हायला लागल्या असतील तर, हे काम करणे आजच बंद करा दाढी मिशा परत काळ्या कुळकुळीत बनतील.!

गुलकंद आपल्या शरीराला गारवा द्यायला मदत करतो. त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये डीहायड्रेशन पासून वाचवण्यासाठी गुलकंद चा वापर केला जातो. यामध्ये विटामिन सी, विटामिन डी यासारखे विटामिन्स खूप प्रमाणात असतात. गुलकंद आपल्या इम्युनिटी सिस्टिम साठी अत्यंत फायदेशीर असतो. जर आपण जेवणानंतर एक चमचा गुलकंद खाल्ले तर त्यामुळे आपले अन्न पचण्यासाठी खूप फायदा होतो.

त्यानंतर काकडी आपल्याला जेवढ्या प्रमाणात शक्य असेल तेवढ्या प्रमाणात आपण गरमीच्या दिवसांमध्ये काकडीचे सेवन करू शकतो. करण काकडी खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला कोणत्याही प्रकारची हानी होत नाही उलट आपल्या शरीराला थंडावा मिळतो. कारण यामध्ये विटामिन ए, डी वन,डी 6 विटामिन यासारखे विटामिन असतात. त्यामुळे आपले शरीरस्वास्थ्य चांगले राहण्यास मदत होते. आणि डीहायड्रेशन पासून वाचवते.

काकडीमध्ये 90 टक्के पाणी असते. त्यामुळे डॉक्टर देखील आपल्याला गरमीच्या दिवसांमध्ये काकडी खाण्याचा सल्ला देतात. त्याच बरोबर उन्हाळ्यामध्ये आपल्याला ताक देखील प्यायले पाहिजे. यामुळे आपली इम्युनिटी सिस्टम चांगली राहते. त्याचबरोबर यामध्ये भरपूर प्रमाणात पौष्टिक तत्वे आढळतात. यामध्ये पोटॅशियम प्रोटिन्स यासारखे औषधी गुणधर्म असतात. आणि हे औषधी गुणधर्म आपल्या शरीरासाठी अत्यंत लाभदायी असतात.

म्हणून गरमी सात दिवसांमध्ये दूर होते. ताक हे आपल्या शरीरासाठी अमृतासारखे असते. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *