जेवल्यानंतर खूपच ढेकर येतात.? पोटात सतत गॅस राहतो.? अहो मग चिंता करु नका हा उपाय देईल तुम्हाला या सर्वांपासून सुटका.!

आरोग्य

आपल्या पैकी अनेकांना रोज-रोज गॅस ची समस्या त्रास देत असते. जेवल्यावर अन्न न पचल्यामुळे आंबट ढेकर येत असतात, पोटाची जळजळ ,छातीमध्ये जळजळ, अशा सर्व समस्या आजचा उपाय केल्याने कायमच्या दूर होतील. आजचा आपला घरगुती उपाय या समस्यांवर हमखास मात करण्यासाठी आहे. चला तर मग जाणून घेऊया हा घरगुती उपाय बनविण्यासाठी आपल्याला काय काय सामग्री लागणार आहे.

सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे तो आहे ओवा. ओव्यामध्ये खूप जास्त प्रमाणात औषधी गुणधर्म आढळतात. सर्दी , खोकला, अंगदुखी अशा अनेक आजारांवर ओवा उपयोगी ठरतो. आपल्या सर्वांच्या घरामध्ये ओवा सहजपणे मिळून जाईल. त्याच बरोबर ऍसिडिटी साठी देखील ओवा खूप फायदेशीर आहे. त्याचबरोबर आपल्याला दुसरी गोष्ट इथे लागणार आहे ती म्हणजे जिरा. जीरा मध्ये भरपूर प्रमाणात पोषकतत्वे असते.

आपल्या रोजच्या जेवणामध्ये आपण जिऱ्याचा वापर करतच असतो. आपल्याला कच्च्या जिर्‍याचा वापर करायचा आहे. कारण जीरा मधील पोषक तत्वे तशीच्या तशी आपल्याला मिळतील. जीरा आपल्या पचनसंस्थेसाठी भरपूर महत्त्वाचा घटक आहे. आपल्याला जिरे आणि ओव्याची बारीक पावडर बनवून घ्यायची आहे. पण त्याआधी आपण या दोन्ही गोष्टींना उन्हामध्ये सुकवून घ्यायचे आहे.

हे वाचा:   वर्षानुवर्षे छातीत साठलेला कफ, खोकला झटपट काढा बाहेर.! दम्याचा आजार होईल गायब.! फक्त दोन वेळा करा हा उपाय.!

त्यामुळे दोन्ही पदार्थात असलेला मोईश्चर निघून जाईल. या पावडर मध्ये आपल्याला काळ्या मिठाचा देखील वापर करायचा आहे. जर कोणाला ब्ल’ड प्रेशर असेल तर त्यांनी काळ्या मिठाचा वापर करू नये पण ज्यांना ब्ल’ड’प्रे’शरचा त्रास नसेल त्यांनी काळे मीठ वापरायचे आहे. आणि आपल्याला या दोन्ही गोष्टी ची पावडर बनवून घ्यायची आहे.

जिऱ्याची पावडर, ओव्याची पावडर आणि काळे मीठ हे एकत्र करून त्याची पावडर बनवून झाल्यानंतर एखाद्या बरणीत आपण ती स्टोअर करून ठेवू शकतो. रोज सकाळी किंवा जेवल्यानंतर तुम्ही या पावडरचा उपयोग नक्की करा. जर तुम्ही पावडर अशीच न खाता गरम पाण्यातून खाल्ली तर ती अधिक फायदेशीर ठरेल.

जर तुम्हाला याचा उत्तम परिणाम हवा असेल तर दुपारी जेवल्यानंतर आणि रात्री जेवल्यानंतर या पावडरचे सेवन करा. तुम्हाला खूप प्रमाणात फरक दिसून येईल. जर तुम्हाला ही पावडर बनवणे शक्य नसेल तर तुम्ही बडीशेप आणि गुळ हे दोन्ही पदार्थ जेवल्यानंतर देखील खाऊ शकता यामुळे तुमची गॅसची समस्या कायमची दूर होईल.

हे वाचा:   घरात हे असे तेल बनवून ठेवा.! केसांना लावल्याने विंचरता-विंचरता कंटाळा येईल इतके भयंकर केस वाढतील.! महिलांनी आवर्जून वाचा.!

वारंवार आंबट ढेकर येणे, अपचन होणे या सर्व समस्या दूर होतील. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *