मरेपर्यंत एकही केस सफेद होणार नाही.! केसांना कायमचे काळे बनवण्यासाठी आजच करा हा साधा सोपा उपाय.!

आरोग्य

थंडीमध्ये सर्वजण मेहंदी लावायला घाबरत असतात. आणि त्यामुळे अनेकांचा कल हा हेअर कलर्स करण्याकडे वळला जातो. आज त्यासाठी आपण मेहंदी लावण्याचा असा प्रकार जाणून घेणार आहोत की त्यामुळे तुम्हाला थंडीमध्ये मेहंदी कशी लावायची हा प्रश्नच कधी उद्भवणार नाही. किंवा तुम्ही हेअर कलर करण्या चा विचार कधीच करणार नाही.

आपण जेव्हा हेअर कलर करतो तेव्हा त्यामध्ये खूप केमिकल असते आणि त्याच मुळे केस डॅमेज होण्याचे प्रमाण वाढते. पण मेहंदी मध्ये पोषक तत्वे असतात. मेहंदी आपल्या केसांना मुलायम आणि चमकदार बनवतात. त्यामुळे आज आपण मेहंदी लावायचा असा प्रकार जाणून घेणार आहोत जो आपल्या केसांसाठी भरपूर प्रमाणात फायदेशीर ठरणार आहे.

त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला कढई घ्यायची आहे. कढई देखील आपल्याला लोखंडाची घ्यायची आहे. कारण त्यामध्ये लोखंडाचे गुणधर्म पण आपल्याला मिळतील. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये 2 ग्लास पाणी घ्यायचे आहे. तुमच्या केसांची लांबी किती आहे यावर तुम्हाला या उपायांमध्ये कोण कोणती सामग्री कोण कोणत्या मापामध्ये घ्यायचे आहे हे पुरेपूर तुमच्यावर अवलंबून आहे.

त्यानंतर त्यामध्ये आपल्याला मेथी टाकायची आहे. आपल्याला माहीतच आहे की, मेथी ही गरम असते. मेथी मध्ये खूप पोषकतत्वे असतात. त्यानंतर तिसरी गोष्ट आपल्याला इथे घ्यायची आहे ती म्हणजे लवंग. लवंग देखील गरम असते. आपल्याला इथे नऊ ते दहा लवंग घ्यायची आहेत. त्यानंतर चौथी गोष्ट आपल्याला घ्यायची आहे ती आहे कढीपत्ता.

कढीपत्ता आपल्याला खूप प्रमाणात न्यूट्रेन्स देतो. त्यानंतर आपल्याला पाचवी गोष्ट घ्यायची आहे ती म्हणजे कॉफी. जेव्हा पांढऱ्या केसांना आपण मेहंदी लावतो तेव्हा ते केस भगवे किंवा लाल रंगाचे दिसतात. आपण येथे कॉफी यासाठी वापरत आहोत जेणेकरून तुमचे केस राखाडी रंगाचे दिसते. आपल्याला या सर्व गोष्टींना मंद आचेवर गरम करून घ्यायचे आहे.

हे वाचा:   बोटे मोडणे योग्य की अयोग्य.? तुम्ही रोज हाताची किंवा पायाची बोटे मोडत असाल तर एकदा नक्की वाचा.!

आपल्याला हे मिश्रण इतक्या वेळा गरम करायचे आहे की दोन ग्लास पाण्याचे एक ग्लास पाणी आपल्याला शेवटी मिळेल. त्यानंतर ज्या ग’र्भ’व’ती स्त्रिया आहेत त्या कधी कधी मेहंदी लावणे नाकारतात किंवा ज्यांना लहान मुले आहेत तेदेखील मेहंदी लावण्यासाठी घाबरतात. त्यांनी जर हेच पाणी अजून थोडा वेळ गरम करून ते पाणी जरी केसांवर लावले तरीही तुम्हाला राखाडी रंग तुमच्या केसांना येईल.

मिश्रण व्यवस्थित गरम झाल्यानंतर आपल्याला गॅस बंद करून हे पूर्ण मिश्रण आणि पाणी थंड होऊ द्यायचे आहे. थंड झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये आपण टाकलेली सामग्री आणि पाणी गाळून घ्यायचे आहे. त्यानंतर आपण टाकलेली सामग्री म्हणजेच मेथीदाणा,कढीपत्ता, कॉफी आणि लवंग याची पेस्ट बनवून आपण नंतर कधीतरी केसांना ही लावू शकतो त्याने देखील आपले केस मुलायम आणि चमकदार होतील.

आता मात्र आपल्याला इथे गाळून घेतलेल्या पाण्याचा वापर करायचा आहे. आता आपल्याला त्या पाण्यामध्ये मेहंदी टाकायची आहे. आपल्याला हळूहळू त्या पाण्यामध्ये मेहंदी मिक्स करायची आहे. आपल्याला प्रयत्न करायचा आहे की त्यामध्ये कोणत्याही प्रकारची गाठे किंवा छोटे छोटे खडे बनणार नाही याची काळजी घायची आहे. आपल्याला या मिश्रणाला एकत्रितपणे मिक्स करून एक पातळ अशी पेस्ट बनवायची आहे.

हे वाचा:   केसात कोंडा आता बघवत नाही का.? कितीही शाम्पू वापरले तरी जात नाही का.? त्यासाठी केसांना लावावे लागते हे.!

आणि ही पेस्ट किंवा हे मिश्रण बदलल्यानंतर आपल्याला या मिश्रणाला एक रात्र असेच झाकून ठेवायचे आहे. दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण हि मेहंदी वापरायला घेऊ तेव्हा ती पूर्णपणे त्याचा रंग काळा झालेला असेल. त्यानंतर आपण या मेहंदीला आपल्या केसांवर लावू शकतो. जर तुम्ही हा मेहंदी चा वापर थंडी मध्ये करत असाल तर तुम्हाला फक्त अर्धा किंवा पाऊण तास ही मेहंदी तुमच्या केसांमध्ये ठेवायची आहे.

आणि जर तुम्ही उन्हाळ्यामध्ये त्या मेहंदी चा वापर करत असाल तर दोन तास तुम्ही मेहंदी ठेवू शकता. एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला इथे पहायची आहे ती म्हणजे जेव्हा तुम्ही मेहंदी धुवाल, जेव्हापण तुम्ही हेअर वॉश कराल तेव्हा तुम्हाला काळजी घ्यायची आहे की तुम्ही कोमट पाण्याने किंवा थंड पाण्याने तुमचे केस धुतले पाहिजे.

जेव्हा आपण केस धुण्यासाठी गरम पाण्याचा वापर करतो तेव्हा आपली केसांमधील त्वचेला, भविष्यात तुम्हाला कोंड्याचा त्रास होऊ शकतो. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *