अरे बापरे.! एम-आर-आय स्कॅन कसा केला जातो माहिती आहे का.? ही माहिती कोणालाही माहिती नसेल एकदा नक्की वाचा.!

आरोग्य

आपल्या शरीरात 78 पेक्षा जास्त अवयव आहेत. प्रत्येक अवयवाचे विशिष्ट असे कार्य आहे. प्रत्येक अवयव महत्त्वाचे कार्य पार पाडत असतो आणि आपल्या शरीराची रचना व्यवस्थित रित्या कार्य करत असते. जर या अवयवांपैकी एखादा अवयव जरी खराब झाला किंवा त्याच्या कार्यामध्ये बिघाड झाला तर त्या सर्वांचा विपरीत परिणाम आपल्या शरीरातील प्रत्येक अवयवांवर दिसून येतो.

आपले शरीर व्यवस्थित कार्य करण्यासाठी प्रत्येक अवयव अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतो. जर एखादा अवयव खराब झाला तर डॉक्टर आपल्याला एखादी टेस्ट करायला सांगतात त्याचबरोबर आपल्यापैकी अनेकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतात. जर एखादा अवयव त्याचे कार्य करण्यामध्ये असमर्थ ठरला तर डॉक्टर कसे काय ओळखतात?

डॉक्टरांना कसे काय कळते की हाच अवयव खराब झालेला आहे. डॉक्टर नेमके आपल्याला वेगवेगळ्या टेस्ट करायला कशा पद्धतीने सांगतात. जर तुमच्या मनामध्ये देखील अशा प्रकारचे काही प्रश्न निर्माण झाले असतील तर आज आम्ही या प्रश्नांचे काही उत्तर सांगणार आहोत. जर आपल्या शरीरामध्ये छोटे-मोठे काही बिघाड झाले तर डॉक्टर आपल्याला ब्लड टेस्ट, एक्सरे , इसिजी करायला सांगतात.

अनेकदा डॉक्टर आपल्याला एक टेस्ट करायला सांगतात टेस्ट म्हणजे एमआरआय स्कॅन. हे नाव ऐकताच अनेकांच्या भुवया उंचावतात. अनेकांना या टेस्ट बद्दल फारशी माहिती नसते. या टेस्ट बद्दल अनेकांना फारशी माहिती नसल्यामुळे वेगवेगळे प्रश्न देखील त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेले असतात. ही टेस्ट का केली जाते? कधी केली जाते?

ही टेस्ट करताना नेमके आपल्याला काय खबरदारी घ्यायची आहे. ही टेस्ट करताना एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो का? असे विविध प्रश्न निर्माण होतात त्याच बरोबर ही टेस्ट करण्यासाठी किती पैसे खर्च होतात वगैरे वगैरे असे अनेक शंका-कुशंका मनामध्ये निर्माण होतात. आजच्या लेखामध्ये आम्ही तुम्हाला एमआरआय स्कॅन एस बद्दल महत्त्वाची माहिती सांगणार आहोत, जेणेकरून तुमच्या मनामध्ये जर कोणत्याही प्रकारचा गोंधळ निर्माण झाला असेल तर तो दूर होईल चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल.

जर वैद्यकीय भाषेमध्ये एमआरआय स्कॅन बद्दल जाणून घ्यायचं असेल तर एमआरआय याचा पूर्ण अर्थ मॅग्नेटिक रेझोननस इमेजिंग असे आहे आणि हिंदी मध्ये चुंबकीय अनुनाद इमेजींग असे म्हंटले जाते. या टेस्ट प्रामुख्याने वापर आपल्या शरीरातील कोणतीही समस्या निर्माण झाली असेल तर ती शोधून काढण्यासाठी केला जातो त्याचबरोबर चा डॉक्टरांना एखाद्या आजाराचे निदान जर लवकर सापडत नसेल तर व निदान लवकर व्हायला पाहिजे यासाठी येणार आहे टेस्ट स्कॅन केली जाते.

हे वाचा:   फक्त पाच मिनिटाचा हा उपाय करून बघा; एखाद्या अभिनेत्री प्रमाणे ओठ दिसू लागतील, जाणून घ्या ओठाची सुंदरता वाढवण्याचा भन्नाट उपाय.!

जसे की में’दूमधील एखादी समस्या, मणक्‍यांमध्ये झालेली गा’ठ तसेच स्त’नांमध्ये झालेली कॅ’न्स’र ची गाठ, हृदयामध्ये ब्लॉकेज, गुडघ्या मधील एखादी झालेली गाठ ,लीवर मध्ये आलेली सूज तसेच महिलांच्या बाबतीत असलेला एखादा गुप्त आजार अशा अशा छोट्या छोट्या गोष्टी डॉक्टरांना अनेकदा वेगवेगळ्या रिपोर्ट मधून कळत नाही अशा वेळी डॉक्टर रुग्णांना एम आर आय स्कॅन करण्यास सांगतात.

ही टेस्ट करताना रुग्णाला एका मशीन वर झोपवले जाते. मशीन वर झोपण्याआधी रुग्णाला पांढरे किंवा निळ्या रंगाचे कपडे घालायला दिले जातात. त्यानंतर रुग्णाला झोपायला सांगितले होते रुग्णाच्या ज्या अवयवासाठी एमआरआय स्कॅन करण्यास सांगितले आहे त्याच पद्धतीने विशिष्ट दिशेला तोंड करून झोपण्यासाठी सांगितले जाते. असे केल्यानंतर रुग्णाला मशीन च्या आत मध्ये पाठवले जाते.

मशीन च्या आत मध्ये खूप सारे मॅग्नेटिक वेव व चुंबकीय लहरी यामुळे आपल्या शरीरातील अनेक छोट्या मोठ्या समस्या कॅप्चर केल्या जातात आणि या सर्व गोष्टींचा डेटा मशीन मध्ये सेव केला जातो. ही टेस्ट केली जाते तेव्हा कॉम्प्युटरचा उपयोग केला जातो. कॉम्प्युटरच्या मदतीने ही टेस्ट ऑपरेट केली जाते. या कॉम्प्युटरला चुंबकीय लहरी पासून संरक्षण मिळण्यासाठी हा कॉम्प्युटर एका वेगळ्या रूम मध्ये ठेवला जातो.

जेव्हा रुग्णांची चाचणी केली जाते तेव्हा रूग्ण मशीन च्या आत मध्ये गेलेला असतो तेव्हा अनेक सेंटरमध्ये रुग्णाच्या कानाला हेडफोन्स लावले जातात. जेणेकरून मशीनमध्ये जो आवाज निर्माण होतो त्या आवाजाचा रुग्णाला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये याकरिता रुग्णाच्या कानाला हेडफोन लावले जातात. आपल्या सांगू इच्छितो की, ही टेस्ट करत असताना रुग्णाला कमीत कमी 20 मिनिटे आणि जास्तीत जास्त 90 मिनिटे मशीनच्या आत ठेवले जाते.

अनेक वेळा काही रुग्णांना दोन दोन मिनिटा करता आत बाहेर सुद्धा केले जाते. अशा परिस्थितीत अनेकदा डॉक्टर रुग्णाला श्वास आत मध्ये घेण्यास किंवा बाहेर सोडण्यात देखिल सांगत असतात. प्रत्येक रुग्णानुसार व प्रत्येक अवयवाची वेगवेगळ्या प्रकारची टेस्ट करण्यासाठी आपल्याला वेळ देखील वेगळा लागतो व त्याचबरोबर आपल्याला अनेकदा करावे लागतात.

अन्य एक्स-रे सोनोग्राफी यासारख्या तेच करताना रेडिएशनचा वापर केला जातो परंतु एमआरआय स्कॅन करत असताना कोणत्याही प्रकारच्या रेडिएशन चा वापर केला जात नाही. एमआरआय स्कॅन मुळे आपल्या शरीरातील अंतरित गोष्टी आपल्याला करता येतात त्याच बरोबर जर आपल्या शरीरामध्ये काही छोट्या-मोठ्या समस्या निर्माण झाले असतील तर त्या समस्या एका यंत्राच्या माध्यमातून कॅप्चर केल्या जातात आणि त्यातूनच आपल्याला कळते की नेमकी आपल्या शरीरामध्ये कुठे आणि कोणत्या अवयवाचा आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होत आहे.

हे वाचा:   दोन मिनिटात पोटातला सगळा गॅस बाहेर.! जळजळ, करपट ढेकर, पोट दुखणे सर्व समस्या एकच करा रामबाण उपाय.!

त्यानुसार डॉक्टर वेगवेगळे उपचार देखील आपल्यावर करत असतात आणि त्या डॉक्टरांना आपल्या शरीरामध्ये काय हालचाली घडत आहेत त्यांच्याबद्दल फारशी माहिती कळत नाही म्हणूनच अनेकदा डॉक्टर रुग्णाला ही टेस्ट करण्याचा सल्ला देत असतात. ही टेस्ट करत असताना डॉक्टर कोणतेही ऑपरेशन किंवा चिरफाड करत नाही. विशिष्ट चुंबकिय लहरीचा माध्यमातून डॉक्टरांना आपल्या शरीरातील सूक्ष्म गोष्टींचा अभ्यास करता येतो.

ही टेस्ट करत असताना अनेकदा आपल्याला कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला त्याबद्दलचा विचार देखील मला मदत असतो. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, ही टेस्ट करत असताना आपल्या अंगावर कोणत्याही धातूच्या वस्तू असतील तर त्या काढाव्या लागतात जसे की हातातील घड्याळ, गळ्यातील चैन, हातातील कडे,बोटामध्ये असलेले कडे इत्यादी वस्तू आपल्याला काढून ठेवाव्या लागतात.

जर तुमचे ऑपरेशन झाले असेल ऑपरेशन करत असताना तुमच्या शरीरामध्ये कोणत्याही धातूचा वापर केला गेला असेल तर त्याची माहिती डॉक्टरांना आधीच द्या अन्यथा ही टेस्ट करत असताना तुम्हाला त्रास होऊ शकतो. जर ही टेस्ट करत असताना तुम्हाला बरे वाटत नसेल तर अशा वेळी देखील तुम्हाला डॉक्टरांना सांगणे गरजेचे आहे. जर तुम्ही अस्वस्थ असाल,घाबरलेले असाल, तुमचा ब्ल’डप्रेशर कमी जास्त झाला असेल तरी याबद्दलची माहिती तुम्हाला डॉक्टरांना द्यायला पाहिजे.

जर ही टेस्ट करत असताना आपल्याला अन्नपदार्थ खायचे आहे की नाही याबद्दल देखील अनेकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो परंतु या बद्दलची उचित माहिती तुमचे डॉक्टर देऊ शकतात. अनेकदा डॉक्टर ही टेस्ट करत असताना चार तास आधी काही खाऊ नये, असा सल्ला देत असतात. अनेक घटनांमध्ये डॉक्टर स्वतः डिटेल्स करण्याआधी आपल्याला पाणी पिण्यास सांगतात परंतु आपण कोणत्या अवयवाची टेस्ट करणार आहोत त्या नुसार डॉक्टर प्रत्येक रुग्णाला वेगवेगळे सल्ले देत असतात.

ही टेस्ट करत असताना खर्च देखील जास्त प्रमाणात येत असतो. हा खर्च तुम्ही कोणत्या ठिकाणी व कोणत्या हॉस्पिटलमधून करत आहात यावर देखील अवलंबून असतो. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *