फक्त तीस दिवसात घरीच बनवा अशी बॉडी.! जिम मध्ये सुद्धा जाण्याची गरज नाही.! बॉडी बनवायची असेल तर नक्की वाचा.!

आरोग्य

जेव्हा आपण एखाद्या बॉडीबिल्डरला पाहतो तेव्हा सर्वात पहिली नजर आपली त्याच्या शरीरावर असलेल्या वेगवेगळ्या मांसपेशी वर जाते. त्याचबरोबर त्याचे शोल्डर, बायसेप, ट्रायसेप यांच्याकडे नजर आपली रोखली जाते.अशा वेळी आपल्या मनामध्ये देखील प्रश्न निर्माण होतो. जर आपली सुद्धा बॉडी त्या व्यक्ती सारखी असती तर आपले सुद्धा शरीर दिसायला आकर्षक दिसले असते आपण सुद्धा चारचौघांमध्ये उठून दिसलो असतो.

जर असाच प्रश्न तुमच्या मनामध्ये देखील येत असेल आणि तुम्हाला बॉडी बनवायची आहे परंतु काही ना काही कारणामुळे शक्य होत नसेल, व्यस्त जीवनशैलीमुळे तुम्हाला जिम लावायला वेळ मिळत नसेल तर चिंता करू नका.आपण असे काही व्यायाम प्रकार जाणून घेणार आहोत.या व्यायाम प्रकारामुळे तुम्ही सहज रित्या शरीराचा आकार पिळदार करू शकतात आणि तुमचे बायसेप ट्रायसेप यांचा आकार वाढवू शकता.

आपले आर्म सुंदर आणि आकर्षक दिसण्यासाठी आपल्याला वेगवेगळे व्यायाम प्रकार करणे गरजेचे ठरते त्यासाठी आपण पहिला व्यायाम प्रकार जाणून घेणार आहे तो म्हणजे ट्रायसेप डीप्स. ट्रायसेप डिप्स आपण योग्य पद्धतीने दहा दहा चे दोन सेट जरी रोज घरच्याघरी मारले तरी आपले ट्रायसेप व्यवस्थित रित्या तयार होतील यासाठी आपल्याला गरजेच नाही की जिम मध्ये जायला हवे.

आपण घरी देखील व्यवस्थितरीत्या ट्रायसेप डीप्स मारू शकतो यासाठी तुम्ही तुमच्या बेडचा देखील वापर करू शकता त्यानंतरचा दुसरा व्यायाम प्रकार आहे डायमंड पुशअप. या डायमंड पुश अप मुळे आपल्याला चांगले व्यक्तिमत्व निर्माण करण्यासाठी मदत करतात. सर्वसाधारणपणे पुश अप आपण सगळेजण करतो परंतु डायमंड करताना आपल्याला आपले हात जवळ करायचे आहेत आणि पुशअप मारायचे आहेत.

आपले हात जवळ केल्याने आपल्या शरीराचा आकार डायमंड प्रमाणे होतो म्हणूनच या व्यायाम प्रकाराचा डायमंड पुश अप असे म्हणतात. हा व्यायाम प्रकार केल्याने आपले ट्रायसेप वेगाने वाढू लागतात तसेच आकार व्यवस्थित रित्या दिसून येऊ लागतो. हा व्यायाम प्रकार करताना आपल्याला काळजी देखील घ्यायची आहे. हा व्यायाम प्रकार करताना आपल्याला अगदी स्लो मध्ये हा प्रकार करायचा आहे. हे पुश अप मारतांना अगदी सावकाश खाली जायचे आहे आणि पुन्हा वर यायचे आहे.

हे वाचा:   केस धुण्याची अशी पद्धत माहिती असणारे कधीही जात नाही पार्लर मध्ये.! लाखो रुपये वाचतील, केस दिसतील मोकळे आणि सुंदर.!

सावकाश पणे आपण हा व्यायाम प्रकार करु तितकाच आपल्या ट्रायसेप चा आकार व्यवस्थित रित्या दिसून येईल. आता आपल्याला व्यायामाचा दुसरा प्रकार जाणून घ्यायचा आहे. या व्यायाम प्रकाराची नाव आहे ट्रायसेप एक्सटेन्शन. हा व्यायाम प्रकार आपण बार, डंबेल्स किंवा झिग् जॅक रॉड पद्धतीने देखील करू शकतो. हा व्यायाम प्रकार करताना आपल्याला एक हात पाठीच्या मागे ठेवायचा आहे आणि एका हातामध्ये आपल्याला बार किंवा डंबेल्स पकडायचे आहेत.

आपला हातवर करून पुन्हा डोक्याच्या दिशेने खाली आणायचे आहे. आपल्याला हा व्यायाम प्रकार अगदी सावकाश करायचा आहे. जर तुम्ही ट्रायसेप व्यायाम करत असताना जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची वेदना झाली नाही तर याचा अर्थ तुम्ही व्यायाम योग्य पद्धतीने करत नाही तसेच तुम्ही तुम्हाला जितके शक्य होईल तितके डंबल्सचे साईज म्हणजेच आकार देखील वाढवायचा आहे यामुळे तुमचे ट्रायसेप लवकर दिसायला मदत होईल.

आपल्यापैकी अनेकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की प्राइस आणि बायसेप हे दोन्ही व्यायाम प्रकार एकाच वेळी करायचे का? जर तुमच्या मनामध्ये देखील हा प्रश्न निर्माण झाला असेल तर त्याचे उत्तर आहे नाही. कारण की जेव्हा आपण हे दोन्ही व्यायाम प्रकार एकाच वेळी करतो तेव्हा आपले हात व्यवस्थित रित्या कार्य करू लागत नाही. तसेच जो काही व्यायाम प्रकार आपण करणार आहोत तो योग्य पद्धतीने केला जात नाही.

हाताच्या ज्या काही मांस पेशी असतात त्या थकलेले असतात आणि म्हणूनच तुमच्या कडून कोणताही व्यायाम प्रकार व्यवस्थित होणार नाही. व्यायाम प्रकार व्यवस्थित न झाल्यामुळे तुमच्या ट्राय सेप चा आकार देखील व्यवस्थित रित्या दिसून येणार नाही म्हणून शक्यतो दोन्ही ट्रायसेप, बायसेप व्यायाम एकत्र करू नका. आपल्या बायसेप चा आकार वाढवण्यासाठी सर्वात महत्त्वाचा व्यायाम प्रकार म्हणजे बायसेप कल्स.

हे वाचा:   आतापर्यंतचा सर्वात मोठा खुलासा उघडकीस.! अंजीर खाल्ल्याने काय झाले तुम्हीच तुमच्या डोळ्याने बघा.!

हा व्यायाम प्रकार करताना आपल्याला आपले दोन्ही हात सरळ खालच्या बाजूला ठेवायचे आहेत आणि जितके डंबेल्स आकार तुम्हाला उचलायला शक्य होतील ते हातामध्ये धरून हाताचे कोपरे पोटाच्या बाजूला चिटकवून डंबल्स वर खाली करायचे आहेत. जितका वेळ तुम्हाला शक्य होईल तितक्या वेळा तुम्हाला हा व्यायाम प्रकार करायचा आहे, असे केल्याने तुमच्या बायकोचा कार लवकरच बाहेर आलेला दिसून येईल.

जर तुम्हाला तुमची बायसेप समोरच्या बाजूने आकाराने मोठे दिसायला हवेत असे वाटत असेल तर यासाठी तुम्हाला हॅमर बायसेप हा व्यायाम प्रकार करायचा आहे. हा व्यायाम प्रकार केल्याने तुमच्या बायसेपचा आकार समोरून आकर्षक दिसेल. कोणताही व्यायाम प्रकार करताना एक गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवायला हवी ती म्हणजे जर तुमच्या शरीरातील हाडे मजबूत असतील तर तुम्ही कोणताही व्यायाम प्रकार करू शकतात.

जर हाडं ठिसूळ आणि कमकुवत असेल तर तुम्हाला कोणता व्यायाम प्रकार करायला शक्य होणार नाही म्हणूनच आपल्याला आपल्या शरीरातील हाडे मजबूत तंदुरुस्त ठेवण्यासाठी आपल्या आहारामध्ये कॅल्शियमयुक्त पदार्थांचा समावेश करायला पाहिजे त्याचबरोबर ज्या पदार्थांमध्ये कॅल्शिअमचे प्रमाण जास्त असते प्रोटीन जास्त असते ते पदार्थ नित्यनियमाने सेवन करायचे आहेत.

अशा प्रकारे जर तुम्ही काही महत्त्वाची काळजी घेतली तर तुमचे शरीर ट्रायसेप काही दिवसांमध्येच आकर्षक दिसू लागतील आणि तुमचे व्यक्तिमत्त्व सुद्धा चारचौघांमध्ये आकर्षक दिसेल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *