उन्हाळ्यात फ्रीज मधले पाणी पिणारे एकदा नक्की वाचा.! शरीरातील थंड पाणी नेमके काय करते.?

आरोग्य

हल्ली वातावरणामध्ये प्रचंड प्रमाणात उष्णता जाणवत आहे. प्रत्येक व्यक्ती गरमीमुळे त्रस्त झालेला आहे. अशा वेळी शरीरातील पाण्याची मात्रा कमी झाल्याने अनेकांना चक्कर येणे, वारंवार तहान लागणे, अशक्तपणा, थकवा यासारख्या समस्या त्रास देत आहेत. बाहेर गेल्यावर प्रचंड प्रमाणामध्ये उष्णता जाणवू लागते आणि म्हणूनच अनेकदा जास्त प्रमाणात बाहेर जाऊ नये.

उन्हापासून आपले संरक्षण व्हावे यासाठी अनेक तज्ञ मंडळी आपल्याला सल्ला देखील देत असतात. बाहेर गेल्यावर आपल्याला तहान लागल्यावर आपल्यापैकी अनेक जण थंड पाणी पीत असतात. आपल्या सर्वांना थंड पाणी प्यायला खूपच आवडत असते. थंड पाणी प्यायल्याने आपल्या जीवाला शांतता लागते. पूर्वीच्या काळी रस्त्यावर आपल्याला रांजण दिसायचे. मातीचे मडके दिसायचे. अशावेळी आपण मडक्यातील थंड पाणी प्यायचो परंतु हल्ली सगळीकडे बदल झालेला आहे.

मडक्याची जागा फ्रिजने घेतलेली आहे. फ्रीज हे असे उपकरण आहे जे प्रत्येकाच्या घरी सहज पाहायला मिळते. फ्रीजमधील पाणी कमी कालावधीमध्ये थंड होते. आपल्याला पाहिजे तेव्हा आपण फ्रीजमधील थंड पाणी पिऊ शकतो. आपल्यापैकी अनेक जण थंड पाणी पितात. काहींना खूप थंड पाणी लागते. काही जण बर्फ खात असतात. प्रत्येकाच्या आवडीनुसार प्रत्येकजण थंड पाणी पीत असतो परंतु थंड पाणी पिणे जरी काही काळासाठी चांगले वाटत असेल तरी भविष्यात याचे अनेक गंभीर परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात.

आजच्या लेखामध्ये आम्ही तुम्हाला फ्रिजमधील थंड पाणी प्यायल्याने आपल्या शरीरावरील कोणकोणते विपरीत परिणाम होतात याबद्दल अत्यंत महत्वाची माहिती सांगणार आहोत. ही माहिती वाचून झाल्यावर तुम्ही भविष्यात थंड पाणी सेवन करण्याचे प्रमाण अत्यल्प कराल अशी आम्ही आशा देखील व्यक्त करतो. चला तर मग जाणून घेऊया की फ्रीजमधील थंड पाणी प्यायला आणि आपल्या शरीरावर नेमके कोणकोणते परिणाम पाहायला मिळतात त्याबद्दल…

हे वाचा:   फक्त एकदा अशा प्रकारे करा सेवन.! गुडघे दुखी नेमकी असते काय हेच विसरून जाल.! नव्वदी मध्ये असलेला माणूस सुद्धा पळू लागेल.!

आपल्या प्रत्येकाच्या घरी फ्रिज असते. फ्रिजमध्ये आपण अनेक वस्तू साठवणूक करून ठेवतो जेणेकरून या वस्तू भविष्यात लवकर खराब होणार नाही याची काळजी देखील आपण घेत असतो. फ्रिजमध्ये प्रत्येक जण पाण्याच्या बाटल्या भरून ठेवतो. जेणेकरून बाहेरून आल्यावर थंड पाणी पिता येईल. फ्रिजमध्ये खूप कमी तापमानाच्या मदतीने पाणी थंड केले जाते.

मर्यादित तापमानापेक्षा कमी तापमानामुळे थंड झालेल्या पाण्यामुळे आपल्या शरीराला खूप सार्‍या समस्यांना तोंड द्यावे लागते. जी व्यक्ती वारंवार थंड पाणी सेवन करते अशा व्यक्तीच्या पोटाची क्षमता कमी होते. पोटाची कार्यक्षमता कमी झाल्याने आपल्या शरीरातील मोठे आतडे व्यवस्थित रित्या काम करत नाही परिणामी पचनसंस्था व्यवस्थित कार्य करत नाही.

आपली पचनसंस्था जर योग्य प्रमाणात कार्य करत नसेल तर अशा वेळी भविष्यात तुम्हाला ब’द्ध’को’ष्टता, अपचन, पोट वेळेवर साफ न होणे मळ पोटा मध्येच सडणे अशा विविध समस्या त्रास देऊ शकतात. असे म्हटले जाते की, ज्या व्यक्तीचे पोट नियमितपणे स्वच्छ होते अशा व्यक्तीला भविष्यात कोणत्याही प्रकारच्या आजारांना सामोरे जावे लागत नाही परंतु जर तुमचे पोट साफ झाले नाही तर तुमचे जीवन भविष्यात खराब होऊ शकते.

तुम्हाला अनेक आजारांची लागण देखील होऊ शकते. मर्यादेपेक्षा जास्त थंड पाणी प्यायल्याने आपल्या शरीरातील र’क्त पेशीका जास्त प्रमाणात कार्य करत नाही. र’क्त’ पेशीका आखडून जातात आणि शरीरातील र’क्तप्रवाह देखील सुरळीत होत नाही. शरीरातील र’क्तप्रवाह सुरळीत न झाल्याने त्याचा थेट परिणाम आपल्या शरीरातील मेटाबोलिजम व हृ’दयाच्या हालचालीवर होत असतो.

हे वाचा:   लसणाचा केला जाऊ शकतो असाही उपयोग, कानामध्ये टाकून ठेवा काही वेळ सर्व ठणक दोन मिनिटात शांत होईल.!

थंड पाणी सेवन केल्याने आपल्या जीवाला जरी शांतता मिळत असेल तरीही तुमच्या हृ’द’यासाठी अजिबात चांगले नाही थंड पाणी प्यायल्याने हृदयाची गती कमी होते परिणामी हृ’दय जास्त काम करत नाही. थंड पाणी प्यायल्याने आपल्याला घशा संदर्भातील आजार देखील उद्भवतात. आपल्या घशामधील ज्या नसा असतात त्या जास्त प्रमाणात सक्रिय राहत नाही परिणामी आपल्याला घसा दुखणे, घसा खवखवणे, घसा बसणे यासारख्या समस्या त्रास देऊ लागतात.

थंड पाणी नेहमी प्यायल्याने आपल्या पोटाची गती मंद होते व आपले पोट साफ होत नाही. आपल्याला भूक लागत नाही. हीच सवय वारंवार उद्भवल्याने आपल्याला भविष्यात मु’ळ’व्या’ध सारख्या गंभीर आजार देखील होऊ शकतो म्हणूनच यासारख्या समस्या टाळायचे असतील तर आपल्याला मडक्यातील पाणी प्यायला पाहिजे. मडक्यातील पाणी प्यायल्याने तुमच्या शरीराला कोणतेच नुकसान भोगावे लागत नाही.

मडक्यातील पाणी नियमितपणे प्यायल्याने आपल्या शरीराचे तापमान देखील सुरळीत राहते. मडक्यातील पाणी वातावरणातील बदलानुसार थंड होत असते त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये जर कॅल्शियमची मात्रा कमी झाली असेल तर त्यामुळे ती भरून निघते. तुम्हीसुद्धा या गरमीच्या दिवसात थंड पाणी मर्यादेपेक्षा जास्त पीत असाल तर आता सावधान व्हा, अन्यथा तुम्हाला भविष्यात खूप सार्‍या आजारांना सामोरे जावे लागू शकते.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *