प्रवासात उलट्या होत असेल तर ही एक वस्तू जवळ ठेवा.! कधीही उलटी, मळमळ होणार नाही.!

आरोग्य

आपण नेहमीच प्रवास करत असतो. प्रवासात अनेकदा आपल्याला वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागत असतो. त्यातीलच एक समस्या म्हणजे प्रवासात उलटी होणे. प्रवासात उलटी होण्याची समस्या अनेक लोकांना निर्माण होत असते अशा वेळी नेमके काय करायला हवे हे अनेकदा आपल्याला समजत नाही. आज आपण हे बघणार आहोत की प्रवासा दरम्यान होणाऱ्या उलट्या कशा प्रकारे आपण हॅण्डल करू शकतो.!

मागील सीटवर बसणे टाळा: प्रवासादरम्यान तुम्हाला उलट्यांचा त्रास होत असेल तर कोणत्याही मोठ्या वाहनाच्या मागील सीटवर बसणे टाळावे. मागच्या सीटवर वेग जास्त जाणवतो. त्याचप्रमाणे तुम्ही गाडीच्या पुढच्या सीटवरच बसावें. यामुळे प्रवासात उलटी चक्कर मळमळ होणार नाहीं. तुम्ही जर प्रवासात हे काम करत असाल तर हे काम नक्की करा.

पुस्तक वाचू नका: अनेक लोकांना प्रवासात मनोरंजन व्हावे किंवा वेळ जायला हवा यासाठी पुस्तके किंवा पेपर वाचत असतात. अशा वेळी प्रवासात उलट्यांचा त्रास होत असल्यास पुस्तक अजिबात वाचू नका. यामुळे तुमच्या मेंदूला चुकीचा संदेश जातो. त्यामुळे हे काम तुम्ही प्रवासात करत असाल तर नक्की टाळा.!

हे वाचा:   किडनीला निकामी करू शकते तुमच्या या सवयी.! दररोजच्या या चुका तुमच्या जीवावर बेतू शकतात.! वेळीच व्हावे सावध.!

ताजी हवा: जर तुम्हाला जास्त त्रास होत असेल तर गाडीची खिडकी उघडा आणि बाहेर तोंड करून बसा. ताजी हवा मिळाल्याने तुम्हाला बरे वाटेल. रिकाम्या पोटी प्रवास करू नका. रिकाम्या पोटी प्रवास केल्यास उलट्या होत नाहीत हा समज लोकांमध्ये आहे, पण हे पूर्णपणे चुकीचे आहे. अनेकदा जे लोक काहीही न खाता प्रवासाला जातात, त्यांना मोशन सिकनेसचा त्रास जास्त असतो.

पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही खूप जड आहार घ्या. हलका आणि सकस आहार घेऊनच घर सोडा. प्रवासादरम्यान उलट्यांचा त्रास होत असल्यास (मोशन सिकनेस ट्रीटमेंट) घराबाहेर पडण्यापूर्वी काही सोपी तयारी करा. या सोप्या पायऱ्या तुम्हाला या समस्येपासून मुक्त होण्यास मदत करतील.

प्रवासाला जाताना एक पिकलेले लिंबू सोबत ठेवा. जेव्हा तुम्हाला मळमळ वाटत असेल तेव्हा लगेच या लिंबाचा सोलून वास घ्या. याने तुमचे मन फ्रेश होईल आणि असे केल्याने उलट्या होणार नाहीत. लवंगा भाजून बारीक करून एका डब्यात ठेवा. जेव्हा तुम्ही प्रवासाला जात असाल तेव्हा सोबत घ्या. उलट्या होत असल्यास चिमूटभर साखर किंवा काळे मीठ टाकून चघळत राहावे.

हे वाचा:   एक टोमॅटो तुमचे डार्क सर्कल पुर्णपणे गायब करणार.! हा घरगुती उपाय तुम्हाला कोणी नाही सांगणार.!

तुळशीची पाने चघळल्याने उलट्या होत नाहीत. याशिवाय लिंबू आणि पुदिन्याचा रस एका बाटलीत काळे मीठ टाकून ठेवा आणि प्रवासादरम्यान ते थोडे-थोडे प्या. लिंबू कापून त्यावर काळी मिरी आणि काळे मीठ शिंपडा आणि चाटून घ्या. याने तुमचे मन ठीक राहील आणि उलट्या होणार नाहीत. जर तुम्ही बसमध्ये प्रवास करत असाल तर तिथे बसण्यापूर्वी एक पेपर टाका आणि मग बसा.

यामुळे तुम्हाला उलट्या होणार नाहीत. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *