जर तुम्हाला केसांच्या संदर्भातील कोणत्याही समस्या असतील जसे केस गळणे, केस तुटणे, डोक्यावर टक्कल पडणे, अकाली केस पांढरे होणे, केस दुतोंडी होणे अशा समस्या तुम्हाला उद्भवत असतील तर आजच्या लेखात तुमच्यासाठीच आहे. आजच्या लेखामध्ये आपण पातळ असलेल्या केसांना, विरळ झालेल्या केसांना लांबसडक घनदाट कशाप्रकारे बनवायचे आहे याबद्दल एक महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत.
ही माहिती अतिशय साधी सोपी व तितकीच प्रभावी आहे. या लेखामध्ये सांगितलेला उपाय जर प्रामाणिकपणे व मनापासून केला तर तुम्हाला काही दिवसांमध्ये फरक जाणवून येईल. हा उपाय केल्याने तुम्हाला शंभर टक्के फरक जाणवणार आहे. पूर्वीपेक्षा तुमचे केस अगदी मऊ मुलायम व कोमल बनणार आहे. त्याच बरोबर जर तुमचे केस खूप पातळ झाले असतील तर दाट देखील होणार आहे.
केसांची घनता वाढणार आहे आणि त्याचबरोबर जर तुमचे केस वाढत नसतील तर केसांची लांबी देखील वाढणार आहे, चला तर मग आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला कोणकोणते पदार्थ वापरायचे आहेत हे जाणून घेऊया. मानवी शरीराला खूप सारे पोषक तत्त्वांची आवश्यकता असते. हे सारे पोषकतत्व माणसाच्या शरीराला विटामिन,खनिज यांच्यातून मिळत असतात.
जर तुमच्या शरीराला योग्य प्रमाणामध्ये विटामिन मिळाले तर तुमच्या केसांची वाढ देखील तितकीच चांगली होते. केसांची चमक राहते. केस लवकर पांढरे होत नाही आणि म्हणूनच आपल्याला योग्य आहार देखील सेवन करायला हवा. जर आपण पोषणयुक्त सकस आहार सेवन केला तर तुमच्या शरीराला आवश्यक असणारे सर्व विटामिन्स प्राप्त होते आणि परिणामी तुम्हाला कोणतेच आजार भविष्यात होणार नाही.
हल्ली परिस्थिती वेगळी झालेली आहे. प्रत्येक जण धावपळीच्या जीवनामध्ये जगत असताना स्वतःच्या आहाराकडे दुर्लक्ष करतो. आपल्यापैकी अनेक जण बाहेरचे पदार्थ सेवन करतात आणि यामुळे शरीराला आवश्यक असलेले पोषक तत्व देखील मिळत नाही त्याचबरोबर बाहेरील सर्वात जास्त पदार्थांमध्ये केमिकल्सचा वापर केलेल्या असल्यामुळे शरीराला विपरीत परिणामांना सामोरे जावे लागते.
आपले शरीर वयाच्या आधीच नको त्या समस्या निर्माण करू लागतात, अशा वेळी कॅल्शियम पोटॅशियम, मॅग्नेशियमची मात्र आपल्या शरीरामध्ये जास्त राहील याची काळजी आपल्याला घ्यायला पाहिजे त्याचबरोबर दिवसभरातून जास्त पाणी देखील आपल्याला प्यायला पाहिजे. पाणी नियमितपणे सेवन केल्याने शरीरातील विषारी घटक दूर होतात.
अनेकदा केसांच्या समस्या हार्मोनल संतुलन यामुळे देखील घडत असतात त्याचबरोबर बहुतेक वेळा आनुवंशिक परंपरा यामुळे देखील केसांचे आरोग्य बिघडत असते परंतु अनुवंशिक परंपरेमुळे आपण काही बदल करू शकत नाही. आपण आपल्या आहाराच्या व केसांच्या काळजी कडे जास्त लक्ष देऊ शकतो. जर तुम्ही तुमच्या केसांची काळजी व्यवस्थित घेतली तर तुमचे केसांचे आरोग्य चांगले राहू शकते.
त्याचबरोबर आपल्याला आहारामध्ये विटामिन ई युक्त पदार्थांचा समावेश जास्त करायचा आहे, जसे की बदाम, कॉपर म्हणजेच तांबे. तांब्याच्या भांड्यांमध्ये आपल्याला पाणी घेऊन ते पाणी रात्रभर तसेच ठेवायचे आहे आणि सकाळी उठल्यावर सेवण करायचे आहे, असे केल्याने तुमच्या शरीराला जास्त प्रमाणामध्ये तांबे प्राप्त होईल व त्याचबरोबर विटामिन ई युक्त पदार्थ आपण सेवन केल्याने तुमची नजर तेज होणार आहे.
तुमच्या केसांचे आरोग्य चांगले राहणार आहे. आपले केस मुळापासून मजबूत बनवण्यासाठी आजचा उपाय करताना आपल्याला खोबरेल तेल आणि विटामिन ई ची कॅप्सूल लागणार आहे. ही विटामिन ई ची कॅप्सूल मेडिकलमध्ये सहजरीत्या उपलब्ध होते. ज्याप्रमाणे आपल्या शरीराला पोषक तत्त्वांची आवश्यकता असते त्याचप्रमाणे शरीराला केसांच्या मुळांना देखील पोषक तत्त्वांची आवश्यकता असते.
विटामिन ई मुळे आपले केस मुळापासून मजबूत बनतात. जर तुमचे केस खराब झाले असेल किंवा केसांमधील नलिका फुटलेले असेल केसांच्या पेशीका ब्रेक झालेले असतील तर या सगळ्या गोष्टी देखील लगेच सुधारणार आहेत आणि म्हणूनच आपल्याला आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला विटामिन ई ची कॅप्सूल लागणार आहे, त्यानंतर आपल्याला खोबरेल तेल लागणार आहे.
खोबरेल तेलाचे अनेक फायदे आपल्या सर्वांना माहिती आहे. खोबरेल तेलामध्ये खूप सारे औषधी घटक असतात. आपल्याला एक ते दोन चमचा खोबरेल तेल घ्यायचे आहे आणि त्यामध्ये विटामिन ई ची कॅप्सूल टाकायची आहे. हे दोन्ही मिश्रण व्यवस्थित एकजीव करून आपल्या केसांच्या मुळाशी लावायचे आहे आणि त्यानंतर अर्धा तास आपल्याला मालिश करायचे आहे, असे जर आपण आठवड्यातून दोन वेळा जरी केले तरी तुमच्या केसांना खूप सारे पोषकतत्व प्राप्त होतील.
तुमचे केसांची मुळं मजबूत होईल तसेच विरळ झालेले केस लांबसडक घनदाट बनतील म्हणूनच आपल्या केसांचे आरोग्य मजबूत बनवण्यासाठी हा उपाय अवश्य करा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.