मेंदूचे ऑपरेशन कसे केले जाते माहिती आहे का.? आज जाणून घ्या काय असते नेमके मेंदूचे ऑपरेशन.!

आरोग्य

मशीन मध्ये आणि माणसांमध्ये एक हा फरक असतो की मशीन मध्ये मेंदू नसतो आणि माणसांजवळ मेंदू असतो. जर मशीन जवळ मेंदू असला असता तर आज पर्यंत आपण त्यांचे गुलाम झालो असतो. कारण या संपूर्ण दुनियेमध्ये सर्व खेळ हा मेंदूचाच आहे. कधी तुम्ही असा विचार केला आहे का की संगणकापेक्षा देखील जलद चालणारा मेंदू मध्ये कोणत्या दुर्घटनेमुळे किंवा कोणत्याही आजारामुळे कोणतीही समस्या उत्पन्न झाली तर आणि डॉक्टर मेंदूच्या ऑपरेशन बद्दल बोलतील तर मग काय होईल?

नंतर आपल्या मनामध्ये असा प्रश्न तर निर्माण होईलच की एवढा कठोर डोक्यातील मेंदूचे ऑपरेशन कसे केले जाईल. किंवा डॉक्टर आपल्या मेंदूपर्यंत कसे पोहोचतील. आपल्या नाजूक मेंदूचे ऑपरेशन कसे करतील. प्रत्येक वेळी आपल्या मेंदूचे ऑपरेशन करणारे त्या ऑपरेशनमध्ये सक्सेसफुल होऊ शकतात का? आपल्या मेंदूचे ऑपरेशन करताना डॉक्टर कडून काही चूक झाली तर मग माणसाचं काय होईल?

असे प्रश्न आपल्या सर्वांच्याच मनात कधी ना कधी येत असतील.आज आपण याच प्रश्नांचे निरसन करणार आहोत. आपल्याला माहीत असेल की आपला मेंदू कशा प्रकारे काम करतो. कोणतीही गोष्ट बरोबर की चूक हे सांगण्यासाठी देखील आपल्याला मेंदूची गरज असते. किंवा आपण असाही विचार करत असतो कि जर आपण रस्त्यावरून चालत असतो आणि आपल्या ओळखी कोणतीही व्यक्ती आपल्या बाजूने जात असेल आपल्या चेहऱ्यावर आपसुकच एक हास्य येते.

आपले हावभाव अचानक बदलतात. हे फक्त आपल्या मेंदूमुळे होते. आपला मेंदू आपल्याला क्षणाक्षणाला चालना देत असतो. आपला मेंदू येवढा चालना दायी आहे की अशी मशीन बनवणे शक्य आहे. त्यामुळे जगभरातील वैज्ञानिक अजूनही मेंदूच्या संबंधातील अनेक प्रश्न आज पर्यंत सोडवू शकले नाहीत. आपल्या शरीराला चालवण्यासाठी तसेच आपल्या शरीरातील काही निर्णय घेण्यासाठी देखील आपला मेंदू काम करत असतो.

आपला मेंदू आपल्या हृदयाच्या ठोक्याला सामान्य ठेवण्याबरोबरच श्वास अनियंत्रित ठेवायला देखील मदत करतो. त्याचबरोबर ब्ल’ड सर्क्युलेशनला ठीक ठेवण्याचे काम मेंदू करतो. जर कधी आपण एक वाईट गोष्ट ऐकतो तेव्हा आपल्या शरीराचे तापमान अचानक पणे वाढते त्याचबरोबर आपले श्वास घेण्याची प्रक्रिया जलद होते. हे देखील आपला मेंदू कंट्रोल करत असतो. त्याचबरोबर आपला मेंदू आपल्याला विचार करायचा आणि समजून घ्यायचा वेळ देखील देतो.

त्याचबरोबर आपला मेंदू चार प्रोटेक्टर म्हणजेच संरक्षक थरांच्या खाली असतो. ज्यांना आपण मेनिंगेस म्हणतो हे चार थर म्हणजे स्कूल, डुरा मेटर, अर्चनॉइड मेटर, पिया मेटर असतात. मेंदू हा शब्द बोलायला कितीही छोटा असला तरी त्यामुळेच आज ही दुनिया आबाद आहे. मेंदू आपल्या शरीरामधील वरील आणि मऊ भागांमधील एक आहे. कधीतरी मोठ्या अपघातामुळे आपल्या मेंदूची सर्जरी करायची वेळ येते.

हे वाचा:   फक्त तीन वेळा घ्या.! हातपाय, कंबर, गुडघे सर्व दुखणे पळून जाईल.! आजार शंभर वर्ष जवळ पण फिरकणार नाही.!

जेव्हा सर्जरी बद्दल डॉक्टर बोलतात तेव्हा पेशंटच्या परिवारातील सर्व व्यक्ती घाबरून जातात. कारण मेंदू हा आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाचा भाग आहे आणि या सर्जरी मध्ये मेंदूला काही दुखापत होणार नाही ना ही काळजी सर्वांनाच असते.मेंदूच्या सर्जरीला ग्रानिटोमी सर्जरी देखील म्हटले जाते. ही ती सर्जरी असते जिथे सर्जन खूप बारकाईने आपल्या मेंदूची सर्जरी करतात. या सर्जरीसाठी पेशंटचे ब्लड टेस्ट,एम आर आय, सिटीस्कॅन सारखे भरपूर टेस्ट केले जातात ज्यामुळे हे लक्षात यायला मदत होईल की पेशंट या सर्जरीच्या लायक आहे की नाही.

एकदा का हे लक्षात आले की पेशंट पूर्णपणे या सर्जरी साठी तयार आहे त्यानंतर अनेस्थेशिया मेडिसिन देऊन पेशंटला बेशुद्ध केले जाते. त्यामुळे सर्जरी चा त्रास पेशंटला होणार नाही. त्यानंतर पेशंटच्या डोक्याला थ्री पेन स्कूल फायकेशन डेव्हिस मध्ये बसवले जाते. हे डिवाइस सर्जरी मध्ये अत्यंत गरजेचे आणि महत्त्वाचे असते. या डिवाइस मध्ये डोके ठेवल्यामुळे डोके स्थिर राहण्यास मदत होते. आणि त्यामुळे डॉक्टरला खूप मदत होते. आणि त्यानंतर पेशंटचे सर्व केस काढले जातात.

त्यानंतर जिथे सर्जरी करायची आहे त्यावरील स्किन देखील काढली जाते. आणि मेन सर्जरी ला सुरुवात होते. न्यूरोसर्जन सर्वप्रथम क्रानियाल ड्रिल मशिनद्वारे तीन छोटे छोटे छिद्र पाडतात. ज्याच्या मदतीने क्रानियेक्टमी ला आत टाकण्यास मदत होते. क्रानियेक्टमी हे एक असे टूल आहे ज्यामुळे आपल्या डोक्यातील असा एक भाग काढला जातो त्याचे ऑपरेशन करायचे आहे. काढलेल्या हिस्याला डॉक्टर बोन फ्लाप बोलतात.

या बोन फ्लाप डॉक्टर खूप सांभाळून ठेवतात. कारण सर्जरी नंतर त्याला परत डोक्याच्या त्याच भागात ठेवायचे असते. त्यानंतर सर्जरीसाठी आपल्या डोक्यातील लयेर्स ला देखील काढणे गरजेचे असते. यामुळे डोक्यामध्ये टुमोरे किंवा आणि काही समस्या असल्यास त्या समस्या ठीक करण्यास मदत होते. आणि जेव्हा ही सर्जरी पूर्ण होते तेव्हा डॉक्टर द्वारे या तिन्ही लेअर परत बंद केल्या जातात.

त्यानंतर बोन फ्लाप ला त्या जागी परत बसवले जाते. आता तुम्हाला हेच जाणून आश्चर्य होईल की, डोक्यामध्ये फिट केलेले स्क्रू आणि नट बोल्ट कायमच आपल्या डोक्यामध्ये राहतात. त्याच बरोबर डॉक्टर त्या त्वचेला टाक्यांच्या मदतीने शिवून टाकतात. आणि सर्वात शेवटी डोक्यावरती औषध लावून डोक्याला पट्टीच्या मदतीने बांधून ठेवतात. ज्यामुळे ऑपरेशन साठी डोक्यावरील घाव लवकरात लवकर भरतील.

हे वाचा:   टाचेपासून डोक्यापर्यंत असलेल्या सगळ्या रोगांना संपवते हे पाने, लाखमोलाचे आहेत ह्या वनस्पतीचे पाने.!

हे सर्व काम एक अनुभवी डॉक्टर द्वारे केले जाते. कारण या ठिकाणी प्रश्न जीवन-मरणाचा असतो. कारण ऑपरेशन दरम्यान डॉक्टर कडून छोटी चूक जरी झाली तरी पेशंटचा जीव देखील जाऊ शकतो. आता आपल्याला प्रश्न पडला असेल की आपल्यापैकी कोणाला मेंदूचे ऑपरेशन केले पाहिजे की नाही? तर आपल्याला माहीत असेल की आपला मेंदू आपल्या शरीराला चालना देत असतो आपला मेंदू असतो आणि नाजूक देखील.

म्हणूनच आपल्या शरीराच्या कोणत्याही भागाचे ऑपरेशन केले तर थोडा जास्त प्रमाणात त्रास होईल. पण आपण जिवंत राहू शकतो. पण जर मेंदूच्या ऑपरेशन दरम्यान छोटीशी चूक जरी झाली तर आपला जीवदेखील जाऊ शकतो. हेच कारण आहे की जगभरातील सर्व ठिकाणी आज देखील मेंदूचे ऑपरेशन करण्यासाठी भीती वाटते. पण अशा काही ठराविक सिच्युएशन्स मध्ये मेंदूचे ऑपरेशन करणे हे पेशंटचा जीव वाचवण्या सारखे असते.

त्यामुळे आपल्या शरीरामध्ये असणारे याव्यतिरिक्त प्रॉब्लेम्स देखील मेंदूच्या ऑपरेशन मुळे नाहीसे होतात. जर ऑपरेशन करताना डॉक्टरांना असे दिसत असेल कि भविष्यामध्ये तुम्हाला अजून काही प्रॉब्लेम्स येणार आहेत तर ते प्रॉब्लेम देखील डॉक्टर मुळापासून काढून टाकतात. या जगामध्ये असे अनेक लोक आहेत ज्यांना हा ब्रेन ट्यूमर देखील असतो. आणि त्यांच्यासाठी ऑपरेशन हा एकमेव उपाय असतो.

जर ऑपरेशन केले नाही तर ती ट्यूमर फुटल्यामुळे त्या व्यक्तीचा जीव देखील जाऊ शकतो. आणि या परिस्थितीत मेंदूचे ऑपरेशन करणे हे एक वरदान असू शकते. त्याचबरोबर मेंदूचे ऑपरेशन करताना देखील काही नुकसान होण्याची संभावना असते. कारण शेवटी डॉक्टर्स देखील माणूस असतो. आणि त्यांच्याकडून देखील चूक होऊ शकते.

कारण काही वेळा असे होते की मेंदूचे ऑपरेशन नंतर डोक्याला सूज यायला सुरुवात होते. किंवा काही वेळेस असे झाले आहे की पेशंटच्या डोक्यामध्ये इंटर्नल ब्लीडिंग देखील चालू झाली आहे. किंवा पेशंट कोमामध्ये देखील जाऊ शकतो. काही वेळेस तर पेशंट बहिरा किंवा आंधळा होऊ शकतो. पण असे होण्याचे प्रमाण देखील कमी आहे. आम्ही आशा करतो की तुम्हाला मेंदूच्या ऑपरेशन बद्दलची पुरेशी माहिती मिळाली असेल.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *