एक रुपयाची ही एक वस्तू लिंबाच्या झाडाच्या बुडाशी टाका.! कधी वाटले नसतील येवढे लिंबू येतील.!

आरोग्य

आपल्या परसबागेमध्ये आपण अनेक अशी झाडे लावतो जी दिवसेंदिवस वाढत असतात आणि त्या त्या प्रकारची फळे आपल्याला देत असतात. मिरची, कोथिंबीर, कडीपत्ता, त्याबरोबरच लिंबाचे झाड. पण आपल्यापैकी अनेक जणांच्या झाडाला कमी प्रमाणत लिंबे लागतात. पण काही झाडांना तर तीही लागत नाहीत किंवा या लिंबाच्या झाडाची वाढ होत नाही म्हणूनच आज आपण अशी एक गोष्ट पाहणार आहोत.

ज्यामुळे लिंबाचे झाड आपोआप वाढण्यास मदत होईल सोबतच भरपूर प्रमाणात लिंबू देखील लागतील त्याच बरोबर लिंबाचे अनेक प्रकार असतात. त्या प्रकारानुसार आपल्याला ह्या लिंबाची झाडे आपल्या परसबागेत लावायची असतात पण आपल्याला याचे ज्ञान नसल्यामुळे आपण कोणत्याही प्रकारच्या लिंबाचे रोपटे घेऊन जातो आणि ते आपल्या परसबागेत लावत असतो आणि काही कारणास्तव त्या लिंबाच्या झाडाला आपल्याला हवी त्या प्रमाणात निंबे लागत नाहीत किंवा त्यांची वाढ होत नाही.

म्हणून आपण आज हे देखील जाणून घेणार आहोत कि कोणत्या कुंडी मध्ये कोणते रोपटे लावले पाहिजे. त्यामध्ये असलेला एक प्रकार म्हणजे त्याची ओळख करताना ते लिंबू मोठ्या आकाराचे असते. म्हणजेच त्या लिंबाचा आकार मोठ्या फळ एवढा असतो. जास्त प्रमाणात त्या लिंबाचे लोणचे करण्यासाठी त्यांचा वापर केला जातो. आणि या लिंबाच्या झाडाची पाने अत्यंत मोठी असतात आणि या लिंबाच्या झाडाची उंची लवकर वाढते.

जर या लिंबाचे झाड तुमच्या परसबागेत लावत असाल तर त्यामुळे तुम्हाला बरा फायदा होणार नाही कारण अशा प्रकारची लिंबे खूप कमी प्रमाणात झाडावर लागतात. आणि ती फक्त लोणच्यासाठी वापरली जातात. त्यामुळे मोठी पाने असलेले झाड आपल्याला कधीही घ्यायचे नाही आहे. जर तुम्हाला छोटी आणि रोजच्या वापरातील लिंबे हवी असतील तर तुम्ही पाकिस्तानी लिंबाचे झाड घरी घेऊन येऊ शकता.

हे वाचा:   हार्ट अटॅक आल्यावर कोणताही व्यक्ती असो असे केल्याने त्याचा जीव वाचतोच.! हे प्रत्येकाला माहिती असावे अनेकांचे प्राण वाचू शकतात.!

पा’कि’स्ता’नी लिंबाचे झाड हा एक लिंबाच्या झाडाचा प्रकार आहे. या लिंबाच्या झाडाची वाढ खालच्या दिशेने अधिक तर होत असते आणि या झाडाची उंची कायम छोटी असते. त्याचबरोबर या झाडाची पाने देखील छोटी असतात. यावर लिबांची वाढ होत असते आणि या झाडाला लिंबू लागत असतात. त्यानंतर बारामासी लिंबाचे झाड देखील आपण आपल्या परसबागेत लावू शकतो.

या लिंबाच्या झाडावर देखील जास्त प्रमाणात लिम्बांची वाढ होत असते. त्यामुळे जेव्हा देखील तुम्ही नर्सरीमध्ये लिंबाचे झाड खरेदी करायला जात असाल तेव्हा लक्षात ठेवा उंचीने कमी असणारे लिंबाचे झाड आणि त्याची पाने छोटी-छोटी असतील असेच झाड खरेदी करायचे आहे. त्याचबरोबर जर तुम्हाला लिंबाचे झाड उडवायचे असेल तर त्यासाठी खूप वर्ष निघून जातील.

उदाहरणार्थ जर तुम्ही एखादी लिंबाच्या झाडाची बी कुंडी मध्ये टाकून त्याचे रोप ते येईपर्यंत वाट पाहत असाल तर त्यासाठी कमीत कमी तीन चार वर्ष निघून जातात. आणि त्या झाडाला लिंबाचे फळ येईल कि नाही हि देखील शक्यता नसते त्यामुळे कधी ही रोपे आणून तेच लावण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याबरोबर जर तुमच्या झाडाला फुल येत नसेल जर फुल आले नाही तर फळ कुठून येणार अशी जर शंका असेल तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या झाडावर मिठाची फवारणी करायची आहे.

आता हे मीठ देताना जे आयोडीन मीठ असते ते न वापरता खडा मिठाचा वापर करायचा आहे म्हणजेच बारीक मिठाचा वापर न करता जाड मीठ असते त्याचा वापर आपल्याला इथे करायचा आहे. या मिठाची फवारणी केल्यानंतर एका आठवड्यामध्ये तुमच्या रोपट्याला म्हणजेच झाडाला फळ यायला सुरुवात होईल. त्यानंतर काही जणांचा असाही प्रश्न असतो की जर लींबाच्या झाडावर फूल आले तरी देखील त्या फुलापासून फळ बनत नाही.

हे वाचा:   आतापर्यंतचा सर्वात मोठा खुलासा उघडकीस.! अंजीर खाल्ल्याने काय झाले तुम्हीच तुमच्या डोळ्याने बघा.!

म्हणजेच ती फुले तशीच सुकून जातात आणि त्यामधून फळ निघत नाही. त्यासाठी तुम्हाला एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे ती म्हणजे जर तुमच्या परिसरामध्ये किंवा परसबागेमध्ये मधमाशा किंवा फुलपाखरे येण्यासाठी म्हणजेच आकर्षित होण्यासाठी झाडांवर मधाचा शिडकाव करा त्यामुळे मधमाशा आणि फुलपाखरे येऊन त्यावर मग बसतील आणि त्यातून फळ निर्माण होऊ शकते.

त्या व्यतिरिक्त देखील तुम्ही मोहरीचे झाड किंवा गोंड्याचे रोप लिंबाच्या झाडाच्या बाजूला लावू शकता या झाडांजवळ फुलपाखरे आणि मधमाशा सहजपणे आकर्षित होतात. सोबतच कोणत्याही झाडाला किंवा रोपट्याला पाणी देखील प्रमाणातच दिले पाहिजे जर जास्त पाणी जात असेल तर त्यामुळे देखील फळ येण्यास कठिण जाते त्याबरोबरच आपल्याला खताचा देखील वापर कमी प्रमाणात केला पाहिजे त्यामुळे देखील समस्या निर्माण होऊ शकतात.

त्यानंतर एक रुपयाच्या गोष्टीचा आपण उल्लेख करत होतो तो म्हणजे सुहागा. सुहागा आपल्याला बाजारपेठेमध्ये कोणत्याही वाण्याच्या दुकानात सहजपणे उपलब्ध होऊन जाईल. हा सुहागा रोप लावत असताना त्या माती मध्ये टाकून रोप त्याच्याखाली टाकायचा आहे हा टाकल्यामुळे आपल्या झाडांवरील फळे फुले गळत असतील तर ती गळणार नाहीत.

सोबतच फळांना कीड लागणार नाही. लिंब फाटणार नाहीत नाही. आणि नवीन फळे येण्यास देखील मदत होणार आहे. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *