फक्त एकदा लावा.! आयुष्यात कधी कोणत्या फेशियलची गरज पडणार नाही.! चेहरा मऊ सुंदर बनवायचा असेल तर एकदा हे ट्राय करा.!

आरोग्य

आपल्या सर्वांचे एक स्वप्न असते की आपली त्वचा सर्वात सुंदर दिसली पाहिजे. त्या पेक्षा हि जास्त आपली त्वचा कायम तरुण दिसली पाहिजे. यासाठी आपण अनेक उपाय करत असतो. अनेक प्रकारच्या क्रीम चा वापर करत असतो. एवढेच नाही तर आपण अनेक घरगुती उपाय देखील पाहत असतो पण त्यामुळे देखील आपल्या चेहऱ्यावर फारसा फरक दिसून येत नाही आणि बहुतेक लोक असे असतात ज्यांना कमी वयातच सुरकुत्या यायला सुरुवात होते.

जे दिसायला खूप वाईट दिसतात. त्याचबरोबर काही लोक असे असतात जे पन्नाशीमध्ये पंचवीस चे वाटतात. त्यामुळे आपण या संदर्भातील आज असा एक घरगुती उपाय जाणून घेणार आहोत ज्यामुळे तुम्ही तरूण दिसाल. तुमचा चेहरा साफ आणि सुंदर दिसेल त्याचबरोबर चमकदार दिसेल आणि तुम्ही तरुण दिसू लागाल. चला तर मग जाणून घेऊया, हा घरगुती उपाय कसा बनवायचा आहे आणि या घरगुती उपाय बनविण्यासाठी आपल्याला कोण कोणती सामग्री लागणार आहे.

सर्वप्रथम हा घरगुती उपाय बनविण्यासाठी आपल्याला इथे टोमॅटोचा वापर करायचा आहे. टोमॅटो आपला चेहरा साठी भरपूर उपयोगी असतो. आज पर्यंत टोमॅटो चा वापर आपण जेवणामध्ये केला असेल पण तुम्हाला माहित नसेल की टोमॅटो आपल्या चेहरा साठी देखील तेवढाच उपयुक्त आहे. टोमॅटोमुळे आपला चेहरा उजळ होण्यासाठी मदत होते. त्याचबरोबर आपल्या चेहऱ्यावरील सुरकुत्या निघून जाण्यास देखील मदत होते सोबतच आपल्याला लिंबाचा देखील वापर करायचा आहे.

हे वाचा:   खूपच गळत होते केस पण या एका फुलाने केली जादू.! केस गळणे कायमचे थांबले.! केसांसाठी खूपच गुणवर्धक आहे हे फुल.!

लिंबू अँटिऑक्सिडंट असल्यामुळे आपल्या त्वचेतील पोल्स ओपन होतात आणि आपला चेहरा उजळ होण्यासाठी मदत होते. काही लोकांच्या चेहर्यासाठी लिंबाचा वापर हानिकारक ठरू शकतो. ज्यांना लिंबापासून एलर्जी असेल त्यांनी लिंबाचा वापर नाही केला तरी चालेल . पण ज्यांना लिंबाची ऍलर्जी नसेल ते लिंबाचा वापर करू शकतात. त्याचबरोबर आपल्याला साखर देखील लागणार आहे.

इथे आपण टोमॅटोपासून फेस पॅक आणि फेस स्क्रब बनवणार आहोत त्यामुळे आपल्याला साखरेची गरज भासणार आहे. साखर ही एक उत्तम स्क्रब चे काम करते. त्याचबरोबर येथे आपल्याला तांदळाच्या पिठाचा देखील वापर करायचा आहे. तांदळाचा पिठाचा वापर केल्यामुळे चेहऱ्यामध्ये ग्लो येण्यासाठी मदत होते. चला तर मग जाणून घेऊया हा पॅक आणि हा स्क्रब बनविण्यासाठी ची प्रक्रिया.

सर्वप्रथम आपल्याला टोमॅटो बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आणि या टोमॅटोचा पेस्ट गाळणी च्या सहाय्याने एका वाटीमध्ये टोमॅटोचा रस काढून घ्यायचा आहे. आता या रसामध्ये दोन थेंब लिंबू टाकायचे आहे. आता राहिलेल्या टोमॅटोचा पल्प मध्ये आपल्याला बारीक वाटून घेतलेली साखर टाकायची आहे. आपण येथे साखरेचा वापर बारीक वाटून करणार आहोत कारण साखरेचा प्रकार हा जाड असल्यामुळे चेहऱ्यावरती देखील येऊ शकतात.

त्यामुळे साखरेचा वापर बारीक वाटून करायचा आहे पण साखर बारीक करताना हे लक्षात घ्यायचे आहे की साखरेचे पिठ न करता थोडीशी बारीक करून खरखरीत अशाप्रकारे ही साखर वाटून घ्यायची आहे. त्यानंतर टोमॅटो पल्प मध्ये एक चमचा साखर टाकायची आहे आणि त्याने आपल्या चेहऱ्यावर लावून गोलाकार पद्धतीने मालिश करून आपल्या चेहऱ्याला दहा ते पंधरा मिनिटे स्क्रब करायचे आहे.

हे वाचा:   हे तेल लावून ठेवा चेहऱ्यावर पुटकुळ्याचे एकही निशाण राहणार नाही; केस होतील लांबच लांब.!

हा स्क्रब वापरल्यामुळे आपली डेट स्किन निघून जाईल आणि आपल्या शहरातील पोल्स ओपन व्हायला मदत होईल. 10 ते 15 मिनिटांनी स्क्रब केल्यानंतर आपण करून घेतलेल्या टोमॅटो आणि लिंबाच्या मिश्रणामध्ये एक चमचा तांदळाचे पीठ टाकून त्याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे. ही पेस्ट आपल्या चेहर्‍यावर लावून दहा ते पंधरा मिनिते ठेवल्यानंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुऊन घ्यायचा आहे.

या दोन्ही गोष्टींचा वापरानंतर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यामध्ये बराच फरक दिसुन येइल. हा स्क्रब तुम्ही आठवडा मधून तीन वेळा वापरू शकता सोबतच तुम्ही हा पॅक देखील लावून आठवड्यातून तीन वेळा याचा वापर करू शकता. यामध्ये वापरले गेलेले सर्व गोष्टी घरगुती असल्यामुळे आपल्या रोजच्या वापरातील असल्यामुळे याचा आपल्या चेहऱ्यावर कोणताही वाईट परिणाम किंवा हानीकारक परिणाम होणार नाही.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *