आजीबाईच्या बटव्यातील हा लाख मोलाचा उपाय तुमचे पैसे नक्की वाचवणार.! लाखो रुपये दवाखान्यात घालण्यापेक्षा एकदा उपाय नक्की वाचा.!

आरोग्य

आपल्या आयुर्वेदिक शास्त्र हे संपन्न असलेले शास्त्र आहे. या आयुर्वेदिक शास्त्रात प्रत्येक आजारावर कोणते ना कोणते छोटे-मोठे उपाय सांगण्यात आलेले आहे, त्याचबरोबर आपल्या प्रत्येकाच्या घरी आजी आजोबा असतात. पूर्वीच्या काळी घरातील ज्येष्ठ मंडळी कोणतेही आजार झाले तर डॉक्टरांकडे न जाता घरातल्या घरात काही उपाय करून लगेच बरे होऊन जायचे परंतु हल्ली आता परिस्थिती बदललेली आहे.

अनेक घरांमध्ये आजी-आजोबा आहेत ना, घरातील छोटे-मोठे उपाय. यामुळे काही आजार आपल्याला झाल्यावर त्वरित दवाखान्यात जावे लागते आणि डॉक्टरांनी सांगितलेलं औषध सेवन करून बरे व्हावे लागते.आज आम्ही तुम्हाला आजीच्या बटव्यातील एक महत्त्वाचा उपाय सांगणार आहोत,ज्या घरांच्या लोकांच्या घरी आजी आजोबा असतील त्यांना आजीचा बटवा माहितीच असेल.

या आजीच्या बटव्यांमध्ये असे छोटे मोठे आयुर्वेदिक उपाय असतात, ज्या उपायांच्या माध्यमातून आपण आपले शरीर अगदी तंदुरुस्त बनवू शकतो म्हणूनच आज एक आम्ही देखील तुम्हाला असाच एक उपाय सांगणार आहोत. आपल्याला खायला प्रत्येक ऋतू नुसार वेगवेगळी फळे उपलब्ध होत असतात. प्रत्येक ऋतूनुसार उपलब्ध असणारी फळे जर आपण सेवन केली तर त्यांचा शरीराला खूप सारा फायदा होतो.

पावसाळ्याच्या सुरुवातीच्या दिवसाला आणि उन्हाळ्याच्या शेवटला आपल्याकडे रानमेवा भरपूर प्रमाणात उपलब्ध असतो. या रान मेवांमध्ये करवंदे यांचा समावेश मोठ्या प्रमाणात केला जातो. करवंदे ही प्रामुख्याने डोंगर ठिकाणी उपलब्ध होत असतात. करवंदे ही चवीला गोड, आंबट, तुरट असतात. करवंद ही दिसायला सुरुवातीच्या काळामध्ये हिरवी नंतर लाल आणि नंतर काळी असतात.

हे आकाराने अगदी लहान बोराप्रमाणे असतात परंतु यांची चव अतिशय उत्तम असते.या करवंदाचा उपयोग आयुर्वेदिक शास्त्रांमध्ये मोठ्या प्रमाणात सांगण्यात आलेला आहे, त्या करवंद्याच्या मदतीने आपण आपल्या शरीरातील अनेक समस्या दूर करू शकतो. ज्या व्यक्तींना वारंवार पोटाचे आजार आहेत, पोट दुखते, पोटामध्ये गॅस झालेले असते, पोटदुखीची समस्या त्रास देते अशा व्यक्तींनी आपल्या आहारामध्ये करवंदाचा समावेश अवश्य करायला पाहिजे.

हे वाचा:   सकाळी रिकाम्या पोटी चहा पील्याने काय होते बघा.! सकाळी चहा पिणे योग्य की अयोग्य.? अशा प्रश्नांची उत्तरे जे कोणालाही माहिती नसेल.!

आजच्या या लेखांमध्ये आपण आजीच्या बटव्यांमधील करवंदाचा उपाय जाणून घेणार आहोत आणि या उपायाच्या मदतीने आपली पोटदुखी कायमची दूर करणार आहोत. आपल्याला बाजारातून करवंद आणायची आहेत. ही करवंद आणत असताना जास्त पिकलेली नसतील याची काळजी देखील घ्यायची आहे. ही करवंदे थोडी कच्ची किंवा लालसर असतील अशीच घ्यायची आहेत.

करवंदे बाजारातून आणल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवायची आहे, जेणेकरून कोणत्याही प्रकारची माती मूळ जमा झाली असेल तर ती निघून जाईल त्यानंतर आपल्याला करवंदाचे बारीक बारीक तुकडे करायचे आहे. हे तुकडे करत असताना आत मध्ये जी बी असते ती चवीला तुरट असते. ही बी जर आपण काढली नाही तर या बी ला लहान मुले अजिबात खात नाही म्हणून आपल्याला मोठ्या आकाराचे करवंद घ्यायचे आहेत जेणेकरून या करवंदांमधील बी सहजरीत्या आपल्याला काढता येईल.

आता आपल्याला कापून घेतलेले करवंद एका प्लेटमध्ये काढून त्यामध्ये एक चमचा मीठ व एक चमचा हळद टाकायची आहे व हे दोन्ही मिश्रण व्यवस्थित एकजीव करून काही वेळ तसेच ठेवायचे आहे.काही वेळाने करवंद्याला पाणी सुटेल. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही हे पाणी काढूदेखील शकता किंवा नको असेल तर तसे देखील राहू देऊ शकता..आता आपल्याला तिसरा पदार्थ लागणार आहे ते म्हणजे बडीशोप.

हे वाचा:   छातीत साचलेली सगळी घाण, बेडका, कफ झटपट बाहेर पडेल.! दोन मिनिटात छाती आणि गळा होईल मोकळा.!

बडीशोप मध्ये असे अनेक औषधी गुणधर्म असतात, जे तुमच्या पोटाच्या समस्या दूर करतात. ब’द्ध’कोष्ठता, मूळव्याध, अपचन, गॅस, ऍसिडिटी या सगळ्या समस्या बडीशेप सेवन केल्यानंतर आपल्या दूर होतात म्हणून आपल्याला आजचा उपाय करण्यासाठी बडीशेप ची मध्यम स्वरूपात पावडर बनवून घ्यायची आहे. जास्त बारीक पावडर बनवून घ्यायची नाही त्यानंतर आपल्याला कलौंजी लागणार आहे.

कलौंजी मध्ये असे काही घटक असतात जे तुमच्या शरीरातील पचन संस्था सुधारण्याचे कार्य करते. आता आपल्याला एका बॉटलमध्ये एक चमचा मीठ थोडेसे मोहरीचे तेल आणि साखर किंवा मध लागणार आहे त्यानंतर कापलेली करवंद आपल्याला बॉटलमध्ये टाकायचे आहे आणि दोन ते तीन तास तसेच ठेवायचे आहे,अशा प्रकारे घरच्या घरी करवंदाचा मुरंबा तयार झालेला आहे. हा मुरंबा तुम्ही लहान मुलांना आवश्यक सेवन करायला देऊ शकतात.

मुरंबा चवीला गोड असल्याने लहान मुले आवडीने सेवन करतील. मुलांच्या पोटाच्या सगळ्या समस्या लवकरच दूर होईल आणि म्हणूनच बाजारामध्ये विकत मिळणारा मुरंबा तुम्ही घरच्या घरी तयार करून पोटाच्या अनेक समस्या दूर करू शकाल, म्हणून हा उपाय व ही रेसिपी अवश्य घरच्या घरी करा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.