अंजीर खाण्याआधी ते बनले कसे जातात ते तर बघा.! अंजीर कसे बनते हे नक्की वाचा.!

आरोग्य

आजच्या प्रदूषीत जगात स्वतःला निरोगी ठेवणे खूप कठीण व महत्वाचे आहे आणि यासाठी आपल्याला आपल्या आहारचे योग्य संतुलन राखणे गरजेचे आहे. म्हणूनच भाज्या, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, डाळी, कडधान्ये इत्यादींच्या बरोबर फळांचाही समावेश आहारामध्ये असायला हवा. फळांमध्ये अनेक शरीराला पौष्टिक असे घटक असतात. अशाच फळांपैकी एक फळ म्हणजे अंजीर.

हे फळ ताजे आणि सुकविलेले अशा दोन्ही प्रकारे खाता येते. अंजीर आरोग्याला अतिशय फायदेशीर असून, याचे नियमित सेवन करण्याचा सल्ला आहारतज्ञ देतात. निरनिराळ्या ऋतूमध्ये मिळणारी ताजी फळे, ही निसर्गाने मनुष्याला दिलेली देणगीच आहे. ही ताजी रसरशीत फळे शरीराच्या आरोग्याकरिता अतिशय लाभदायक असतात. अंजीर हा सुकामेव्यातील एक पदार्थ आहे.

ओलं फळ किंवा सुकवलेले अंजीर हे दोन्ही आरोग्याला फायदेशीर ठरते. अंजीरमध्ये फायबर घटक मुबलक असल्याने पोट साफ होण्यास मदत होते. ताजे आणि सुकवलेले अंजीर दोन्हींमुळे बद्धको’ष्ठतेचा त्रास आटोक्यात ठेवण्यास मदत होते. अंजीरमुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते. शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी आणि र’क्तशुद्धीसाठी पिकलेले अंजीर खावे.

जागरण, रात्रपाळी, अति चहा किंवा धूम्रपान, दारू यामुळे शरीराला नुकसान पोहोचतं म्हणूनच शरीराची ही हानी भरून काढण्यासाठी रोज ताजे अंजीर खावे. अंजीर फळातील औषधिगुणामुळे पित्त विकार, र’क्तविकार व वात ही दूर होतात. पायांना भेगा पडल्या असतील तर कच्च्या अंजीराचा चीक लावल्यास भेगा लवकर भरून येतात.

हे वाचा:   कांदे कापताना डोळ्यात सतत आग होणे पाणी येणे असे होत असेल तर त्यावर करायचे हे सोपे काम.! एकही थेंब डोळ्यात येणार नाही.!

आजारपणामुळे अशक्तपणा खूप जाणवत असेल तर अंजीर खावे. आठवड्याभरात अशक्तपणा कमी होऊन शरीरास शक्ती प्राप्त होते. अंजीरमध्ये कॅल्शियम घटक मुबलक असल्याने हाडांना मजबुती मिळते. सांधेदुखी व स्नायूंचे दुखणे त्वरित बरे होते. अंजीरमधील पोटॅशियम घटक र’क्तातील साखरेचे प्रमाणत नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. अंजिराचे सेवन लो किंवा हाय ब्लडप्रेशर असणाऱ्या व्यक्तींसाठी फायद्याचे आहे.

अंजीरामध्ये पोटॅशियम मुबलक प्रमाणात असून, हा क्षार रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करीत असतो. ज्यांच्या शरीरामध्ये या क्षाराची कमतरता आहे, त्यांनी नियमितपणे अंजीराचे सेवन करायला हवे. मात्र हे अंजीरच्या फळाला सुका मेवा बनविण्याची पद्धत नक्की काय आहे हा प्रश्न आपल्यातील अनेक जणांना पडत असतो. आम्ही आज या लेखा द्वारे तुमच्या या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देणार आहोत.

म्हणूनच हा लेख अगदी शेवट पर्यंत नक्की वाचा. अंजीरच्या फळाला जगातले सर्वात गोड फळ मानले जाते. याची शेती भारतातील महाराष्ट्र, कर्नटका आणि केरळ या परदेशांमध्ये केली जाते. अंजीरच्या झाडांना वाढण्यासाठी 28 ते 30 अंश एवढे तापमानाची आवश्यकता असते. या शेतीसाठी तुम्हाला सुपीक आयरनयुक्त माती लागते. अंजीरचे एक झाड साठ वर्षे फळे देवू शकते.

हे वाचा:   धक्कादायक.!!! पोटात नेमके का आणि कसे तयार होत आहेत हे कृमी.! समोर आली धक्कादायक माहिती.!

या झाडाची उंची चार ते पाच फूट लांब असते. पावसाळ्यात या झाडाला मोहोर येऊन फळे येण्यास सुरवात होते आणि हिवाळा येताच ही फळे पिवळ्या रंगाचे रूप धारण करतात म्हणजेच पिकू लागतात. मग या अंजीरच्या फळांना तोडले जाते झाडांपासून त्याना वेगळे केले जाते. ही वेगळी केलेली फळे एका मोठ्या भांड्यामध्ये पाण्यात काही दिवसांसाठी ठेवली जातात.

आठवड्याच्या कालावधीनंतर यांना कडक उन्हात सुकवली जातात. सुकवण्याची क्रिया झाल्यानंतर या सुकलेल्या अंजीर फळांना कारखान्यात ती जास्त वेळ टिकावीत म्हणून प्रक्रियेसाठी पाठवले जाते. या प्रक्रिये नंतर अंजीर ओले होतात म्हणूनच त्यांना हीटिंग यंत्रामध्ये टाकले जाते सुकल्या नंतर हे अंजीरचे फळ सुक्या मेव्यात परिवर्तीत होते. या नंतर या अंजीरच्या फळांना सुक्या मेव्याच्या स्वरूपात बंद करुन बाजारात विक्री साठी पाठवले जाते.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.